72 व्या वर्षी पँक्रियाटिक कॅन्सरमुळे पंकज उधास यांचं निधन, ही लक्षणं दिसताच व्हा अलर्ट

| Updated on: Feb 28, 2024 | 1:46 PM

प्रसिद्ध गझल गायक, पंकज उधास यांचे सोमवारी (26 फेब्रुवारी) निधन झाले. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, ते बऱ्याच काळापासून आजारी होते. पंकज उधास यांचा मृत्यू स्वादुपिंडाच्या कर्करोगाने म्हणजेच पँक्रियाटिक कॅन्सरमुळे झाला असे सांगितले जात आहे. जास्त मद्यपान, धूम्रपान, जाडेपणा यामुळे या कॅन्सरचा धोका वाढतो.

72 व्या वर्षी पँक्रियाटिक कॅन्सरमुळे पंकज उधास यांचं निधन, ही लक्षणं दिसताच व्हा अलर्ट
Follow us on

मुंबई | 28 फेब्रुवारी 2024 : प्रसिद्ध गझल गायक, पंकज उधास यांचे सोमवारी (26 फेब्रुवारी) निधन झाले. वयाच्या 72 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, ते बऱ्याच काळापासून आजारी होते. भजन गायक आणि पंकज उधास यांचे मित्र अनुप जलोटा यांनी त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट करताना सांगितले की, पंकज उधास यांचा मृत्यू स्वादुपिंडाच्या कर्करोगाने अर्थात पँक्रियाटिक कॅन्सरमुळे झाला. गेल्या अनेक महिन्यांपासून ते या गंभीर आजाराशी झुंज देत होते, असेही ते म्हणाले. एका न्यूज चॅनेलशी बोलताना त्यांनी हा खुलासा केला. ‘ ज्या व्यक्तीने अनेक कॅन्सर रुग्णांना मदत केली, त्या व्यक्तीचा स्वतःचा कर्करोगाने मृत्यू झाला. हेच जीवन आहे. त्यांना स्वादुपिंडाचा कर्करोग म्हणजे पँक्रियाटिक कॅन्सर झाला होता. हे मला गेल्या ५-६ महिन्यांपासून माहीत होते. गेले २-३ महिने त्यांनी माझ्याशी बोलणेही बंद केले होते. या आजाराने त्यांचा आयुष्य संपवलं, याचं मला खूप वाईट वाटतं, असंही अनुप जलोटा म्हणाले.

पँक्रियाटिक कॅन्सर म्हणजे काय ?

स्वादुपिंडाचा कॅन्सर म्हणजेच पँक्रियाटिक कॅन्सर हा पैंक्रियाजमध्ये होणार कर्करोग आहे. आपल्या पोटाच्या मागे, छोट्या आतड्याजवळ एक लांबलचक ग्रंथी असते. एक्सोक्राइन फंक्शन म्हतेणजेच पचनास मदत करणे, हे त्याचे कार्य असते. ही ग्लँड किंवा ग्रंथी एंडोक्राइनही नियंत्रित करते. ब्लड शुगर सामान्य ठेवण्याचं कार्य एंडोक्राइन करत असते. जेव्हा एखाद्या व्यक्तीला पँक्रियाटिक कॅन्सर होतो, तेव्हा त्या व्यक्तीच्या स्वादुपिंडाला सूज येऊ लागते.

पँक्रियाटिक कॅन्सर हा सर्वात धोकादायक कॅन्सरपैकी एक आहे. जो दरवर्षी 4 लाख भारतीयांना प्रभावित करतो. जेव्हा स्वादुपिंडाच्या पेशींमध्ये असामान्य वाढ होऊ लागते तेव्हा हा कर्करोग होतो. जोपर्यंत हा ॲडव्हान्स स्टेजपर्यंत पोहोचत नाही तोपर्यंत स्वादुपिंडाच्या पँक्रियाटिक कॅन्सरची कोणतीही लक्षणे दिसून येत नाहीत. याच कारणामुळे, पँक्रियाटिक कॅन्सरचा शोध लावणं आणि त्यावर उपचार करणं हे खूपच कठीण आहे.

पँक्रियाटिक कॅन्सरची लक्षणं

पँक्रियाटिक कॅन्सर ॲडव्हान्स स्टेजवर पोहोचल्यानंतर ही लक्षणे दिसू लागतात. –

– पोटदुखी, ज्याचे हळूहळू पाठदुखीत रुपांतर होऊ लागतं.

– भूक कमी लागणे

– वजन कमी होणं

– त्वचा आणि डोळ्यांचा पांढरा भाग पिवळा पडणं, ज्याला कावीळ म्हटलं जातंय

– मलाचा रंग बदलणे

– लघवीचा रंग गडद होणे

– खाज सुटणे

– मधुमेह होणे किंवा मधुमेह नियंत्रणात ठेवणे कठीण होणे

– हाता-पायांमध्ये वेदना आणि सूज, ( रक्त गोठल्यामुळे असे होऊ शकतं )

– थकवा आणि अशक्तपणा जाणवणे

पँक्रियाटिक कॅन्सरचे कारण काय ?

सिगारेट ओढणे, मद्यपान करणे, जाडेपणा, प्रोसेस्ड फूडचं अतीप्रमाणात सेवन करणं यामुळे पँक्रियाटिक कॅन्सर होऊ शकतो. डॉक्टरांच्या सांगणयानुसार, स्वादुपिंडाचा कर्करोग किंवा पँक्रियाटिक कॅन्सर का होतो, याचं नेमकं कारण अद्याप समजलेलं नाही. पण काही घटकांमुळे या कॅन्सरचा धोका वाढतो. धूम्रपाम, मधुमेह, क्रॉनिक पँक्रियाटिक, लठ्ठपणा यांचा त्यामध्ये समावेश आहे. कुटुंबातील कोणाला हा कर्करोग झाला असला तरी दुसऱ्या व्यक्तीला हा कॅन्सर होण्याचा धोका वाढतो.

पँक्रियाटिक कॅन्सरचे झाला हे कळणार कसं ?

पँक्रियाटिक कॅन्सर झालाय की नाही हे शोधण्यासाठी, डॉक्टर रुग्णाची लक्षणे आणि वैद्यकीय इतिहास तपासतात. रुग्णाचा सीटी स्कॅन केला जातो तसेच रक्ही तपासण्यात येतं. पँक्रियाटिक कॅन्सर शोधण्यासाठी, endoscopic retrograde cholangiopancreatography (ERCP) आणि endoscopic ultrasound (EUS) या दोन विशेष प्रकारच्या चाचण्या केल्या जातात.

पँक्रियाटिक कॅन्सरपासून कसा कराल बचाव ?

– धूम्रपान कमी करा किंवा पूर्णपणे बंद करा. अती मद्यपान केल्यानेही पँक्रियाटिक कॅन्सरचा धोका वाढतो. त्यामुळे त्याचेही सेवन कमी करावे किंवा मद्यपान बंद करावे.

– पँक्रियाटिक कॅन्सरचा धोका कमी करण्यासाठी वजन नियंत्रणात ठेवा. नियमितपणे व्यायाम आणि योगासनं करा. संतुलित जेवण घ्या.

– लाल मांस, प्रोसेस्ड फूड आणि तळलेल्या पदार्थांचे अतीसेवन करू नका. त्यापासून दूर रहा. त्याऐवजी ताजी फळं, भाज्या, संपूर्ण धान्य यांचे सेवन करा.