प्रसूतीनंतरही रहा ‘फिट अँड फाइन’… असा ठेवा आहार, पोटाचे विकारही होतील दूर

प्रसूतीनंतर, शरीराची संपूर्ण झीज झालेली असते. शारीरिक त्रासामुळे काही दिवस जड अन्न खाता येत नाही. त्यामुळे शरीराला ताकद आणि पोषण देण्यासाठी प्रसूत मातेला हलके अन्‌ पौष्टिक अन्नघटक दिले जातात. या लेखात आम्ही तुम्हाला प्रसूतीनंतरच्या अशाच काही घटकांबद्दल सांगणार आहोत, ज्यामुळे प्रसूतीनंतर मातांच्या शरीराला शक्ती आणि ऊर्जा मिळण्यास मदत होईल.

प्रसूतीनंतरही रहा ‘फिट अँड फाइन’... असा ठेवा आहार, पोटाचे विकारही होतील दूर
सांकेतिक छायाचित्र
Follow us
| Updated on: Mar 20, 2022 | 1:33 PM

मुंबई : प्रसूत (Delivery) होणे म्हणजे महिलांनी दुसरा जन्म घेतल्यासारखं मानल जात. गर्भधारणा केल्यानंतर, ते प्रसूत झाल्यावरदेखील काही महिने महिलांना अनेक शारीरिक अडचणींचा सामना करावा लागत असतो. बाळाला जन्म देणे मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खूप तणावपूर्ण तितकेच त्रासदायक ठरत असते. 2.5 ते 3 किलो वजनाचे मूल नऊ महिने पोटात ठेवणे आणि नंतर प्रचंड वेदना सहन करून त्याला जन्म देणे ही काही किरकोळ गोष्ट नाही. मुलाच्या जन्मानंतर, स्त्रीच्या शरीराला विश्रांती (Rest) आणि चांगला आहार (Diet) आवश्यक असतो. प्रसूतीत महिलांच्या शरीराची प्रचंड झीज होत असते. त्यामुळेच त्यांना पुन्हा शक्ती मिळावी व लवकर बरी व्हावी यासाठी तिच्या आहाराकडे लक्ष देणे आवश्‍यक असते. बाळंतपणानंतर स्त्रीचे शरीर अनेक बदलांतून जाते. त्यांना विश्रांती आणि पुन्हा पूर्वीसारखी शक्ती मिळण्यासाठी काही काळ द्यावा लागत असतो. नवीन मातांना त्यांची पचनसंस्था पुन्हा मजबूत करण्यासाठी योग्य आहाराची आवश्यकता असते. त्यामुळे, प्रसूतीनंतरच्या सुरुवातीच्या दिवसांत त्यांना दाळी, रवा आदी सहज पचण्याजोग्या गोष्टी दिल्या जातात. रवा गांजी ही एक पौष्टिक रेसिपी आहे. सहज पचते आणि प्रसूतीनंतर पहिल्या दिवसापासून नवीन माता हे खाऊ शकतात.

रवा गांजी बनवण्यासाठीचे घटक

या रेसिपीसाठी तुम्हाला दोन चमचे रवा, एक कप पाणी, 8 बदाम, एक चमचा साखर आणि अर्धा कप दूध आवश्यक आहे. मिक्सरमध्ये बदाम बारीक वाटून घ्या. आता ते बाजूला ठेवा आणि गॅसवर एका भांड्यात पाणी उकळा. तोपर्यंत कढईत रवा भाजून घ्या. रवा तपकिरी होण्यापूर्वी गॅस बंद करा. आता हळूहळू रवा उकळत्या पाण्यात घाला आणि सतत ढवळत राहा. नंतर त्यात साखर, बदाम पावडर आणि कोमट दूध घाला. दोन ते तीन मिनिटे शिजवा आणि नंतर गॅस बंद करा.

या टिप्स लक्षात ठेवा

उकळत्या पाण्यात रवा घालताना सतत ढवळत राहा नाहीतर त्यात गुठळ्या तयार होतील. साखरेऐवजी गूळही घालू शकता. गूळ घातल्यावर लगेच गॅस बंद करा आणि नंतर कोमट दूध घाला.

रव्यातील पोषक घटक असे

100 ग्रॅम रव्यामध्ये 10.3 ग्रॅम प्रोटीन, एक ग्रॅम फैट, 10.6 ग्रॅम कार्बोहायड्रेट, 3.6 ग्रॅम फायबर, 0.39 मिलीग्राम थायामिन, 0.072 मिलीग्राम फॉलिक असिड, 0.08 मिलिग्रॅम व्हिटॅमिन बी 4, 3.6 ग्रॅम फायबर, 0.105 मिलीग्राम झिंक, 0.19 मिलीग्राम कॉपर, 1 मिलीग्राम सोडियम आणि 136 मिलीग्राम फॉस्फरस असते.

संबंधित बातम्या :

त्वचेला ‘फंगल’पासून वाचवण्यासाठी ‘या’ पाच चुका टाळाच

तुम्ही कमी पाणी पिता का?, सावधान! तुम्हाला होऊ शकतात गंभीर आजार

चीन आणि ब्राझीलमध्ये पुन्हा कोरोनाच्या रुग्णात वाढ, पुन्हा येतेय चौथी लाट?

Non Stop LIVE Update
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?
म्हणून योग्य नेत्याला मतदान करा, तृतीयपंथीयांचं मतदरांना आवाहन काय?.
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?
गुलाबी मतदान केंद्र कधी पाहिलंय? पिंक पोलिंग बूथची खासियत काय?.
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा
आधी बजावला मतदानाचा हक्क मगच चढला बोहल्यावर, त्या नवदेवाची होतेय चर्चा.
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान
लोकशाहीच्या उत्सवाला प्रारंभ,विदर्भात 5 जागांवर पहिल्या टप्प्यात मतदान.