China-Iran Deal : चीन-इराणमध्ये होणाऱ्या एका डीलमुळे भारताला मोठा धोका, काय घडतय?

| Updated on: Apr 24, 2024 | 3:59 PM

China-Iran Deal : चीनला लागून असलेल्या सीमेवर भारताच मोठ सैन्य तैनात आहे. मागच्या काही वर्षांपासून दोन्ही देशांमध्ये सुरु असलेला सीमावाद अजून मिटलेला नाही. आता चीन आणि इराणमध्ये एक डील होणार आहे. त्यामुळे भारताच टेन्शन वाढलं आहे.

China-Iran Deal : चीन-इराणमध्ये होणाऱ्या एका डीलमुळे भारताला मोठा धोका, काय घडतय?
China-Iran Deal
Follow us on

मध्य पूर्वेत इराणने अमेरिका-इस्रायल विरोधात दहशतवादी गट उभे केले आहेत. या दहशतवादी गटांना इराणने पोसलं आहे. त्यांना ड्रोन आणि घातक मिसाइल्स दिली आहेत. युक्रेन युद्धा दरम्यान रशियाने इराणकडून स्वस्त ड्रोन्स विकत घेतली. अलीकडेच इस्रायलवरील हल्ल्यानंतर इराणने सिद्ध केलय की, त्यांची ड्रोन्स 2 हजार किलोमीटर अंतरापर्यंत हल्ला करण्यास सक्षम आहेत. त्यानंतर जगातील आर्थिक आणि सैन्य शक्तीने इराणी ड्रोन्सचा आपल्या सैन्य ताफ्यात समावेश करण्याचा निर्णय घेतला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, चिनी सैन्याने इराणला 15,000 आत्मघातकी ड्रोन्सची ऑर्डर दिली आहे. त्याशिवाय रशिया सुद्धा इराणकडून पुन्हा एकदा बॅलेस्टिक मिसाइल्स विकत घेणार आहे. चीन आणि रशिया जगातील मोठ्या शक्ती आहेत. या देशांची सैन्य शक्ती अमेरिकेपेक्षा कुठेही कमी नाही. हे देश आज इराणकडून शस्त्र विकत घेतायत, त्यावरुन इराणने आपली सैन्य शक्ती कुठपर्यंत वाढवलीय ते दिसून येतं.

रशियाने सुरुवात केली

मागच्यावर्षी जून महिन्यात व्हाइट हाऊसने म्हटलं होतं की, ‘रशिया इराणसोबत आपले संरक्षण संबंध विकसित करत आहे’ रशियाने इराणकडून ड्रोन विकत घेतली आहेत, असं व्हाइट हाऊसच्या प्रवक्त्याने म्हटलं होतं. रशियाने याच ड्रोन्सच्या माध्यमातून युक्रेनवर हल्ला केला. रशिया-युक्रेन युद्धात इराणी ड्रोन्स आणि UAV चा मोठ्या प्रमाणात वापर झाला आहे.

भारतासाठी काय धोकादायक ठरेल?

चीनने इतक्या मोठ्या संख्येने इराणकडून ड्रोन्स विकत घेणं, भारतासाठी धोकादायक ठरु शकतं. भारताचा चीन सोबत मागच्या काही वर्षांपासून सीमावाद सुरु आहे. दोन्ही देशांच मोठ्या प्रमाणात सैन्य सीमारेषेवर तैनात आहे.

यामध्ये इराणचा फायदा

अमेरिका आणि रशिया या दोन देशांचा जगभरात शस्त्रविक्रीचा मोठा व्यवसाय आहे. जगाच्या कुठल्याही कोपऱ्यात युद्ध सुरु असलं, तरी या दोन देशांच नाव जरुर येतं. युद्धामुळे शस्त्रांची गुणवत्ता, प्रदर्शन करण्याची संधी मिळते. जगातील कुठल्याही क्षेत्रातील युद्धात अमेरिका, फ्रान्स, ब्रिटन आणि रशिया हे देश लगेच सहभागी होतात. युद्धात कुठल्याही देशाच्या शस्त्रांनी चांगलं प्रदर्शन केल्यानंतर त्याची मागणी वाढते. इराणचा इस्रायलवरील हल्ला त्यांच्या शस्त्रास्त्र निर्यातीला फायद्याचा ठरतोय.