America Pakisatn Relation : ‘या’ देशाबरोबर करार पाकिस्तानला खूप महाग पडणार, अमेरिकेची थेट वॉर्निंग

| Updated on: Apr 25, 2024 | 2:41 PM

America Pakisatn Relation : अमेरिकेने पाकिस्तानला थेट इशारा दिला आहे. पाकिस्तानने नुकतेच एका देशाबरोबर आठ करार केले. अमेरिकेला पाकिस्तानची ही नवीन मैत्री अजिबात मान्य नाहीय. अमेरिकेने पाकिस्तानला सूचक शब्दात मोठा इशारा दिला आहे.

America Pakisatn Relation : या देशाबरोबर करार पाकिस्तानला खूप महाग पडणार, अमेरिकेची थेट वॉर्निंग
Shehbaz Sharif-Joe biden
Image Credit source: AFP
Follow us on

पाकिस्तानला अमेरिकेने वॉर्निंग दिली आहे. अमेरिकेने पाकिस्तानला आधीच सावध केलं आहे. पाकिस्तानला नव्या मैत्रीची भविष्यात मोठी किंमत चुकवावी लागू शकते. कदाचित पाकिस्तानला निर्बंधांचा सुद्धा सामना करावा लागेल. पाकिस्तान शेजारी देशाबरोबर मैत्री संबंध अधिक दृढ करण्याचा प्रयत्न करत आहे. ते अमेरिकेला अजिबात रुचलेलं नाही. भविष्यात पाकिस्तानला याची किंमत चुकवावी लागेल, असा इशाराच अमेरिकेने देऊन टाकला आहे. इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी नुकतेच पाकिस्तान दौऱ्यावर आले होते. पाकिस्तानचा इराणसोबत सुरक्षा आणि व्यापारिक संबंध विस्तारण्याचा प्रयत्न आहे, ते अमेरिकेला अजिबात मान्य नाहीय.

अमेरिकेच्या परराष्ट्र विभागाचे प्रधान उपप्रवक्ते वेदांत पटेल यांनी इराणसोबत व्यापारी संबंध विस्तारताना त्यात धोके असल्याची जाणवी करुन दिली. “आम्ही प्रसार नेटवर्क व मोठ्या प्रमाणात विनाशकारी शस्त्रास्त्रांची खरेदी रोखण्यासाठी त्यांच्याविरुद्ध कारवाई सुरुच ठेऊ, मग ते कोणीही असो” असं वेदांत पटेल यांनी स्पष्ट केलं. “जे कोणी इराणसोबत बिझनेस डील करण्याचा विचार करतायत, त्यांना मी एवढच सांगू शकतो की, निर्बंधांचा धोका विसरु नका. पाकिस्तान सरकार त्यांच्या परराष्ट्र धोरणाबद्दल बोलू शकते” असं उपप्रवक्ते वेदांत पटेल म्हणाले.

अमेरिकेच्या भितीने हा प्रकल्प बारगळलाय

पाकिस्तानच्या बॅलेस्टिक मिसाइल प्रोग्रॅमला मदत करणाऱ्या चीन आणि बेलारुसच्या कंपन्यांवर अमेरिकेने निर्बंध घातले, त्यानंतर अमेरिकेकडून इतक्या स्पष्टपणे सांगण्यात आलय. इराणमधून गॅस पाइपलाइन टाकण्याचा जुना प्रकल्प पाकिस्तानला पुन्हा सुरु करायचा आहे. अमेरिकेच्या निर्बंधांच्या भितीने हा प्रकल्प बारगळलाय. इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांच्या पाकिस्तान दौऱ्यात दोन्ही देशांमध्ये एकूण आठ द्विपक्षीय करार झाले. राजकीय, आर्थिक, व्यापार आणि सांस्कृतिक अंगाने हे करार झाले आहेत. पशूसंवर्धन, आरोग्य आणि सुरक्षा विषयक हे करार आहेत. आठ वर्षात इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी केलेला हा पहिला पाकिस्तान दौरा आहे.