Kidney Health : ‘या’ लोकांची किडनी होते लवकर खराब, डोळ्यांच्या आसपास दिसत असतील ही लक्षणं तर…

| Updated on: Mar 14, 2024 | 7:48 PM

World Kidney Day 2024 : किडनी हा आपल्या शरीराचा एक महत्त्वाचा अवयव आहे. त्याचे कार्य बिघडले तर शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतो. ही लक्षणे दिसत असतील तर ते किडनी खराब होण्याचे संकेत असू शकतात.

Kidney Health : या लोकांची किडनी होते लवकर खराब, डोळ्यांच्या आसपास दिसत असतील ही लक्षणं तर...
Follow us on

World Kidney Day 2024 : आज ‘जागतिक किडनी डे’ (World Kidney Day) आहे. दरवर्षी मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात जागतिक किडनी दिवस साजरा केला जातो. जगभरात किडनीचा आजार असलेल्या लोकांची संख्या वेगाने वाढत आहे. काही लोकांना किडनी खराब होण्याची खूप भीती असते. पणकोणत्या लोकांना किडनीच्या आजाराची जास्त भीती असते ? अनेक संशोधनातून असे समोर आले आहे की 2 प्रकारच्या लोकांना किडनीच्या आजाराची जास्त भीती असते. त्याची सुरुवातीची लक्षणेही शरीरावर दिसून येतात.

मधुमेहाचे रुग्ण

ज्या लोकांना मधुमेह आणि हाय ब्लड प्रेशरचा त्रास आहे, त्यांना किडनी खराब होण्याचा धोका अधिक असतो. फक्त मधुमेहाच्या रुग्णांबद्दल बोलायचं झालं तर त्यांच्या ब्लड शुगरची पातळी नियंत्रणात ठेवणे हे किडनी सेल्स अर्थात नेफ्रॉनला धोका पोहोचवू शकते. ज्यामुळे किडनीचे कार्य बरेच खराब होऊ शकते. किंवा त्यामुळे किडनीही खराब होऊ शकते.

किडनी खराब होण्याची कोणती लक्षणे दिसतात ?

– लघवी करताना वेदना आणि जळजळ होणे

– डोळ्यांच्या आसपासच्या भागात सूज येणे, हे किडनीच्या आजाराचे सुरूवातीचे लक्षण असू शकते.

– भक न लागणे, काही खाण्याची इच्छा न होणे, स्नायूंमध्ये तीव्र वेदना होणे.

– यूटीआय तसेच किडनी स्टोनचा त्रास होणे, किडनी डॅमेज होणे

कोणाला असतो किडनी खराब होण्यचा धोका ?

– लठ्ठपणाचा सामना करणारे लोक. लठ्ठ व्यक्तींना किडनीच्या आजाराचा धोका जास्त असतो. त्यामुळे लठ्ठपणावर नियंत्रण ठेवणे सर्वात महत्त्वाचे आहे. किडनीच्या चाचण्या वेळोवेळी करून घ्या.

– शरीर शक्य तितके हायड्रेटेड ठेवा. मूत्रपिंडातील घाण बाहेर पडावी यासाठी दररोज कमीत कमी दोन ते तीन लिटर पाणी प्यावे.

– जास्त प्रोटीनन्स खाऊ नयेत. प्रोटीन सप्लीमेंट्स वापरू नका. त्यामुळे किडनीवर दबाव येतो.

– धूम्रपान किंवा मद्यपान करू नका.

( डिस्क्लेमर : या आर्टिकलमध्ये देण्यात आलेली माहिती व उपाय हे सामान्य ज्ञानावर आधारित आहेत. आमचा याला दुजोरा नाही. ते अवलंबण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला जरूर घ्यावा.)