IAS Sonal Goel : एक अशी महिला IAS जिनं ‘वजन’ घटवण्यात आनंद मानला, कसा? पाहा फोटो

आज अत्यंत कमी वयामध्ये डायबिडीज, शूगर आणि संधिवात असे अनेक आजार होत आहेत. त्याचे मुळ कारण म्हणजे आपली बदललेली जीवनशैली (Lifestyle) आहे. रात्री जागरण, व्यस्त जीवनशैली, व्यायामाचा अभाव, फास्ट फूड आणि मर्यादीत हालचाली यामुळे आपल्या आरोग्यावर (Health) वाईट परिणाम होतो आहे.

IAS Sonal Goel : एक अशी महिला IAS जिनं 'वजन' घटवण्यात आनंद मानला, कसा? पाहा फोटो
सोनल गोयल यांनी काही दिवसांमध्ये तब्बल 14 किलो वजन केले कमीImage Credit source: Instagram
Follow us
| Updated on: Mar 29, 2022 | 1:39 PM

मुंबई : आज अत्यंत कमी वयामध्ये डायबिडीज, शुगर आणि संधिवात असे अनेक आजार होत आहेत. त्याचे मुळ कारण म्हणजे आपली बदललेली जीवनशैली (Lifestyle) आहे. रात्री जागरण, व्यस्त जीवनशैली, व्यायामाचा अभाव, फास्ट फूड आणि मर्यादीत हालचाली यामुळे आपल्या आरोग्यावर (Health) वाईट परिणाम होतो आहे. सध्याच्या धावपळीच्या जगामध्ये कोणालाही आपल्या फिटनेसकडे लक्ष देण्यासाठी वेळ राहिला नाहीये. याचाच दुष्यपरिणाम म्हणजे आपले वजन झपाट्याने वाढते. वजन वाढणे (Weight gain) सोप्पे आहे. पण वजन कमी करणे अत्यंत अवघड काम आहे. मात्र, एका IAS महिला अधिकारीने आपल्या व्यस्त शेड्यूलमधून वेळ काढत तब्बल 14 किलो वजन कमी केले आहे.

सोनल गोयल यांनी 14 किलो वजन केले कमी

सोनल गोयल (Sonal Goel) असे या महिला आयएएस अधिकाऱ्याचे नाव आहे. 2008 मध्ये यूपीएससीमध्ये भारतामध्ये त्या 13वी रँक मिळवून प्रशासकीय सेवेत रुजू झाल्या आहेत. त्यांची पहिली पोस्टिंग त्रिपुरामध्ये असिस्टंट कलेक्टर म्हणून होती. सध्या त्या त्रिपुरा भवन, दिल्ली येथे निवासी आयुक्त पदावर कार्यरत आहेत. आपण बऱ्याच लोकांचे ऐकतो की, मला वजन कमी करायचे आहे, मात्र, व्यस्त जीवनशैलीमध्ये वजन कमी करण्यासाठी वेगळ मिळत नाही. मात्र, सोनल गोयल यांनी बिझी शेड्यूलमधून वेळ काढत आपले तब्बल 14 किलो वजन हे कमी केले आहे.

बाहेरील खाद्यपदार्थ खाणे पूर्णपणे बंद

यासंदर्भात आपला आहार, व्यायाम आणि वजन कमी करण्यासाठी काही खास टिप्स सोनल गोयल यांनी आजतक ला बोलताना सांगितल्या आहेत. सोनम गोयल यांचे लग्न 2009 साली झाले आहे. 2013 मध्ये त्यांना पहिले बाळ झाले आणि त्यानंतर त्यांचे वजन हे सातत्याने वाढत गेले. त्यांनी वेळ काढून घरीच व्यायाम करण्यास सुरूवात केली. त्यावेळी त्यांनी जवळपास 15 किलो वजन कमी केले. 2018 मध्ये त्यांना दुसरे बाळ झाले आणि परत वजन वाढले. वजन कमी करण्यासाठी त्यांनी झुंम्बा, योगा आणि व्यायामास सुरूवात केली. खाण्यावर देखील थोडे लक्ष दिले. विशेष म्हणजे यादरम्यान त्यांना बाहेरील खाद्यपदार्थ खाणे पूर्णपणे टाळले.

शक्य तितके जास्त चालण्याचा प्रयत्न करा! 

आॅफिसच्या मिटिंगमध्ये येणारे फास्ट फूड, चहा हे देखील टाळले. या काही टिप्स फाॅलो करत त्यांनी 13-14 किलो वजन कमी केले. गोयल यांनी आपल्या आहारामध्ये घरगुती जेवन आणि फळांचा अधिक समावेश केला. यामुळे वजन कमी होण्यास मदत झाली. गोयल यांनी वजन कमी करण्याविषयी सांगितले की, बऱ्याच लोकांना जिममध्ये जाण्यासाठी वेळ मिळत नाही. मग अशावेळी आपण गार्डनमध्ये चालणे, योगा, जंपिंग वगैरे घरीच केले पाहिजे. आपल्याला काही कामानिमित्त बाहेर जायचे असेल तर आपण शक्यतो पायीच जायला हवे, यामुळे काम करताना देखील आपल्या शरीराचा व्यायाम होतो.

संबंधित बातम्या : 

Health Care : शरीरातील व्हिटामिन डी वाढवण्यासाठी या खास पेयांचा आहारात समावेश करा!

संधिवात म्हणजे नेमके काय, लक्षणे आणि उपचार कसे करायचे हे जाणून घ्या डाॅक्टरांकडूनच!

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.