Health Care : मधुमेह व पायाचे आजार आणि उपचार जाणून घ्या डाॅक्टरांकडून सविस्तरपणे! 

| Updated on: Mar 31, 2022 | 6:00 AM

मधुमेह (Diabetes) हा आजच्या काळात झपाट्याने पसरणारा आजार आहे. जो सर्व वयोगटातील लोकांना होताना दिसतो आहे. अनेकदा मधुमेही रुग्णांना त्यांच्या खाण्यापिण्याशी संबंधित अनेक सवयींवर नियंत्रण (Control) ठेवावे लागते. मधुमेह झाल्यानंतर माणसाला त्यांच्या खाण्याच्या वेळा आणि आहारामध्ये नेमके काय खातो आहेत. यावर विशेष लक्ष हे द्यावे लागते.

Health Care : मधुमेह व पायाचे आजार आणि उपचार जाणून घ्या डाॅक्टरांकडून सविस्तरपणे! 
मधुमेहामध्ये आरोग्याची काळजी कशी घ्यावी जाणून घ्या.
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : मधुमेह (Diabetes) हा आजच्या काळात झपाट्याने पसरणारा आजार आहे. जो सर्व वयोगटातील लोकांना होताना दिसतो आहे. अनेकदा मधुमेही रुग्णांना त्यांच्या खाण्यापिण्याशी संबंधित अनेक सवयींवर नियंत्रण (Control) ठेवावे लागते. मधुमेह झाल्यानंतर माणसाला त्यांच्या खाण्याच्या वेळा आणि आहारामध्ये नेमके काय खातो आहेत. यावर विशेष लक्ष हे द्यावे लागते. मधुमेहाला सुरूवात झाली की, पायांचे अनेक आजार होण्यास देखील सुरूवात होते. मधुमेह झाल्यावर कुठल्या गोष्टी फाॅलो कराव्या आणि नेमकी काय काळजी (Care) घ्यावी, यासर्व संदर्भात प्रसिध्द डाॅ. प्रदीप तळवळकर आणि डाॅ अरूण बाळ यांनी काही खास टिप्स सांगितल्या आहेत.

भारतामध्ये मधुमेहाची रूग्ण संख्या झपाट्याने वाढते

आज संपूर्ण जगात साधाऱण 54 कोटी मधुमेहाची रूग्णे आहेत. त्यापैकी 8 कोटींहून जास्त रूग्ण हे फक्त भारतामध्ये आहेत आणि ही अत्यंत धोक्याची घंटा आहे. जगामध्ये मधुमेही रूग्णांमध्ये भारताचा दुसरा क्रमांक आहे. धोकादायक म्हणजे आपल्या देशातील मधुमेहींची संख्या ही फार झपाट्याने वाढताना दिसत आहे. हे असेच सुरू राहिले तर भारत हा मधुमेहाची राजधानी होऊ शकतो. डाॅ. प्रदीप तळवळकर म्हणाले की, जी व्यक्ती मधुमेहाचा ज्ञान जास्तीत-जास्त संपादन करेल आणि त्यानंतर आपल्या जीवनशैलीमध्ये बदल करेल ती व्यक्ती जास्तीत-जास्त जगेल.

मधुमेहाचा पायावर होणार परिणाम

मधुमेहाच्या समस्येमध्ये जेंव्हा तुमच्या शरीरातील साखर वाढते. त्यावेळी त्याचा तुमच्या शरीरावर परिणाम होते आणि यामुळे मधुमेही रूग्णांचे पाय सुजतात. तसेच जेंव्हा शरीरातील साखर वाढते, त्यावेळी मधुमेही रूग्णाला वेगवेगळ्या वेदना होण्यास सुरूवात होते. विशेष: या वेदना रात्रीच्या वेळी जास्त करून होतात. मात्र, हे फक्त एका स्टेपपर्यंत होते. त्यानंतर स्टेप पुढे गेली की, मंजापेशी निकामी होतात आणि त्यानंतर रूग्णाचे अवयव निकामी होऊ लागतात. म्हणजे जर रूग्णाला चालताना खडा वगैरे पायाला लागला तरीही  ते कळत नाही.

मधुमेह नियंत्रित करण्यासाठी टिप्स

-नियमित व्यायाम नियंत्रित कार्बोहायड्रेटचे सेवन नियंत्रित करा.

-शरीराचे वजन नियंत्रित करा

-फायबरचे सेवन नियमित कमी प्रमाणात करा

-तणाव नियंत्रित करा

-पुरेसे पाणी प्या.

-पुरेशी झोप घ्या

-तुमच्या आहारात क्रोमियम आणि मॅग्नेशियमचा समावेश करा

-आहारात अॅपल सायडर व्हिनेगर आणि दालचिनीचा अर्क समाविष्ट करा.

संबंधित बातम्या : 

सुंदर आणि चमकदार त्वचा मिळवण्यासाठी टोनर अत्यंत फायदेशीर, टोनर वापरण्याची पद्धत जाणून घ्या!

Health Care : जाणून घ्या लवंगचे जबरदस्त फायदे आणि अधिक सेवन करण्याचे तोटे!