मधुमेहाच्या रूग्णांनी डिहायड्रेशनची समस्या दूर करण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितलेल्या या टिप्स नक्कीच फाॅलो कराव्यात!

| Updated on: May 26, 2022 | 6:30 AM

अधिक पाणी पिऊन अथवा कॅफिन नसलेले पेय जसे नारळाचे पाणी, साधे ताक किंवा साखर विरहित लिंबू पाणी पिऊन शरीरातील पाण्याचे प्रमाण राखता येते. दारूचे सेवन कमीत कमी करावे कारण दारू निर्जलीकरण करते.मधुमेह असणाऱ्या लोकांना उष्णतेमुळे येणाऱ्या थकव्याचा धोका अधिक असतो आणि उष्णतेशी संबंधित परिस्थितीला ते संवेदनशील असतात. मधुमेह संबंधितकाही गुंतागुंत जसे की रक्तवाहिन्या आणि मज्जातंतू यांचे नुकसान यांचा परिणाम घाम निर्माण करणाऱ्या ग्रंथींवर होऊ शकतो.

मधुमेहाच्या रूग्णांनी डिहायड्रेशनची समस्या दूर करण्यासाठी तज्ज्ञांनी सांगितलेल्या या टिप्स नक्कीच फाॅलो कराव्यात!
Image Credit source: mensjournal.com
Follow us on

मुंबई : डिहायड्रेशन आणि मधुमेह (Diabetes) अनेक वेळा एकत्र दिसून येतात. ज्यावेळी सूर्य जास्त तळपत असतो आणि उष्णता जास्त असते. अशावेळी अनेक जणांवर डिहायड्रेशनचा प्रभाव पडू शकतो. मधुमेह असणाऱ्या लोकांना डिहायड्रेशनचा जास्त त्रास होण्याची शक्यता असते. ज्यावेळी शरीरामध्ये पुरेसे इन्सुलिन (Insulin) तयार होत नाही आणि रक्तात जास्त प्रमाणात साखर तयार होऊन त्याला शोषून घेण्यासाठी तुमचे मूत्रपिंड जास्त काम करत असतील तेव्हा मधुमेह होतो. जर तुमची मुत्रपिंड (Kidney) अधिक प्रमाणात काम करत असतील तर शरीर रक्तातील अतिरिक्त साखर मूत्र विसर्जनाद्वारे घालवते ज्याकरिता तुमच्या टिश्यूकडून द्रव घेतले जाते.

डिहायड्रेशनची समस्या

डॉक्टर शुभदा भनोत, प्रमुख मधुमेह प्रशिक्षक मॅक्स रुग्णालय असे म्हणतात की, मधुमेह असणाऱ्या लोकांना डिहायड्रेशन होण्याचा धोका अधिक असतो. कारण रक्तातील साखरेचे जास्त प्रमाण शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी करते. अधिक जास्त प्रमाणामध्ये द्रवपदार्थ घेऊन डिहायड्रेशनवर उपाय केला जाऊ शकतो. खूप जास्त प्रमाणात डिहायड्रेशन झाले असेल तर, वैद्यकीय आधारभूत सल्ला आहे की तुम्हाला अतिरिक्त इलेक्ट्रोलाइट्स दिले जाऊ शकतात.

हे सुद्धा वाचा

नारळ पाणी प्या

अधिक पाणी पिऊन अथवा कॅफिन नसलेले पेय जसे नारळाचे पाणी, साधे ताक किंवा साखर विरहित लिंबू पाणी पिऊन शरीरातील पाण्याचे प्रमाण राखता येते. दारूचे सेवन कमीत कमी करावे कारण दारू निर्जलीकरण करते. मधुमेह असणाऱ्या लोकांना उष्णतेमुळे येणाऱ्या थकव्याचा धोका अधिक असतो आणि उष्णतेशी संबंधित परिस्थितीला ते संवेदनशील असतात. मधुमेह संबंधित काही गुंतागुंत जसे की रक्तवाहिन्या आणि मज्जातंतू यांचे नुकसान यांचा परिणाम घाम निर्माण करणाऱ्या ग्रंथींवर होऊ शकतो ज्यामुळे शरीर प्रभावीरि‍त्या थंड होत नाही. यामुळे उष्माघात आणि उष्णतेचा थकवा येऊ शकतो. चक्कर येणे, मोठ्या प्रमाणात घाम येणे, स्नायूंना पेटका येणे, बेशुद्ध होणे, डोकेदुखी, हृदयाचे ठोके वाढणे आणि उलटी होणे ही सर्व थकव्याची लक्षणे आहेत.

व्यायाम करताना काळजी घ्या

व्यायाम करताना उष्णतेमध्ये बाहेर पळण्यासाठी जाण्यापेक्षा वातानुकूलितव्यायाम शाळेत ट्रेडमिलवर धावावे. अथवा सकाळच्या थंड वातावरणामध्ये घराबाहेर व्यायाम करावा. डिहायड्रेशन हा सर्वांसाठी काळजीचा विषय आहे आणि मधुमेह व डिहायड्रेशन त्यांच्या एकत्रीकरणामुळे आरोग्याच्या बाबतीत अनेक प्रकारची गुंतागुंत निर्माण होऊ शकते. बाहेर कितीही गर्मी असली तरीही डिहायड्रेशन टाळण्यासाठी काही साध्या उपाययोजना करून आपण आपल्या रक्तातील साखरेचे प्रमाण मर्यादित ठेवू शकतो आणि निरोगी व आनंदी राहू शकतो.अधिक माहितीसाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.