Nipah Virus Precautions: निपाह व्हायरसमुळे अवघ्या 24 ते 48 तासांत कोमात जावू शकता, वाचा उपाय काय?

| Updated on: Sep 08, 2021 | 7:46 AM

कोरोनामुळे आता जगभरात निपाह व्हायरस सर्वांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या व्हायरसमुळे एखादी व्यक्ती अवघ्या 24 ते 48 तासांत कोमात जावू शकतो, असं सांगितलं जात आहे. (How Can Nipah Virus Infection Be Prevented And How Does It Spread)

Nipah Virus Precautions: निपाह व्हायरसमुळे अवघ्या 24 ते 48 तासांत कोमात जावू शकता, वाचा उपाय काय?
Nipah Virus Infection
Follow us on

नवी दिल्ली: कोरोनामुळे आता जगभरात निपाह व्हायरस सर्वांसाठी डोकेदुखी ठरत आहे. या व्हायरसमुळे एखादी व्यक्ती अवघ्या 24 ते 48 तासांत कोमात जावू शकतो, असं सांगितलं जात आहे. 1998मध्ये हा व्हायरस सर्वात आधी फैलावला होता. त्यावेळी या व्हायरसमुळे शेतकरी आणि डुकरांमध्ये मेंदूज्वराची लक्षणे आढळली होती. प्राणी आणि मनुष्यांमध्ये फैलावणारा हा आजार आहे. त्याचा मृत्यूदर हा कोरोनापेक्षाही अधिक असल्याचं तज्ज्ञांचं म्हणणं आहे. (How Can Nipah Virus Infection Be Prevented And How Does It Spread)

म्हैसूरच्या कोलंबिया आशिया रुग्णालयाचे सल्लागार डॉ. सतिश कुमार यांनी या निपाह व्हायरसशी संबंधित काही माहिती दिली आहे. ‘नवभारत टाईम्स’ने तसे वृत्त दिलं आहे. सर्वात आधी हा व्हायरस डुकरांमध्ये फैलावला होता. त्यानंतर 2004मध्ये बांगलादेशात खजूर खाल्ल्याने हा रोग फैलावला होता. कारण हे खजूर वटवाघळाने खाऊन उष्टे केले होते. डॉ. सतीश यांच्या म्हणण्यानुसार, या गंभीर आजारावर आतापर्यंत कोणतीही थेरपी शोधून काढण्यात आलेली नाही. तसेच कोणतीही व्हॅक्सीन तयार करण्यात आलेली नाही. त्यामुळे या व्हायरसपासून स्वत:चा बचाव करत राहणं हाच एकमेव मार्ग आहे. कशा प्रकारे या व्हायरसपासून बचाव करायचा? जाणून घेवूया.

लागण कशामुळे?

वटवाघळांनी खाऊन फेकलेल्या फळांमुळे निपाह व्हायरसचा फैलाव होतो. तसेच जे लोक डुकराचं कच्च मांस खातात त्यांनाही या व्हायरसची लागण होऊ शकते. तसेच डुकराच्या मांसाची विक्री करण्याच्या व्यवसायाशी संबंधित असलेल्यांनाही हा आजार होऊ शकतो. एखाद्या व्यक्तीला या व्हायरसची लागण झाली असेल आणि त्याची एखादी व्यक्ती सुश्रुषा करत असेल तर त्या व्यक्तीलाही या आजाराची लागण होऊ शकते.

निदान कसे?

आरटीपीसीआर टेस्ट करून या व्हायरसचा तपास केला जाऊ शकतो. गळा, नाक, मूत्र, आणि रक्त घेऊन या व्हायरसचा तपास केला जाऊ शकतो. व्हायरसची लागण झाल्यानंतर दोन आठवड्यानंतर अँटीबॉडीजचाही तपास केला जाऊ शकतो. मात्र, साधारणपणे हे परीक्षण उपलब्ध नाहीये. त्याशिवाय टिश्यू इम्युनोहिस्टोकेमिस्ट्री सुद्धान निदान करण्याची एक पद्धत आहे. परंतु, ही अत्यंत दुर्लभ गोष्ट आहे. या व्हायरसबाबतची सर्वात मोठी समस्या म्हणजे त्याच्यावर नेमका काय उपचार करायचा? हे अजून कुणालाच माहीत नाहीये. त्यामुळे केवळ सतर्क राहून आणि आलेल्या मार्गदर्शक सूचनांचं पालन करून या व्हायरसपासून बचाव केला जाऊ शकतो.

