ओमिक्रॉनपासून दूर राहण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी जीवनशैलीमध्ये ‘हे’ प्रमुख बदल करा!

| Updated on: Dec 05, 2021 | 10:15 AM

कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटने देशात एन्ट्री घेतली आहे. आतापर्यंत संपूर्ण भारतामध्ये 4 ओमिक्रॉनचे (Omicron Variant) रूग्ण सापडले आहे. यामुळे आता लोकांनी ओमिक्रॉनची चांगलीच भिती घेतली आहे. कारण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा चांगलाच फटका भारतामध्ये बसला होता.

ओमिक्रॉनपासून दूर राहण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी जीवनशैलीमध्ये हे प्रमुख बदल करा!
मास्क
Follow us on

मुंबई : कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटने देशात एन्ट्री घेतली आहे. आतापर्यंत संपूर्ण भारतामध्ये 4 ओमिक्रॉनचे (Omicron Variant) रूग्ण सापडले आहे. यामुळे आता लोकांनी ओमिक्रॉनची चांगलीच भिती घेतली आहे. कारण कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा चांगलाच फटका भारतामध्ये बसला होता. ओमिक्रॉनपासून दूर राहण्यासाठी देखील रोगप्रतिकारक शक्ती मजबूत असणे खूप आवश्यक आहे. ओमिक्रॉनपासून दूर राहण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपण काही खास टिप्स फाॅलो केल्या पाहिजेत.

किमान 50 मिनिटे व्यायाम करा

निरोगी राहण्यासाठी आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी आपण किमान 50 मिनिटे व्यायाम केला पाहिजे. यामध्ये आपण योगा, चालणे, पळणे, सायकलिंग, पोहणे आणि झुम्बा असा प्रकारचे व्यायाम करू शकता. व्यायामासाठी असा कुठला विशिष्ट वेळ नसतो. मात्र, सकाळीच्या वेळी व्यायाम करणे आपल्या शरीरासाठी अधिक फायदेशीर असते.

मास्क सर्वात महत्वाचे

ओमिक्रॉनपासून दूर राहण्यासाठी जसे रोगप्रतिकारक शक्ती महत्वाची आहे. तसेच मास्क आणि गर्दीच्या ठिकाणी न जाणे देखील महत्वाचे आहे. सध्याच्या काळात घराच्या बाहेर पडण्यापूर्वी मास्क तोंडाला लावणे खूप महत्वाचे आहे. गर्दीच्या ठिकाणी जसे की, सार्वजनिक कार्यक्रम अशा ठिकाणी जाणे टाळाच.

आहारामध्ये 2 हिरव्या भाज्यांचा समावेश

शरीरामध्ये कोणत्याही व्हिटामिनची कमी होऊ नये. याकरीता आपल्या दररोजच्या आहारामध्ये दोन हिरव्या पालेभाज्यांचा समावेश करा. यामुळे आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते. यामध्ये आपण पालक, ब्रोकोली, मेथी, शेपू यांचा समावेश करू शकता. ब्रोकोलीमध्ये लोह, जीवनसत्व ब आणि क मिळते आणि ते रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते.

हंगामी फळांचा आहारात समावेश

रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी दररोजच्या आहारामध्ये दोन हंगामी फळांचा समावेश करा. यामध्ये आपण स्ट्रॉबेरी, मोसंबी, संत्री, पपई, अननस यांचा समावेश करू शकता. स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटामिन आणि फायबरचे प्रमाण खूप जास्त असते. विशेष म्हणजे रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी स्ट्रॉबेरी गुणकारी आहे. सध्याच्या परिस्थितीमध्ये तर स्ट्रॉबेरी दररोज खाल्ल्यी पाहिजे. स्ट्रॉबेरीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढण्यास मदत होते.

लिंबू

आपल्या शरीराला दररोज व्हिटामिन सी ची आवश्यकता असते. व्हिटामिन सी शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यास मदत करते. यामुळे सध्याच्या हंगामात रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी लिंबाचा आहारात समावेश करा. आपण दररोज सकाळी कोमट पाण्यामध्ये  लिंबू मिक्स करू पिऊ शकता.

(टीप: या बातमीतील मजकूर प्राथमिक माहितीवर आधारित आहे, या माहितीचा वापर करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला घ्या)

संबंधित बातम्या : 

Health | ‘व्हिटामिन डी’ची कमतरता आरोग्यासाठी धोकादायक! ‘या’ पदार्थांचे सेवन ठरेल लाभदायक

Beauty Tips : कोपर आणि मान काळवंडलेयत? मग ‘या’ घरगुती टिप्स नक्की ट्राय करा!