BREAKING: 18 वर्षावरील सर्वांसाठी कोविड व्हॅक्सीनच्या बूस्टर डोसला मान्यता; अमेरिकेचा मोठा निर्णय

| Updated on: Nov 19, 2021 | 8:34 PM

अमेरिकेने आज 18 वर्ष आणि त्यावरील सर्वांसाठी कोव्हिड व्हॅक्सीनच्या बूस्टरला अमेरिकेने मान्यता दिली आहे. व्हॅक्सिनचं उत्पादन करणाऱ्या फायजर आणि मॉडर्नाने संयुक्त निवेदन जारी करून ही मोठी माहिती दिली आहे.

BREAKING: 18 वर्षावरील सर्वांसाठी कोविड व्हॅक्सीनच्या बूस्टर डोसला मान्यता; अमेरिकेचा मोठा निर्णय
Covid boosters
Follow us on

वॉशिंग्टन: अमेरिकेने आज 18 वर्ष आणि त्यावरील सर्वांसाठी कोव्हिड व्हॅक्सीनच्या बूस्टरला अमेरिकेने मान्यता दिली आहे. व्हॅक्सिनचं उत्पादन करणाऱ्या फायजर आणि मॉडर्नाने संयुक्त निवेदन जारी करून ही मोठी माहिती दिली आहे.

अत्यंत महत्त्वाच्या क्षणी या बूस्टर डोसच्या वापराला मान्यता मिळाली आहे. आता थंडीचा महिना सुरू होत आहे. देशभरात थंडी वाढल्यानंतर कोरोनाचे रुग्ण आणि इतर रुग्ण रुग्णालयात भरती होण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढण्याची शक्यता असल्याने या डोसला मान्यता मिळणं ही महत्त्वाची गोष्ट आहे, असं मॉडर्नाचे सीईओ स्टिफन बैंसेल यांनी सांगितलं.

बायडन सरकारचं महत्त्वाचं पाऊल

अन्न आणि औषध प्रशासन विभागाने प्रौढांसाठी मॉडर्ना आणि फायझरच्या कोव्हिड बूस्टर शॉट्सला अधिकृत केलं आहे. सामान्य जनतेला कोरोनाचा अतिरिक्त डोस देण्याची बायडेन सरकारची योजना आहे. त्या पार्श्वभूमीवर हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.

दोन महिने उशिराने मान्यता मिळाली

दरम्यान दोन महिने उशिराने या बूस्टर डोसला मान्यता मिळाली आहे. एफडीएला सल्ला देणाऱ्या संशोधकांनी तिसरा डोस देण्याबाबतच्या डेटामध्ये त्रुटी असल्याचं सांगत 20 सप्टेंबरपासून बूस्टर डोस वितरीत करण्याची सरकारची योजना फेटाळून लावली होती. एफडीएचे कार्यवाहक आयुक्त जेनेट वुडकॉक यांनी गेल्या आठवड्या कंपन्यांनी दिलेल्या रिपोर्टवर चर्चा करण्यासाठी बैठक बोलावली नव्हती. ही बैठक न बोलवताच त्यांनी बूस्टर डोस देण्यसा मंजुरी दिली होती. तर मॉडर्नाने दोन दिवसांपूर्वीच दुसऱ्यांदा बूस्टर डोसला मान्यता देण्यासाठी निवेदन दिलं होतं. त्यानंतर आज कंपनीने त्याबाबतची घोषणा केली आहे.

लवकरच डोस मिळणार

महामारी वाढत असतानाच एजन्सीने जनतेच्या रक्षणासाठी वेगाने काम सुरू केलं आहे. लोकांचं रुग्णालयात भरती होण्याचं प्रमाण रोखण्यासाठी आणि मृत्यूचं प्रमाण रोखण्मयासाठी बूस्टर शॉट सर्वात चांगला पर्याय आहे, असं वुडकॉक म्हणाले होते. कोरोना सेंटरमध्ये अजून बूस्टर डोसचं अधिकृतपणे वितरण करणं बाकी आहे. मात्र, आता बूस्टर डोसला मान्यता मिळाल्याने नागरिकांना लवकरच हे डोस दिले जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.

 

संबंधित बातम्या:

Ashwagandha : चिंता आणि तणाव दूर करण्यासाठी अश्वगंधा अत्यंत फायदेशीर, वाचा अधिक!

Morning Activities : तुमचा दिवस योग्य पद्धतीने सुरू करण्यासाठी ‘या’ टिप्स फॉलो करा!

Numbness Home Remedies : हात पाय सतत सुन्न पडतायत? मग, ‘या’ घरगुती उपायांनी मिळवा आराम