Menopause | मोनोपॉजची लक्षणं काय? कमी वयात मोनोपॉज ठरु शकतो धोकादायक!

| Updated on: Feb 10, 2021 | 10:45 PM

मासिक पाळी बंद होणं, यालाच मोनोपॉज किंवा रजोनिवृत्ती म्हणतात. (how to diagnose early menopause and its symptoms)

Menopause | मोनोपॉजची लक्षणं काय? कमी वयात मोनोपॉज ठरु शकतो धोकादायक!
Follow us on

मुंबई : मासिक पाळी…निसर्गानं प्रत्येक स्त्रीला दिलेली एक देणगी, मात्र, जिचा त्रास प्रत्येक महिन्याला स्रियांना सोसावा लागतो. मात्र, हा त्रास अचानक बंद होणं, म्हणजेच मासिक पाळी बंद होणंही धोकादायक ठरु शकतं. मासिक पाळी बंद होणं, यालाच मोनोपॉज किंवा रजोनिवृत्ती म्हणतात. स्रियांमध्ये वयाच्या 12 ते 15 व्या वर्षांपासून मासिक पाळी सुरु होते, म्हणजेच त्यावेळीपासून स्री गर्भधारणेसाठी योग्य होते. दर महिन्याला मासिक पाळी येते आणि वयाच्या 45 ते 50 व्या वर्षांपर्यंत ती सुरु राहते. मात्र, त्यानंतर ती अचानक बंद होते. काही महिलांमध्ये वयाच्या 30 किंवा 40 व्या वर्षीत मासिक पाळी बंद होते. पण या प्रक्रियेत नेमकं काय होतं? हे अनेकांना माहितीचं नसतं. (how to diagnose early menopause and its symptoms)

मोनोपॉजमध्ये नेमकं काय होतं?

ओव्हरी किंवा अंडाशयात प्रजननासाठी आवश्यक असणारे 2 हार्मोन्स असतात. एक एस्ट्रोजेन आणि दुसरा प्रोजेस्टेरॉन. मोनोपॉजमध्ये हे दोन्ही हार्मोन्स शरीरात तयार होणं बंद होतं आणि त्याचवेळी पाळी येणंही बंद होऊन मोनोपॉज येतो. मोनोपॉज हा कुठलाही आजार नाही. तर नैसर्गिकरित्या शरीरात होणारा हा एक बदल आहे. मात्र, हा मोनोपॉज वेळीआधी येत असेल तर ती एक गंभीर समस्या ठरु शकते.

वेळेआधी मोनोपॉजचं गांभीर्य लक्षात घ्या

मोनोपॉजदरम्यान महिलांच्या शरीरात अनेक बदल होतात. वेळेआधी आलेला मोनोपॉज आपल्यासोबत महिलांमध्ये चिडचिडेपणा, वजन वाढणं, थकवा, सतत भूकेची जाणीव यासारख्या समस्या घेऊन येतो. यातील सगळ्याच समस्या शारीरीक नसतात, तर काही मानसिक समस्याही होऊ शकतात. त्यामध्ये कसलीही भीती वाटणं, चिडचिड होणं हे होणं सहाजिक आहे.

भारतीय महिलांनो, अधिक सावधान

भारतीय महिलांमध्ये मोनोपॉज होण्याचा धोका अधिक असल्याचं एका संशोधनातून समोर आलं आहे. जवळपास 1 ते 2 टक्के भारतीय महिलांमध्ये वयाच्या 29 ते 34 व्या वर्षातच मोनोपॉज येऊ शकतो. तर 35 ते 39 व्या वर्षात हा आकडा 40 ते 50 टक्क्यांच्या घरात जातो.

मोनोपॉजमुळं कॅल्शियमचीही कमतरता

मोनोपॉजदरम्यान बऱ्याचदा एस्ट्रोजेनच्या स्राव कमी होतो. हे हार्मोन शरीरातील हाडांचं सुरक्षाकवच म्हणून काम करतं. मात्र, हा स्राव कमी झाल्याने हाडं ठिसूळ होतात, शरीरात कॅल्शियमची कमतरता होते. या क्रियेला मोनोपॉजल ऑस्टियोपोरोसिस म्हटलं जातं. त्यामुळं अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं असतं.

मोनोपॉजची लक्षणं काय?

मासिक पाळी अनियमित होणं, मासिक पाळीमध्ये अधिक रक्तस्राव होणं, शरीरात उष्णता वाढणं, हृदयाचे ठोके वाढणं, प्रायव्हेट पार्टमध्ये बदल होणं, गुप्तांगांची त्वचा कोरडी पडणं, झोप न येणं किंवा चिडचिडेपणा वाढणं. या समस्या मोनोपॉजची लक्षणं असू शकतात. त्यामुळं अशा समस्या तुम्हालाही जाणवत असतील तर तातडीने डॉक्टरांचा सल्ला घ्या. (how to diagnose early menopause and its symptoms)

टीप- डॉक्टरांच्या सल्ला आवश्यक

संबंधित बातम्या : 

Home Remedies | मासिक पाळी टाळण्याऱ्या औषधांचे आरोग्यावर गंभीर परिणाम, गोळ्यांऐवजी वापरा ‘हे’ घरगुती उपाय!

मासिक पाळीच्या त्रासापासून सुटका मिळण्यासाठी काही घरगुती उपाय