व्हिटॅमिन सी कॅप्सूल खात आहात? मग सावधान…वाचा याचे दुष्परिणाम

व्हिटॅमिन सी कॅप्सूल खात आहात? मग सावधान...वाचा याचे दुष्परिणाम
Image Credit source: istockphoto.com

अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की शरीरात व्हिटॅमिन सीची पातळी वाढल्याने किडनीवर परिणाम होऊ शकतो. शरीरात जमा होणारी अतिरिक्त जीवनसत्त्वे ऑक्सलेटच्या स्वरूपात मूत्रात बाहेर टाकली जातात. पण नेहमीच तसे नसते. कधीकधी ते शरीरातून बाहेर पडू शकत नाही.

टीव्ही 9 मराठी डिजीटल टीम

| Edited By: शितल मुंडे, टीव्ही 9 मराठी डिजीटल

May 25, 2022 | 10:50 AM

मुंबई : शरीराला निरोगी ठेवण्यासाठी पुरेशा प्रमाणात जीवनसत्त्वे (Vitamins) आणि खनिजे आवश्यक असतात. व्हिटॅमिन सी शरीराला रोगप्रतिकारक शक्ती विकसित करण्यासाठी आवश्यक आहे. जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर या जीवनसत्वाची कमतरता अजिबात होऊ देऊ नका. हे जीवनसत्व रोगप्रतिकारक शक्ती (Immunity) वाढवण्यास मदत करते. व्हिटॅमिन सीचा सर्वोत्तम स्त्रोत म्हणजे लिंबूवर्गीय फळे आहेत. इतर फळे आणि भाज्यांमध्ये व्हिटॅमिन सी असते, तर लिंबूमध्ये मोठ्या प्रमाणात असते. शरीराला व्हिटॅमिन सीची गरज असते. पण ती मागणी पूर्ण करण्यासाठी व्हिटॅमिन सीचा ओव्हरडोस (Overdose) व्हायला नको. शरीरात व्हिटॅमिन सीच्या कमतरतेमुळे हजारो आजार होतात, पण या जीवनसत्त्वाची पातळी वाढली तरी धोका असतो. तर जाणून घेऊयात व्हिटॅमिन सी वाढण्याची लक्षणे नेमकी कोणती आहेत.

हाडांच्या समस्या

शरीरात व्हिटॅमिन सीचे प्रमाण जास्त असल्यास हाडांवर हानिकारक प्रभाव पडतो. हाडांची झीज होण्याची शक्यता निर्माण होते. हाडांची वाढ थांबते आणि हाडांची निर्मिती खराब होते. यामुळेच कोणत्याही गोष्टीचा अतिरेक व्हायला नको.

पचनाच्या समस्या

पचनक्रिया सुधारण्यासाठी शरीराला पुरेशा प्रमाणात जीवनसत्त्वे आवश्यक असतात. त्याच प्रकारे, या जीवनसत्वाची पातळी वाढवणे प्रतिकूल असू शकते. जास्त प्रमाणात व्हिटॅमिन सी घेतल्याने पचनाच्या समस्या उद्भवू शकतात. या स्थितीचा शरीरातील इतर पोषक तत्वांवरही परिणाम होतो.

हे सुद्धा वाचा

किडनी स्टोन

अनेक अभ्यासातून असे दिसून आले आहे की शरीरात व्हिटॅमिन सीची पातळी वाढल्याने किडनीवर परिणाम होऊ शकतो. शरीरात जमा होणारी अतिरिक्त जीवनसत्त्वे ऑक्सलेटच्या स्वरूपात मूत्रात बाहेर टाकली जातात. पण नेहमीच तसे नसते. कधीकधी ते शरीरातून बाहेर पडू शकत नाही. मग ते मूत्रपिंडात जमा होऊ लागते आणि इथूनच मुतखड्याची समस्या उद्भवते.

Follow us on

Related Stories

Most Read Stories

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI

राज्य चुनें