Allergies & Asthma : अॅलर्जी आणि अस्थमा म्हणजे नेमके काय, उपाय आणि उपचार जाणून घ्या डाॅक्टरांकडून!

| Updated on: Mar 30, 2022 | 6:00 AM

अस्थमाबद्दल (Asthma) जागरूकता होण्यासाठी आणि योग्य उपचार आणि उपचारांनी हा आजार कसा नियंत्रित केला जाऊ शकतो. याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत, प्रसिध्द डाॅक्टर रिना यांच्याकडून. दमा हा फुफ्फुसाचा एक जुनाट आजार असतो. अ

Allergies & Asthma : अॅलर्जी आणि अस्थमा म्हणजे नेमके काय, उपाय आणि उपचार जाणून घ्या डाॅक्टरांकडून!
दमा आणि अॅलर्जीच्या रूग्णांनी अशाप्रकारे घ्यावी आरोग्याची काळजी.
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : अस्थमाबद्दल (Asthma) जागरूकता होण्यासाठी आणि योग्य उपचार आणि उपचारांनी हा आजार कसा नियंत्रित केला जाऊ शकतो. याबद्दल आज आपण सविस्तर जाणून घेणार आहोत, प्रसिध्द डाॅक्टर रिना यांच्याकडून. दमा हा फुफ्फुसाचा एक जुनाट आजार असतो. अस्थमा, दमा यामध्ये प्रामुख्याने श्वास घेण्यासाठी त्रास (Trouble) होतो. बऱ्याच लोकांना लहाणपणीच दम्याचा त्रास सुरू होतो. मात्र, आपल्याकडे सुरूवातीला याकडे सर्रासपणे दुर्लक्ष (Ignore) केले जाते. जसे जसे वय वाढते तसा दम्याचा त्रास कमी होईल, अशा एक गैरसमज आहे.

रोगप्रतिकारक शक्तीची महत्वाची भूमिका-

दम्याच्या आजारामध्ये रोगप्रतिकारक शक्तीची महत्वाची भूमिका असते. आपली रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे खूप जास्त आवश्यक आहे. जर आपली रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाली असेल तर आपले शरीर छोट्या छोट्या गोंष्टीमध्ये आजारी होते. जसे की, थंडीमध्ये बाहेर गेलो की, लगेचच ताप, सर्दी येणे. यामुळे आपल्या शरीराची रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होते आणि आपल्याला अॅलर्जीचा त्रास सुरू होतो.

दम्या म्हणजे नेमके काय आणि दम्याची लक्षणे-

रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत झाल्यामुळे सतत सर्दी आणि ताप आल्यामुळे सूज श्वास नलीकेपर्यंत जाते. त्यावेळी श्वास नलीकेवर एक सूज येते आणि आपल्याला श्वास घेण्यास आणि सोडण्यास त्रास होतो. त्यालाच दम्या किंवा अस्थमा असे म्हणतात. सुरूवातीला दम्याच्या समस्येकडे अनेकजण दुर्लक्ष करतात. यामुळे हळूहळू समस्या गंभीर बनत जाते. सध्याच्या जीवनशैलीमध्ये लहान मुलांमध्ये देखील दम्याचे प्रमाण वाढले आहे. मात्र, लहान मुलांचा दमा कालांतराने कमी होतो. परंतू मुलांना श्वास घेण्यास किंवा सोडण्यास त्रास होत असेल तर डाॅक्टरांचा सल्ला घेणे कधीही चांगलेच.

दम्याचा त्रास असलेल्या व्यक्तीने काय करावे?

दमा असलेल्या व्यक्तीने औषधोपचाराचे योग्य पालन केले पाहिजे आणि नेब्युलायझर आणि इनहेलर नेहमी हातात ठेवावे. दमा असलेल्या लोकांनी स्वच्छ वातावरणात राहावे आणि शक्य तितकी ताजी हवा घ्यावी. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अस्थमाच्या रुग्णांनी त्यांच्या आरोग्याविषयी जागरुक असले पाहिजे जेणेकरुन ते शक्य तितक्या लवकर कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाऊ शकतील. अनेक वेळा लोक नेब्युलायझर सोबत ठेवण्यास विसरतात. यामुळे आरोग्याला धोका देखील होऊ शकतो.

संबंधित बातम्या : 

IAS Sonal Goel : एक अशी महिला IAS जिनं ‘वजन’ घटवण्यात आनंद मानला, कसा? पाहा फोटो

Health Care : शरीरातील व्हिटामिन डी वाढवण्यासाठी या खास पेयांचा आहारात समावेश करा!