Papaya Leaf | आरोग्यवर्धक पपईच्या पानांचा रसही गुणकारी, वाचा याचे फायदे…

पपईच्या झाडाचा प्रत्येक भाग आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. केवळ पपईचे फळच नाही तर, त्याची पानेही सर्वाधिक खाल्ली जातात.

  • टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम
  • Published On - 16:44 PM, 21 Jan 2021
Papaya Leaf | आरोग्यवर्धक पपईच्या पानांचा रसही गुणकारी, वाचा याचे फायदे...

मुंबई : पपईच्या फायद्यांबद्दल आपल्या सर्वांनाच माहित आहे. पपई हे फळ खाण्यास खूप चविष्ट आहेच, तसेच आरोग्यासाठीही फायदेशीर आहे. पपईमध्ये अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. ज्यामुळे पपईच्या झाडाचा प्रत्येक भाग आपल्या आरोग्यासाठी फायदेशीर आहे. केवळ पपईचे फळच नाही तर, त्याची पानेही सर्वाधिक खाल्ली जातात. पपईच्या पानांचा रस शरीरातील प्लेटलेट्स वाढवण्यासाठी उत्तम घरगुती उपाय आहे (Health Benefits of Papaya Leaf).

गेल्या काही वर्षात पपईच्या पानांचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे. ही पाने आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. पपईच्या पानांमध्ये पॅपिन इंझाइमचे प्रमाण भरपूर असते, ज्यामुळे आपली पचन संस्था मजबूत बनते. या व्यतिरिक्त, यात अल्काइनचे प्रमाण जास्त असल्यामुळे डोक्यातील कोंडा आणि केस गळती रोखण्यासाठीही पपईची पाने गुणकारी ठरतात.

या व्यतिरिक्त पपईच्या पानांत ए, सी, ई, के आणि बी ही जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात आहेत. आपण इच्छित असल्यास, चहा, रस आणि गोळ्याच्या रूपात पपईच्या पानांचे सेवन करू शकता. पपईच्या पानांमुळे तुम्ही अनेक प्रकारचे आजार टाळू शकता.

डेंग्यूची लक्षणे कमी करते.

पपईची पाने खाल्ल्यास डेंग्यूच्या वेळी येणारा ताप आणि डोकेदुखीपासून आराम मिळतो. रक्तातील प्लेटलेट्स वाढण्यास देखील मदत होते. तथापि, डेंग्यूवर अद्याप कोणतेही उपचार उपलब्ध नाहीत. एका अभ्यासात असेही समोर आले आहे की, पपईच्या पानांचे सेवन केल्यास रक्तातील प्लेटलेट्स वाढतात (Health Benefits of Papaya Leaf).

पचन संस्था मजबूत होते.

पपईच्या पानांचे सेवन केल्याने गॅस, जळजळ, अपचन आणि बद्धकोष्ठता या समस्या निर्माण होत नाही. पपईत भरपूर फायबर असते, जे आपले पचन मजबूत करण्यास मदत करते. तसेच पपई आपल्या शरीरात प्रथिने पचवण्यात मदत करतो, ज्यामुळे अन्न चांगले पचते.

केस गळतीची समस्या कमी होते.

पपईची पाने खाल्ल्याने तुमचे केस अधिक मजबूत होतात आणि स्काल्पमध्ये नवीन केस येतात. केस गळती टाळण्यासाठी अँटी-ऑक्सिडंटयुक्त पदार्थांचे सेवन केले पाहिजे. पपईच्या पानांमध्ये अँटी-फंगल गुणधर्म असतात, जे डोक्यातील कोंड्याची समस्या दूर करण्याचे काम करतात.

पपईच्या पानांचा रस कसा बनवावा?

रस तयार करण्यासाठी आपल्याला पपईची पाने आणि थोडेसे पाणी आवश्यक आहे. यासाठी प्रथम पपईच्या पानांचे लहान तुकडे करा आणि ते मिक्सरच्या भांड्यात टाकून, त्यामध्ये थोडे पाणी घाला. त्यात थोडासे मीठ किंवा आयुर्वेदिक चूर्ण घाला, झाला तुमचा रस तयार आहे. आपण चवीनुसार मीठ किंवा साखरही घालू शकता.

(टीप : सेवनापूर्वी डॉक्टरांचा सल्ला अवश्य घ्यावा.)

(Health Benefits of Papaya Leaf)

हेही वाचा :