AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

TV9 Ganesh Utsav 2025 LIVE

TV9 Ganesh Utsav 2025
TV9 Ganesh Utsav 2025 TV9 Ganesh Utsav 2025
गणपती

मंत्र

वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ। निर्विघ्नं कुरुमे देव सर्वकार्येषु सर्वदा!

ज्याची सोंड गोलाकार आहे, शरीर महाकाय आहे, जो करोडो सूर्यांच्या समान तेजस्वी आहे, हे देवा, माझ्या सर्व कार्यात तुझा आशीर्वाद देऊन सर्व कार्य विघ्नमुक्त कर!

गणेश चतुर्थी

व्हिडीओ

गणेश चतुर्थी (Ganesh Chaturthi) विनायक चतुर्थीही म्हणतात. हा हिंदू धर्मियांचा महत्त्वाचा सण आहे. आजच्या दिवशी गणपती आपली आई पार्वतीसह कैलास पर्वताहून पृथ्वीवर आले होते. त्यानिमित्ताने हा उत्सव साजरा केला जातो. गणेशोत्सवात गणपतीच्या मातीच्या किंवा शाडूच्या मूर्त्या बनवल्या जातात. या मूर्त्यांची घरात आणि सार्वजनिक ठिकाणी प्रतिष्ठापना केली जाते. त्यानंतर 10 दिवस गणेशाची भक्तीभावाने पूजा केली जाते. दहाव्या दिवशी अनंत चतुर्थी असते. त्या दिवशी गणेशाचं विसर्जन केलं जातं. यंदा 27 ऑगस्टपासून गणेशोत्सवाला सुरुवात होणार आहे.

गणेश चतुर्थीच्या दिवशी पूजेसाठी मोदक (Modak) आणि लाडूचा (Laddoo) भोग दिला जातो. गणपतीला मिठाई खूप आवडते असं सांगितलं जातं. अनुष्ठानात वैदिक भजन, प्रार्थना आणि जप केला जातो. या दिवशी लोक व्रतही ठेवतात (Ganesh Chaturthi Bhajan). दहाव्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्थीच्या दिवशी भव्य मिरवणूक काढून ढोलताशाच्या गजरात बाप्पाचं विसर्जन केलं जातं. नदी किंवा समुद्रात बाप्पाला निरोप दिला जातो. दरवर्षी ऑगस्ट किंवा सप्टेंबर महिन्यात गणेशोत्सव साजरा केला जातो.