सरकारने बंदी उठवली, कांद्याचे भाव वाढले

तब्बल 105 दिवसांनतर निर्यातबंदी उठवल्यामुळे कांद्याचे भाव वाढले आहेत. लासलगावमध्ये कांद्याच्या भावात 360 रुपयांची वाढ झाली आहे. (Onion prices export ban)

सरकारने बंदी उठवली, कांद्याचे भाव वाढले
Onion Rate cheaper
Follow us
| Updated on: Dec 29, 2020 | 12:20 PM

नाशिक : तब्बल 105 दिवसांनतर निर्यातबंदी उठवल्यामुळे कांद्याचे भाव वाढले आहेत. लासलगावमध्ये कांद्याच्या भावात 360 रुपयांची वाढ झाली आहे. निर्यातबंदी उठवल्यामुळे ही भाववाढ झाल्याचे सांगण्यात येत आहे. (Onion prices rises due to lifting of export ban)

कांद्याचे भाव वाढल्यामुळे मागील अडीच महिन्यांपासून कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती. त्यांनतर आता येत्या 1 जानेवारीपासून ही निर्यातबंदी उठवण्याचा केंद्र सराकरने निर्णय घेतला आहे. सरकारच्या याच निर्णयाचा परिणाम लालसलगाव येथील बाजारसमितीमध्ये पाहायला मिळाला. या निर्णयामुळे कांद्यांच्या भावात मोठी वाढ झाली. लासलगावमध्ये कांद्याचा भाव सध्या 360 रुपयांनी वाढला आहे.

कांदा निर्यातबंदी उठवण्याचा हा परिणाम असल्याचे सांगण्यात येत आहे. अडीच महिन्यांनतर कांद्याचा भाव वाढल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये सध्या समाधानाचे वातावरण आहे. तर सामान्य नागरिकांना या भाववाढीचा फटका बसण्याची शक्यता आहे. लासलगाव येथील बाजारामध्ये कांद्याचा कमाल भाव प्रतिक्विंटल 2372 रुपये असून किमान भाव 1000 रुपये आहे .तर सर्वसाधारण भाव प्रतिक्विंटलमागे 2100 रुपये ईतका आहे.

निर्यातबंदीमुळे कांद्याच्या लिलाव बंद

दरम्यान, मागील तीन महिन्यांपासून कांदा निर्यातीवर बंदी असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष निर्माण झाला होता. केंद्र सरकारच्या या निर्णयाविरोधात लासलगाव तसेच राज्यभरातून आंदोलनं होत होती. लासलगावमध्ये शेतकऱ्यांनी केंद्र सरकारविरोधात तीव्र आंदोलन छेडून लासलगावसह जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांमधील कांदा लिलाव बंद केला होता. शेतकऱ्यांच्या या पवित्र्यामुळे बाजारात कांदा पुरवठ्यावर परिणाम झाला होता. त्यांनतर येत्या 1 जानेवारीपासून कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवण्यात आली आहे. त्यामुळे शेतऱ्यांना आंततराष्ट्रीय बाजारपेठ उपलब्ध झाल्यामुळे चांगला पैसा मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. तर आज कांद्याचा भाव 360 रुपयांनी वाढल्यामुळे सामान्यांना याचा फटका बसू शकतो, असे सांगितले जात आहे.

संबंधित बातम्या :

मोदींच्या मन की बातमधली केसरची शेती कशी देते लाखो कमाईची संधी?

29 डिसेंबरच्या बैठकीला शेतकरी तयार, मात्र सरकारसमोर ‘या’ अटी

रद्दी देता का रद्दी; रद्दीच्या टंचाईमुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल

(Onion prices rises due to lifting of export ban)

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.