PHOTOS : जगाचं लक्ष वेधून घेणारं मोठं स्थलांतर, मोरोक्को-स्पेन सीमेवरील परिस्थिती चिंताजनक
मोरोक्कोचे हजारो नागरिक स्थलांतर करत स्पेनमध्ये येत आहेत. त्यामुळे क्वेटोच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात हे नागरिक जमा झालेले दिसत आहेत.

मोरोक्कोचे हजारो नागरिक स्थलांतर करत स्पेनमध्ये येत आहेत. त्यामुळे क्वेटोच्या सीमेवर मोठ्या प्रमाणात हे नागरिक जमा झालेले दिसत आहेत. (Photo Credit : Reuters)

मोरोक्कोचे नागरिक पाण्यातून पोहत स्पेनच्या सीमेपर्यंत येत आहेत. यात त्यांना अनेक हालअपेष्टाही सहन कराव्या लागत आहेत. (Photo Credit : Reuters)

अनेक कुटुंबं आपल्या घरातील लहान मुलांनाही सोबत घेऊन पाण्यातील प्रवास करत आहेत. अशावेळी एका लहान बाळाला वाचवतानाचा क्षण. (Photo Credit : Reuters)

मोरोक्कोच्या नागरिकांनी बेकायदेशीरपणे स्पेनमध्ये शिरकाव करु नये म्हणून सीमेवर स्पेनचे सैनिक तैनात आहेत. ते पाहून येणाऱ्या नागरिकांना मदतही करत आहेत. (Photo Credit : Reuters)

मोरोक्कोहून पोहून येताना तब्येत बिघडलेल्या लहान मुलांना स्पेनच्या सैनिकांकडून उपचारही केले जात आहेत. (Photo Credit : Reuters)

सीमेवर पालकांसोबत आलेल्या मोरोक्कोतील लहान मुलांचे हाल होताना दिसत आहेत. (Photo Credit : Reuters)

रेड क्रॉस संघटनेच्या स्वयंसेवकांकडून यावेळी मोरोक्को-स्पेन सीमेवर स्थलांतरीतांना मदत केली जात आहे. (Photo Credit : Reuters)

स्पेनमधील क्वेटोमध्ये मोरोक्कोचे नागरिक पोहून स्पेनमध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे स्पेनने या ठिकाणी सैनिक तैनात केलेत. (Photo Credit : Reuters)

मोरोक्को-स्पेन सीमेवर मोठ्या प्रमाणात लोक जमा झाल्यानं स्पेनने आपल्या सैन्यासह काही रणगाडेही तैनात केले आहेत. (Photo Credit : Reuters)

स्पेनच्या सैन्याने सीमेवर जमा झालेल्या मोरोक्कोच्या नागरिकांवर लाठीचार्ज करत त्यांना पळवून लावण्याचाही प्रयत्न केला. (Photo Credit : Reuters)

नागरिकांच्या स्थलांतरामुळे मोरोक्को-स्पेन सीमेला छावणीचं रुप आलंय. (Photo Credit : Reuters)

मोरोक्कोचे अनेक नागरिक पोहून येत सीमेवरील कुंपणाच्या अवतीभोवती गोळा होत आहेत. (Photo Credit : Reuters)