AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

कांद्याच्या सालीला कचरा समजताय? थांबा, आधी याचे फायदे जाणून घ्या…

व्हिटामिन ए, सी, ई आणि बरेच अँटीऑक्सिडेंट्सयुक्त असलेली कांद्याची साले अँटी-इफ्लेमेटरी गुणधर्मांनी परिपूर्ण आहेत.

कांद्याच्या सालीला कचरा समजताय? थांबा, आधी याचे फायदे जाणून घ्या...
लासलगावात कांद्याला 4500 रुपये क्विंटला दर मिळाला
| Updated on: Jan 22, 2021 | 12:53 PM
Share

मुंबई : आपण सगळेच जण कांद्याची साले कचरा म्हणून फेकून देतो. कारण, आपल्याला त्याचे काही फायदे माहित नाहीत. होय, कांद्याच्या सालामध्ये पुष्कळ पोषक तत्त्वे आढळतात जे आपल्या आरोग्यासाठी तसेच त्वचेचे सौंदर्य वाढवण्यासाठी प्रभावी आहेत. त्याच बरोबर याचे आणखी काही फायदे आहेत, ते जाणून घेऊया…(Health and skin benefits of onion peel)

व्हिटामिन ए, सी, ई आणि बरेच अँटीऑक्सिडेंट्सयुक्त असलेली कांद्याची साले अँटी-इफ्लेमेटरी गुणधर्मांनी परिपूर्ण आहेत. कांद्याच्या सालामध्ये क्वरेसेटीनचे प्रमाण जास्त असते, जे रक्तदाब कमी करण्यास आणि रक्तवाहिन्यांचे कार्य सुरळीत करण्यास उपयुक्त ठरते. यामुळे हृदयविकाराचा धोका कमी होतो.

सूज आणि कर्करोगाचा प्रतिबंध

एका अभ्यासानुसार, कांद्याच्या सालामध्ये मुबलक प्रमाणात फायबर आढळते. तसेच त्यात असलेले फ्लावोनोइड्स, क्वरेसेटीन आणि फिनोलिक हे घटक आपल्या शरीराची सूज आणि कर्करोगासारख्या समस्यांपासून संरक्षण करण्यासाठी खूप प्रभावी आहेत.

घशाच्या समस्या दूर होतात.

जर कांद्याची साले पाण्यात उकळून किंवा चहामध्ये उकळून ते सेवन केले तर, घशात दुखणे आणि इतर समस्यांपासून आराम मिळतो.

त्वचेच्या अॅलर्जीपासून आराम मिळतो.

जर, आपल्याला त्वचेवर अॅलर्जीची समस्या असेल तर कांद्याची साले आपल्यासाठी गुणकारी ठरू शकतात. यासाठी कांद्याची साले रात्री पाण्यात भिजवा. सकाळी त्याच पाण्याने आपली त्वचा स्वच्छ करा. काही दिवस हे असे केल्याने खूप फायदा होईल (Health and skin benefits of onion peel).

केसांची लांबी

ज्यांच्या केसांना योग्य वाढ नाही, त्यांच्यासाठी कांद्याची साले खूप उपयोगी ठरू शकतात. यासाठी कांद्याची साल आणि चहाची पाने पाण्यात घालून उकळा. कोमट झाल्यावर या पाण्याने केस धुवा. काही काळासाठी हा उपाय सतत केल्याने केस लांब, गडद आणि दाट होण्याबरोबरच केसांतील कोंड्याची समस्या देखील दूर होते.

स्नायूंमधील वेदना कमी होतात.

जर, आपण दररोज झोपायच्या आधी कांद्याच्या सालाचे पाणी सेवन केले, तर पाय दुखणे आणि स्नायूतील वेदना कमी होण्यास मदत होते. यासाठी, आपल्याला कमी तापमानात कांद्याची साले किमान 15 मिनिटे उकळून घ्यायची आहे. दररोज रात्री एक कप हे पाणी प्यावे.

त्वचा उजळेल.

कांद्याच्या सालांपासून नितळ आणि चमकदार त्वचा देखील मिळवू शकता. यासाठी कांद्याची साले हळदीमध्ये मिसळा आणि हे मिश्रण चेहऱ्यावर लावा. असे केल्याने चेहर्‍यावरील डाग दूर होतील आणि त्वचा सुधारू लागेल.

(टीप : कोणत्याही उपचारांपूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Health and skin benefits of onion peel)

हेही वाचा :

स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश
स्लॅब कोसळून 1 ठार, 2 जखमी; CM फडणवीसांनी दिले चौकशीचे आदेश.
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले...
हर्षवर्धन सपकाळ यांनी माफी मागावी, CM फडणवीस संतापले....
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ
जमीन मोजणीदरम्यान वाद; राऊतांनी ट्विट केला नार्वेकरांचा व्हिडिओ.
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका
सोयाबीन-कापूस आयात होणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांची ठाम भूमिका.
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण...
दादांची इच्छा पूर्ण करायची होती, पण....
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?
दादांचे 70% आमदार विलिनीकरणाच्या बाजूनं?.
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?
भुजबळांचा संताप आणि संकेत... विलिनीकरणाच्या मुद्द्यावर मोठी अपडेट काय?.
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी...
दादर मार्केट गुलाबांच्या रंगात रंगले; व्हॅलेंटाईन डेसाठी....
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल
बंद दाराआड, भिंतीआड जे बोललं जातं, त्यावर का बोलू? संजय राऊतांचा सवाल.
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ
VSR कंपनीचे बेनामी मालक कोण? संजय राऊत यांच्या सवालाने खळबळ.