रशियाने घेतला चेर्नोबिलचा ताबा,1986 सालच्या अणुऊर्जा अपघाताची आठवण, नेमकं काय घडलं ज्यामुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला

| Updated on: Feb 25, 2022 | 3:27 PM

रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये (Ukraine) गेल्या दोन दिवसांपासून युद्ध सुरू आहे. रशियाने युक्रेनमधील चेर्नोबिल अणू प्लांटचा ताबा घेतल्यानंतर पुन्हा एकदा 1986 चा अणू अपघात चर्चेत आलाय.

रशियाने घेतला चेर्नोबिलचा ताबा,1986 सालच्या अणुऊर्जा अपघाताची आठवण, नेमकं काय घडलं ज्यामुळे हजारो लोकांचा मृत्यू झाला
Chernobyl Atomic Plant
Follow us on

Russia, Ukraine war : रशिया (Russia) आणि युक्रेनमध्ये (Ukraine) गेल्या दोन दिवसांपासून युद्ध सुरू आहे. रशियाने युक्रेनच्या विविध भागात मिसाईल आणि बॉम्ब हल्ले केले आहेत. या हल्ल्यामध्ये आतापर्यंत युक्रेनचे शेकडो नागरिक मारले गेल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. रशियन सैनिकांनी चेर्नोबिल अणू प्लांट देखील ताब्यात घेतल्याचे वृत्त समोर येत आहे. या बातमीला युक्रेनचे राष्ट्रपती जेलेन्स्की यांनी देखील दुजोरा दिला आहे. त्यांनी याबाबत बोलताना म्हटले की, रशियन सैनिकांनी चेर्नोबिल अणू प्लांटचा (Chernobyl Atomic Plant)ताबा घेतला आहे. मात्र आमचे सैनिक जीवाची बाजी लावून या प्लाटचं संरक्षण करत आहेत. या भागात बॉम्बस्फोट झाल्यास मोठी दुर्घटना होऊ शकते,1986 साली झालेल्या अपघाताची पुनारावृत्ती झाल्यास मोठा अनर्थ होईल त्यामुळे आम्ही जीवाची बाजी लावून या प्लांटचे संरक्षण करत आहोत. 1986 साली चेर्नोबिल येथे मोठी दुर्घटना घडली होती. या अपघातामध्ये अनेकांचा मृत्यू झाला होता. चेर्नोबिलमध्ये अणू कचरा साठवण केंद्र आहे. तसेच या ठिकाणी अणू इंधनाचे स्टोअर देखील करण्यात येते. त्यामुळे इथे एखादी दुर्घटना झाल्यास मोठा अनर्थ होऊ शकतो. दरम्यान रशियाने चेर्नोबिल अणू प्लांट ताब्यात घेतल्याने पुन्हा एकदा 1986 साली घडलेल्या दुर्घटनेच्या आठवणी ताज्या झाल्या आहेत.

1986 साली नेमकं काय घडलं होतं?

चेर्नोबिल दुर्घटना हा आजवर घडलेला जगातील सर्वात विनाशकारी अणुऊर्जा अपघात आहे. 26 एप्रिल 1986 रोजी तत्कालीन सोव्हियेत संघामध्ये असलेल्या आणि आता युक्रेनमध्ये असलेल्या चेर्नोबिल अणुऊर्जा विद्युत केंद्रात एका चाचणीदरम्यान मोठा स्फोट झाला होता. या स्फोटानंतर वायु गळतीला सुरुवात झाली. स्फोटामुळे लागलेली आग नियंत्रणात आणून वायु गळती रोखण्याच्या प्रयत्नात 56 कामगारांचा मृत्यू झाला होता. तसेच वायु गळतीमुळे रेडिएशनचे उत्सर्जन होऊन ते सर्वदूर पसरले. या रेडिएशनमुळे अनेकांना कर्करोग झाला. या कर्करोगामुळे 4 हजार लोकांना आपला जीव गमवावा लागला होता. या भागातून लाखो लोकांचे स्थलांतर करण्यात आले. या भागातून त्यावेळी सुमारे साडेतीन लाख लोकांचे स्थलांतर करण्यात आले होते. ही घटना इतिहासात चेर्नोबिल अणू दुर्घटना म्हणून प्रसिद्ध आहे.

हजारो पोते अणू कचरा

चेर्नोबिल हे एक मोठे अणू कचरा साठवण केंद्र आहे. इथे जवळपास 22 हजार पोते अणू कचरा स्टोअर करून ठेवण्यात आला आहे. सोबतच इथे मोठ्या प्रमाणात अणू इंधन देखील स्टोअर करून ठेवण्यात आले आहे. त्यामुळे या भागात बॉम्बस्फोट झाला तर मोठी दुर्घटना होऊ शकतो. अणूच्या रेडिएशन उत्सार्नामुळे जनजीवन धोक्यात येईल. त्यामुळे युक्रेनचे सैनिक प्राणपणाने या अण्णू भट्टीचे संरक्षण करत आहेत. रशियाने आतापर्यंत युक्रेनचे 83 सैन्यांची स्थळे उद्धवस्त केली आहेत.

रशियाने ‘चेर्नोबिल’चा ताबा घेतला

 

संबंधित बातम्या

युक्रेनमधील भारतीयांसाठी हेल्पलाइन क्रमांक घोषित; एका फोनवर मिळेल मदत, जाणून घ्या सर्व नंबर!

Russia Ukraine War: रशिया-युक्रेनमध्ये युद्धाचा भडका, पुतीन-मोदींची फोनवर चर्चा; मोदी म्हणाले, चर्चेतूनच प्रश्न सुटेल

Russia-Ukraine War: रशिया-युक्रेन युद्धावरच्या भारतीय भूमिकेवर अमेरिका नाराज, बायडेन यांना काय हवे?