AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रद्दी देता का रद्दी; रद्दीच्या टंचाईमुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल

द्राक्षाचे माहेरघर असलेल्या नाशिक जिल्ह्यामध्ये सध्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना वृत्तपत्र रद्दी टंचाईला सामोरे जावे लागत आहे.

रद्दी देता का रद्दी; रद्दीच्या टंचाईमुळे द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल
| Updated on: Dec 26, 2020 | 2:17 PM
Share

नाशिक : द्राक्षाची पंढरी म्हणून ओळख असलेल्या निफाड तालुक्यातील निर्यातक्षम द्राक्षांना (Grape Farmers Having Trouble Due To Newspaper Junk Price Hike) वातावरणातील होणाऱ्या बदलामुळे हुडहुडी भरली आहे. कोरोना महामारीचा फटका वृत्तपत्र व्यवसायालाही बसल्याने त्याचा थेट परिणाम वृत्तपत्रांच्या रद्दीवर झाला आहे. वृत्तपत्र रद्दीच्या दरात तिपटीने वाढ होऊनही रद्दी उपलब्ध होत नसल्याने द्राक्ष निर्यातदार शेतकरी हतबल झाले आहे (Grape Farmers Having Trouble Due To Newspaper Junk Price Hike).

द्राक्षाचे माहेरघर असलेल्या नाशिक जिल्ह्यामध्ये सध्या द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना वृत्तपत्र रद्दी टंचाईला सामोरे जावे लागत आहे. मागील वर्षी द्राक्ष हंगामामध्ये 18 ते 20 रुपये प्रति किलो विक्री होणारी रद्दी आता 45 ते 50 रुपये प्रति किलोने विकली जात आहे. रद्दीच्या भावात तीन पट वाढ झाली असून पैसे देऊनही रद्दी मिळत नसल्याने ‘रद्दी देता का रद्दी’ अशी म्हणण्याची वेळ प्रथमच शेतकऱ्यांवर आली आहे.

कोरोनामुळे अनेक दिवस वृत्तपत्र छपाई न झाल्याने त्याचा थेट परिणाम रद्दीवर झालेला आहे. वृत्तपत्रामुळे कोरोना संसर्ग होण्याचा धोका संभवतो, अशी अफवा सोशल मीडियाव्दारे पसरवण्यात आली होती. याचा एकूणच परिणाम वृत्तपत्र छपाई आणि खपावर झाला होता.

निफाड तालुक्यातील द्राक्ष उत्पादक आणि व्यापारी यांच्याकडून वृत्तपत्र रद्दीला मोठी मागणी आहे. निर्यातक्षम द्राक्ष घडाचे उन्हापासून आणि धुळीपासून सरंक्षण करण्यासाठी द्राक्ष उत्पादक द्राक्ष घडा भोवती वृत्तपत्राचा कागद गुंडाळतात. घडांच्या संख्येनुसार द्राक्ष बागेला एकरी 400 ते 500 किलोग्रॅम रद्दीची गरज असते. रद्दीच्या भावात तीन पट वाढ झाल्याने द्राक्ष उत्पादकांचा खर्च वाढला आहे.

Grape Farmers Having Trouble Due To Newspaper Junk Price Hike

संबंधित बातम्या :

नोकरीला रामराम करतं माढ्यातील शिरसट दाम्पत्यानं पोल्ट्री व्यवसायात करुन दाखवलं

किसान सन्मान निधीचे पैसे मिळाले नसतील तर आजच करा ‘या’ गोष्टी

लय भारी! शेतकऱ्यांसाठी एमओएफएसने दिली ‘ही’ खूश खबर!

राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज
मी कोणालाही घाबरत नाही, मला मारण्याची.. जैन मुनींच राज ठाकरेंना चॅलेंज.