Homemade Scrubs: कोरड्या त्वचेसाठी वापरून पहा ‘हे’ 5 सोपे घरगुती स्क्रब; जाणून घ्या, तयार करण्याची पद्धती !

| Updated on: Sep 05, 2022 | 7:33 PM

धूळ आणि प्रदूषणामुळे त्वचेवर घाण जमा होतो. अशा परिस्थितीत मृत पेशी काढून टाकण्यासाठी तुम्ही घरगुती स्क्रब वापरू शकता. त्यामुळे त्वचा खोलवर स्वच्छ होण्यास मदत होते. जाणून घेऊया घरच्या घरी स्क्रब कसा बनवता येईल.

Homemade Scrubs: कोरड्या त्वचेसाठी वापरून पहा ‘हे’ 5 सोपे घरगुती स्क्रब; जाणून घ्या, तयार करण्याची पद्धती !
स्किन केअर
Follow us on

 मुंबई :  स्किन केअर रूटीनमध्ये स्क्रबिंगचा समावेश करणे आवश्यक आहे. कोरड्या त्वचेसाठी स्क्रबिंग (Scrubbing for dry skin) खूप महत्वाचे आहे. स्क्रबिंग मृत पेशी काढून टाकण्याचे काम करते. तुम्ही रासायनिक स्क्रबऐवजी घरगुती स्क्रब देखील वापरू शकता. ते तुमची त्वचा उत्तम प्रकारे एक्सफोलिएट (Exfoliate) करतात. स्क्रब छिद्र खोलवर साफ करते. स्क्रब नैसर्गिक घटक वापरून बनवले जातात. ते त्वचा स्वच्छ आणि हायड्रेटेड ठेवण्याचे काम करतात. लोक त्वचेची काळजी (skin care) घेण्यासाठी बाजारात उपलब्ध असलेल्या सौंदर्य उत्पादनांचा वापर करतात. परंतु, हे सर्व टाळण्यासाठी आपण घरगुती सौंदर्य उत्पादनांचा वापर करू शकतो, कारण जर नैसर्गिक उत्पादनांनी तुम्हाला फायदा होत नसेल तर ते नुकसानही करणार नाहीत. म्हणूनच आपण आपल्या स्वत: च्या हातांनी स्क्रब तयार करण्याचा प्रयत्न करू शकता.

घरगुती बनवलेल्या फेस स्क्रबचा वापर आपल्या चेहऱ्यावर खूप प्रभावी आहे, घरगुती स्क्रब वापरल्याने तुमचा चेहरा चमकदार, मुलायम आणि निरोगी दिसतो. कोरड्या त्वचेसाठी घरगुती स्क्रब कसा बनवायचा याबद्दल प्रत्येकाला माहिती हवे. घरगुती स्क्रब तुमची त्वचा स्वच्छ ठेवण्यास तसेच ती निरोगी दिसण्यास मदत करू शकतात.

ग्रीन टी आणि हनी स्क्रब

एका भांड्यात दोन ग्रीन टी बॅग घ्या. त्यात दोन चमचे मध टाका. या मिश्रणाने काही वेळ चेहरा स्क्रब करा. काही वेळाने चेहरा थंड पाण्याने धुवा. मधामध्ये मॉइश्चरायझिंग गुणधर्म असतात. यात अँटी-बॅक्टेरियल गुणधर्म आहेत. ते चेहरा उजळण्याचे काम करतात.

कॉफी स्क्रब

एका भांड्यात एक चमचा कॉफी घ्या. त्यात थोडे पाणी घालावे. गोलाकार हालचालींमध्ये या मिश्रणाने चेहरा स्क्रब करा. ४ ते ६ मिनिटे स्क्रब केल्यानंतर चेहरा धुवा. हे स्क्रब तुमच्या त्वचेतील मृत पेशी काढून टाकण्याचे काम करते. हे नैसर्गिकरित्या त्वचेला एक्सफोलिएट करते. यामुळे त्वचा फ्रेश दिसते. या स्क्रबमध्ये पाण्याऐवजी १ चमचे खोबरेल तेलही घालू शकता. त्वचेला हायड्रेट ठेवण्यास मदत होते.

बदाम स्क्रब

एका भांड्यात अर्धा चमचा बदाम पावडर घ्या. त्यात थोडे मध आणि गुलाबपाणी टाका. त्यात चिमूटभर हळद घाला. या सर्व गोष्टी नीट मिसळून त्वचेला स्क्रब करा. यानंतर त्वचा थंड पाण्याने धुवा. हे स्क्रब मृत त्वचा काढून टाकण्याचे काम करते. हे छिद्र खोलवर साफ करते.

साखर स्क्रब

एका भांड्यात एक चमचा साखर घाला. त्यात एलोवेरा जेल टाका. या दोन गोष्टी नीट मिसळा. या स्क्रबने गोलाकार हालचालींनी त्वचा आणि मानेला मसाज करा. हा स्क्रब काही काळ त्वचेवर राहू द्या. यानंतर त्वचा साध्या पाण्याने धुवा. हा स्क्रब तुम्ही आठवड्यातून 2 ते 3 वेळा वापरू शकता. हे त्वचेला एक्सफोलिएट करण्याचे काम करते.