Stretch Marks : प्रेग्नेंन्सीनंतरच्या स्ट्रेच मार्क्समुळे हैराण आहात? हे घरगुती उपाय करा आणि फरक अनुभवा…

| Updated on: Mar 20, 2022 | 4:36 PM

स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी तुम्ही मध, गुलाब पाणी,लिंबाचा रस, एरंडेल तेल, बदामाचे तेल आणि कोरफड असे पदार्थ स्ट्रेच मार्क्स वापरू शकता. ते त्वचेला मॉइश्चरायझ करते.

Stretch Marks : प्रेग्नेंन्सीनंतरच्या स्ट्रेच मार्क्समुळे हैराण आहात? हे घरगुती उपाय करा आणि फरक अनुभवा...
प्रेग्नेंन्सीनंतरच्या स्ट्रेच मार्क्स
Image Credit source: TV9
Follow us on

मुंबई : प्रेग्नेंन्सीनंतर (Pregnancy) अनेक स्त्रियांना स्ट्रेच मार्क्सची (Stretch Marks) समस्या असते. कधी कधी वजन वाढल्यामुळे किंवा कमी झाल्यामुळेही ही समस्या उद्भवते. प्रेग्नेन्सीनंतर, डिलेव्हरीनंतर स्ट्रेच मार्क्स ही एक सामान्य समस्या आहे. परंतु स्ट्रेच मार्क्स घालवणं कठीण असतं. पण घरातील काही पदार्थ वापरून तुम्ही हे स्ट्रेच मार्क्स घालवू शकता. स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी तुम्ही मध, गुलाब पाणी,लिंबाचा रस, एरंडेल तेल, बदामाचे तेल आणि कोरफड असे पदार्थ स्ट्रेच मार्क्स वापरू शकता. ते त्वचेला मॉइश्चरायझ करते. स्ट्रेच मार्क्सच्या समस्येपासून मुक्त होण्यास मदत होऊ शकते. स्ट्रेच मार्क्स घालवण्यासाठी तुम्ही मधाचा (Honey) अनेक प्रकारे वापर करू शकता .

मध आणि गुलाब पाणी

एक चमचा मध घ्या. त्यात एक चमचे गुलाब पाणी टाका. हे दोन्ही एकत्र मिसळा. ते स्ट्रेच मार्क्स असलेल्या ठिकाणी लावा. काही वेळ मसाज करून त्वचेवर राहू द्या. त्यानंतर ओल्या टॉवेलने पुसून टाका. आपण दररोज नियमितपणे हे मिश्रण वापरू शकता.

मध आणि लिंबाचा रस

ताज्या लिंबाच्या रसात मधाचे काही थेंब टाका. एकत्र मिसळा. हे स्ट्रेच मार्क्स असलेल्या ठिकाणी लावा. काही वेळ मसाज करा आणि तसंच राहू द्या जेणेकरून त्वचा पोषक द्रव्ये शोषून घेईल. त्यानंतर ओल्या टॉवेलने पुसून टाका. तुम्ही हे मिश्रण रोज वापरू शकता.

एरंडेल तेल आणि मध

एक चमचा एरंडेल तेल घ्या. त्यात थोडे मध टाका. एकत्र मिसळा. ते त्वचेवर लावा. मसाज करा. 10 ते 15 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर ओल्या कापडाने पुसून टाका. तुम्ही हे आठवड्यातून 3 ते 4 वेळा वापरू शकता.

मध, बदामाचे तेल आणि कोरफड

दोन चमचे एलोवेरा जेलमध्ये एक चमचा मध आणि एक चमचा बदामाचे तेल टाका. ते त्वचेवर लावा. काही मिनिटे मसाज करा आणि त्वचेवर राहू द्या जेणेकरून तुमची त्वचा पोषक तत्वे शोषून घेईल. त्यानंतर साध्या पाण्याने धुवा. तुम्ही हे रोज वापरू शकता.

मध, एवोकॅडो आणि ऑलिव्ह ऑइल

एक पिकलेला एवोकॅडो घ्या. अर्धा कापून टाका. काट्याच्या मदतीने मॅश करा. त्यानंतर त्याची पेस्ट बनवा. मॅश केलेल्या एवोकॅडोमध्ये एक चमचा ऑलिव्ह ऑईल आणि थोडे मध टाका. हे एकत्र मिक्स करा. त्वचेवर लावा आणि मसाज करा. 10 ते 15 मिनिटे तसेच राहू द्या. त्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवा. तुम्ही ते आठवड्यातून 3 ते 4 वेळा वापरू शकता.

संबंधित बातम्या

Summer Health Tips : बडीशेपपासून बनवलेलं सरबत आरोग्यासाठी भरपूर लाभदायी, जाणून घ्या कृती आणि फायदे…

प्रसूतीनंतरही रहा ‘फिट अँड फाइन’… असा ठेवा आहार, पोटाचे विकारही होतील दूर

त्वचेला ‘फंगल’पासून वाचवण्यासाठी ‘या’ पाच चुका टाळाच