India-China Relation : फिलिपाईन्सला हाताशी धरुन भारताची चीनला कोंडीत पकडण्याची परफेक्ट खेळी

| Updated on: Apr 27, 2024 | 2:09 PM

India-China Relation : चीनचा प्रत्येक ठिकाणी दादागिरी करण्याचा प्रयत्न असतो. मग, देशाची सीमा असो, वा सागरी हद्द. याच चीनच्या अरेरावीला रोखण्यासाठी भारताने फिलिपाईन्सला हाताशी धरुन एक खेळी केलीय. त्यामुळे नक्कीच चीनच टेन्शन वाढलं आहे. चीनने त्यावर प्रतिक्रिया सुद्धा दिली आहे.

India-China Relation : फिलिपाईन्सला हाताशी धरुन भारताची चीनला कोंडीत पकडण्याची परफेक्ट खेळी
india vs china
Follow us on

आंतरराष्ट्रीय राजकारणात कुटनिती महत्त्वाची असते. चीनच्या आक्रमकतेला रोखण्यासाठी भारत शक्य ते सर्व करत असतो. आता भारताने दुसऱ्या देशाच्या मदतीने चीन विरोधात एक खेळी केली आहे. त्यामुळे चीनच्या डोक्याचा ताप नक्कीच वाढणार आहे. भारताने आपलं सर्वात शक्तीशाली मिसाइल ब्रह्मोसची डिलिव्हरी केली आहे. 19 एप्रिलला मनीला येथे ब्रह्मोसची खेप पोहोचली. दोन वर्षांपूर्वी फिलिपाईन्ससोबत 375 मिलियन अमेरिकी डॉलरचा करार झाला होता. भारताने शक्तीशाली ब्रह्मोस या सुपरसोनिक क्रूज मिसाइलची डिलीवरी फिलिपाईन्सला केली आहे. फिलिपाईन्सच्या हाती ब्रह्मोस आल्यानंतर चीनची अस्वस्थतता वाढली आहे. दक्षिण चीन सागरात फिलिपाईन्सचा चीनसोबत तणाव प्रचंड वाढला आहे. त्याचवेळी फिलिपाईन्सला भारताकडून ही मिसाइल्स मिळाली आहेत. फिलिपाईन्सला मिसाईल्सची पहिली खेप मिळाल्यानंतर चिनी सैन्याकडून पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

चिनी सैन्याच्या प्रवक्त्याने ब्रह्मोस मिसाइल्सच्या डिलिवरीवर पहिली प्रतिक्रिया दिली आहे. “दोन्ही देशांनी परस्परांना सुरक्षा सहकार्य करताना या गोष्टीची काळजी घ्यावी की, यामुळे कुठल्या तिसऱ्या पक्षाच नुकसान होणार नाही” चिनी संरक्षण मंत्रालयाचे प्रवक्ते कर्नल वू कियान यांनी हे म्हटलं आहे. “दोन देशांच्या सुरक्षा सहकार्यामुळे कुठल्या तिसऱ्या देशाच नुकसान होऊ नये. क्षेत्रीय शांतता आणि स्थिरतेला धोका निर्माण होऊ नये” असं कर्नल वू कियान म्हणाले.

अमेरिकेने फिलिपाईन्सला काय दिलं?

दक्षिण चीन सागराच्या वादात चीन आणि फिलिपाईन्स दोन्ही देश आमने-सामने आहेत. याच दरम्यान अमेरिकेने या महिन्यात फिलिपाईन्सला मध्यम पल्ल्याची बॅलेस्टिक मिसाइल्स दिली आहेत. या मिसाइल्सच्या तैनातीवरुन चीनने अमेरिकेवर कडवट शब्दात टीका केली.

क्षेत्रीय सुरक्षितता धोक्यात आणणार पाऊल

आशिया-प्रशांत महासागर क्षेत्रात अमेरिकेने केलेल्या बॅलेस्टिक मिसाइल तैनातीचा आम्ही विरोध करतो. अमेरिकेच हे पाऊल क्षेत्रीय सुरक्षितता धोक्यात आणणार आहे. यामुळे क्षेत्रीय शांततेला धोका निर्माण होऊ शकतो.