लक्षणे निश्चित नाही

तज्ज्ञांच्या मते निपाह व्हायरसची निश्चित अशी लक्षणे नाहीत. त्यामुळे हा व्हायरस ओळखता येत नाही. मात्र, काही लक्षणे आढळल्यास त्यावर तातडीने उपचार करणं आवश्यक आहे. जर तुम्हाला ताप, डोकेदुखी, स्नायूंमध्ये वेदना, पोटदुखी, घाबरट होणे, उलटी होणे अशा काही समस्या जाणवत असतील तर त्याचं गांभीर्य समजून घेतलं पाहिजे. या व्हायरसची एखाद्या व्यक्तीला लागण झाली तर ती व्यक्ती अवघ्या 24 ते 48 तासात कोमात जावू शकते. या शिवाय व्हायरसच्या विळख्यात सापडलेली व्यक्तीमध्ये व्यक्तिमत्वातील बदलासह दीर्घकाळासाठी परिणाम दिसून येऊ शकतात.

व्हायरसाच फैलाव होऊ नये म्हणून हे करा

>> वटवाघळाच्या शरीरातील तरल पदार्थ किंवा त्यांनी खाल्लेल्या उष्टया पदार्थांचं सेवन करू नका.
>> ज्या ठिकाणी खजुराची झाडे आहेत, तिथल्या सार्वजनिक ठिकाणी पाणी पिऊ नका.
>> संक्रमित व्यक्तीपासून अंतर ठेवा आणि योग्य उपाय करा. उदा. जेवणापूर्वी हात धुवून घ्या, बाहेरून आल्यानंतर तोंड स्वच्छ धुवून काढा किंवा आंघोळ करा.
>> डुकराचं मांस किंवा त्यापासून बनवलेले पदार्थ खाऊ नका.
>> ज्या लोकांमध्ये निपाह संसर्ग असल्याचं वाटतं त्यांच्यापासून दूर राहा. त्यांनी वापरलेले भांडे, कपडे, बाथरूम किंवा टॉयलेटचा वापर करू नका.
>> हेल्थ केअर वर्कर्सनी अशा लोकांवर उपचार करताना मास्क, ग्लोव्हजचा कटाक्षाने वापर करावा.
>> ज्या ठिकाणी वटवाघळे अधिक आहेत किंवा वटवाघळांचे मलमूत्रं असण्याची शक्यता आहे, अशा ठिकाणी जाऊ नका.

बचाव कसा कराल?

>> चांगल्या हायजीनचं पालन करा आणि वारंवार हात धूत राहा
>> फळांपासून दूर राहा. केवळ चांगलं शिजवलेलं अन्नच खा. शक्यतो घरी बनवलेलं जेवणच घ्या.
>> सार्वजनिक ठिकाणी जाताना मास्क लावा. ज्या ठिकाणी संक्रमित लोक आहेत, अशा ठिकाणी जाऊ नका.
>> सतर्क राहा आणि कोणताही त्रास जाणवल्यास डॉक्टरांकडे जा.
>> ज्या ठिकाणी अंधार आहे, अशा ठिकाणी जावू नका. त्या ठिकाणी वटवाघळ असण्याची शक्यता अधिक असते.
>> डुकराचं मांस खाऊ नका. त्यापासून बनणाऱ्या उत्पादनांपासून दूर राहा. (How Can Nipah Virus Infection Be Prevented And How Does It Spread)

 

संबंधित बातम्या:

Side Effects of Celery: या व्यक्तींनी ओवा खाणे टाळावे अन्यथा होऊ शकतात ‘हे’ दुष्परिणाम!

Corona Cases In India | देशात सक्रिय कोरोनाग्रस्तांची संख्या पुन्हा चार लाखांखाली, मात्र कोरोनाबळींत वाढ

Health Care : राग दूर करण्यासाठी ‘हे’ 4 सोपे मार्ग, स्ट्रेसची समस्या दूर होण्यासही मदत!

(How Can Nipah Virus Infection Be Prevented And How Does It Spread)