Iron deficiency causes: तुमच्या शरीरात लोहाची कमतरता आहे का ? अशी ओळखा लक्षणे

| Updated on: Nov 04, 2022 | 2:38 PM

शरीरात लोहाची कमतरता असेल तर अनेक लक्षणे दिसू लागतात. त्याचा परिणाम आपली त्वचा आणि नखांवर दिसू लागतो, त्याकडे दुर्लक्ष करू नये.

Iron deficiency causes: तुमच्या शरीरात लोहाची कमतरता आहे का ?  अशी ओळखा लक्षणे
Follow us on

नवी दिल्ली – शरीरात लोहाचा अभाव असेल तर ती शरीरासाठी धोक्याची (bad for health) घंटा असते. स्त्रियांमध्ये लोहाची कमतरता असणे सर्वात सामान्य आहे. पाळीच्या काळात जास्त रक्तस्त्राव झाल्यानंतर अधिक लोहाची गरज भासते. हिमोग्लोबिनचा सर्वात महत्त्वाचा घटक लोह (iron) असतो. तज्ज्ञांच्या सांगण्यानुसार नैसर्गिकरित्या तयार झालेले पदार्थ आणि औषधे यांचे सेवन करून लोहाची कमतरता (Deficiency) भरून काढता येते.

लोहाची कमतरता भरून काढताना शरीराला ॲनिमियाचा त्रास होऊ शकतो. मात्र अनेक लोकांना याबात वेळीच कळत नाही. तुमच्याही शरीरात लोहाची कमतरता असेल तर त्याच्या सामान्य लक्षणांबद्दल जाणून घ्या.

सतत थकवा जाणवणे

हे सुद्धा वाचा

कोणत्याही कारणाशिवाय थकवा जाणवत असेल तर हे शरीरात लोहाची कमतरता असल्याचे लक्षण असू शकते. लोहाच्या कमतरतेमुळे हिमोग्लोबिनची निर्मिती होऊ शकत नाही. ज्यामुळे शरीरातील ऑक्सिजनचा पुरवठा खंडित होऊ लागतो. यामुळे शरीरात ऊर्जा राहत नाही आणि थकवा जाणवतो.

जेव्हा आपली त्वचा पिवळी पडल्यासारखी किंवा निस्तेज दिसू लागते, तेव्हा ते लोहाच्या कमतरतेचे एक मोठे लक्षण असू शकते. यामध्ये चेहऱ्यावरून नखांपर्यंत पिवळसरपणा जाणवू लागतो. शरीरात रक्ताच्या कमतरतेमुळे आपली त्वचा पिवळी पडू लागते.

दम लागणे

जेव्हा श्वास घेण्यास त्रास होतो तेव्हा ते लोहाच्या कमतरतेचे लक्षण असू शकते. शरीरात हिमोग्लोबिनची कमतरता असल्याने स्नायू आणि टिश्यूजपर्यंत ऑक्सिजन पोहोचत नाही, त्यामुळे हा त्रास होतो.

हृदयाचे ठोके वाढणे

हृदयाचे ठोके वाढणे हे देखील लोहाच्या कमतरतेचे लक्षण असू शकते. शरीरात हिमोग्लोबिनचे प्रमाण कमी असल्यामुळे ऑक्सिजन हृदयापर्यंत योग्य प्रकारे पोहोचत नाही. ज्यामुळे हृदयाचे ठोके अनियमित होऊ शकतात.

केस आणि त्वचेचे नुकसान होणे

कोरडी त्वचा आणि खराब झालेल्या केसांव्यतिरिक्त, आपली नखे कोरडी होणे हेही लोहाच्या कमतरतेचे लक्षण असू शकते. त्वचा आणि केसांपर्यंत पोषक तत्त्वं पुरेशा प्रमाणात न पोहोचल्याने ही समस्या सुरू होते.

ही अशी काही लक्षणे आहेत, जी शरीरात लोहाच्या कमतरतेमुळे दिसू शकतात. ही चिन्हे वेळीच ओळखून डॉक्टरांचा सल्ला घेणे फायदेशीर ठरू शकते.