Hair Mask | केस गळती, रुक्षपणा समस्या होणार दूर, ‘हा’ हेअर मास्क ठरेल केसांसाठी वरदान!

आपण सर्वांनीच बर्‍यापैकी पेरू खाल्ले असतील, पण पेरूच्या हेअर मास्कबद्दल फारच कमी लोकांना माहिती असेल.

Hair Mask | केस गळती, रुक्षपणा समस्या होणार दूर, ‘हा’ हेअर मास्क ठरेल केसांसाठी वरदान!

मुंबई : प्रत्येकाला लांब, गडद आणि दाट केस आवडतात. परंतु, हिवाळ्याच्या दिवसांत आपले केस निर्जीव आणि कोरडे दिसू लागतात. आपण जेव्हा आपले केस धुतो तेव्हा, ते सुंदर दिसतात. परंतु, दोन दिवसांनंतर केस पुन्हा निर्जीव दिसू लागतात. अशा परिस्थितीत आपण केसांची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. जेणेकरून केस अधिक मजबूत होण्याबरोबर अधिक दाट व चमकदार देखील राहतील (Guava leaf hair mask for long and strong hair).

केसांची काळजी घेण्यासाठी मदत करणाऱ्या पेरूच्या पानांच्या हेअर मास्कबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत. आपण सर्वांनीच बर्‍यापैकी पेरू खाल्ले असतील, पण पेरूच्या हेअर मास्कबद्दल फारच कमी लोकांना माहिती असेल. चला तर, पेरूच्या पानांपासून बनवलेल्या केसांच्या मास्कच्या फायद्यांविषयी जाणून घेऊया.

पेरूच्या हेअर मास्कसाठी लागणारे साहित्य :

15-20 पेरू पाने

1 वाटी पाणी

1 अंडे

2-3 चमचे गुलाब पाणी

हेअर मास्क बनवण्याची पद्धत

– सर्वप्रथम एका भांड्यात पाणी उकळवा. या पाण्याला उकळी आल्यानंतर त्यात पेरूची पाने घाला आणि सुमारे 20 मिनिटे पुन्हा उकळवा.

– यानंतर, या पाण्यात उकडलेली पेरूची पाने काढा आणि मिक्सर ग्राइंडरच्या एका भांडयामध्ये घेऊन त्यात गुलाबाचे पाणी आणि अंडी मिसळा. व्यवस्थित वाटून याची जाड पेस्ट तयार करा.

– पाने काढल्यानंतर ते पाणी फेकून न देता तसेच ठेवून द्या.

हेअर मास्क केसांना लावण्याची पद्धत

पेरूच्या पानांची ही पेस्ट हाताने किंवा ब्रशच्या सहाय्याने केसांच्या स्काल्पवर आणि केसांवर चांगल्याप्रकारे लावा. यानंतर शॉवर कॅपने केस झाकून ठेवा. ही पेस्ट सुमारे 10 ते 15 मिनिटांसाठी केसांवर लावून ठेवा. नंतर आपल्या केसांवर बाजूला काढून ठेवलेल्या पेरूच्या पानांच्या पाण्याने नीट मसाज करा. 10 मिनिटांनंतर केस पाण्याने धुवा (Guava leaf hair mask for long and strong hair).

केस चमकदार बनतील.

पेरूच्या पानांमध्ये अँटी-इंफ्लेमेटरी आणि अँटी-मायक्रोबियल गुणधर्म असतात. जे आपले केस चमकदार बनवण्यास मदत करते. पेरूच्या पानांमध्ये व्हिटामिन बी आणि सी असते, जे स्काल्पचे खोलवर पोषण करते.

स्काल्प मजबूत होते.

केसांची कोणतीही समस्या दूर करण्यासाठी स्काल्प मजबूत असणे गरजेचे असते. पेरूच्या पानांमध्ये भरपूर अँटिऑक्सिडेंट गुणधर्म असतात. जे स्काल्पला निरोगी ठेवण्यास मदत करतात.

(टीप : वरील माहिती ही सामान्य माहितीवर आधारित आहे. आपण सौंदर्यतज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला आवश्य घ्या.)

(Guava leaf hair mask for long and strong hair)

 

हेही वाचा :

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI