AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक हिंदुस्तानी मशि‍दीजवळ का थांबते? ‘हे’ आहे कारण

लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी होत असतात आणि राजाचं अंतिम दर्शन घेतात. मात्र दरवर्षी भायखळा येथील हिंदुस्तानी मशिदीसमोर ही भव्य मिरवणूक थांबत असते. यामागे नेमकं काय कारण आहे ते सविस्तर जाणून घेऊयात.

लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणूक हिंदुस्तानी मशि‍दीजवळ का थांबते? 'हे' आहे कारण
Lalbaug Cha Raja And Masjid
बापू गायकवाड
बापू गायकवाड | Updated on: Sep 05, 2025 | 6:44 PM
Share

लालबागचा राजा हा गणपती मुंबईतील सर्वात आकर्षण असलेल्या गणपती आहे. लालबागच्या राजाची विसर्जन मिरवणुकही भव्य असते. दरवर्षी जवळपास 24 तास ही विसर्जन मिरवणूक चालते. लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीत हजारो भाविक सहभागी होत असतात आणि राजाचं अंतिम दर्शन घेतात. मात्र दरवर्षी भायखळा येथील हिंदुस्तानी मशिदीसमोर ही भव्य मिरवणूक थांबत असते. यामागे नेमकं काय कारण आहे ते सविस्तर जाणून घेऊयात.

लालगाबच्या राज्याच्या विसर्जन मिरवणूक हिंदुस्तान मशि‍दीजवळ थांबते. ही केवळ परंपरा नसून ती मुंबईच्या धार्मिक एकतेचे प्रतिक आहे. ही मिरवणूक थांबल्यावर भाविक गणपती बाप्पा मोरया अशी घोषणाबाजी करतात. यावेळी मशिदी समितीचे सदस्य मिरवणुकीचे स्वागत करण्यासाठी येतात आणि बाप्पाचे आशीर्वाद घेतात. हा क्षण आपल्याला धार्मिक आणि सामाजिक ऐक्याची जाणीव करुण देतो. हा क्षण दोन्ही धर्मांना एकत्र आणतो.

ही प्रथा नेमकी कधी सुरु झाली हे माहिती नाही, 1980 ते 1990 या कालावधीत स्थानिक मुस्लिम नेत्यांनी विसर्जन मार्गादरम्यान येणारे अडथळे दूर करण्यासाठी या गणेश मंडळाला पाठिंबा दिला होता तेव्हापासून ही प्रथा पाळली जात आहे. आता जेव्हा लालबागचा राजाची मूर्ती विसर्जनाच्या वेळी भायखळा येथील हिंदुस्थानी मशि‍दीजवळ थांबते. त्यावेळी स्थानिक मुस्लिम लोक बाप्पाचे फुलांनी स्वागत करतात. तसेच यावेळी मिठाई देखील वाटली जाते.

ही परंपरा एकतेचे प्रतीक आहे. मिरवणुकीत सहभागी झालेले भाविक या खास क्षणाची वाट पाहत असतात. मशिदीच्या प्रवेशद्वारांला आशीर्वाद देणारी राजाची मूर्ती आणि मिरवणुकीचे स्वागत करणारी मशिदी हे हिंदू मुस्लिम एकतेचे उदाहरण आहे. ही परंपरा मुंबईतील बंधुत्वाच्या भावनेचे एक प्रतिक आहे. यानंतर ढोल ताशांच्या गजरात लालबागच्या राज्याची मूर्ती चौपाटीकडे रवाना होते.

लालबागच्या राजाच्या विसर्जन मार्ग

लालबागच्या राजाची मूर्ती लालबाग मार्केट व चिंचपोकळी स्टेशन, भायखळा स्टेशन, हिंदुस्तान मशीद, भायखळा भायखळा अग्निशमन दल, नागपाडा चौक (खडा पारसी/एस. मोहनी चौक)गोल देऊळ/दो टाकी क्षेत्र, ऑपेरा हाऊस ब्रिज (सीपी टँक/प्रार्थना समाज/एसव्ही रोड) मार्गे गिरगाव चौपाटी वर पोहोचतेय. या ठिकाणी लालबागच्या राजाला शेवटचा निरोप दिला जातो.

Follow Us
सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका; बावनकुळेंचा पलटवार, काँग्रेसच्या...
सोनिया गांधींची मोदी सरकारवर टीका; बावनकुळेंचा पलटवार, काँग्रेसच्या जुन्या कारभारावर बोट
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा
ऑडिओ क्लिपचं मूळ डिव्हाइस रामदास कदमांकडे? मनोज जरांगेंचा खळबळजनक दावा!
पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
Payal Pawar Zhambre : पायल झांबरे प्रकरणात नवी अपडेट! नेमकं काय घडतंय?
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट,
दिवाळीत ना रांगोळी, ना पणत्या! बीडच्या पाटसरा गावावर दुष्काळाचं सावट, चिमुकल्यांची चटणी-भाकरीवर दिवाळी!
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज;
महायुतीत पुन्हा धुसफूस! भाजपकडून डावलले जात असल्याने शिंदे गट नाराज; एकनाथ शिंदेंकडे मांडली कैफियत
दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत CM देवेंद्र फडणवीस नेमकं काय म्हणाले?
सयाजी शिंदे संतापले! 'झाडामध्ये देव आहे, त्याला विकणार का?' म्हणत...
सयाजी शिंदे संतापले! 'झाडामध्ये देव आहे, त्याला विकणार का?' म्हणत वृक्षतोडीला विरोध
गोकुळ दुध संघाबाबत मोठी अपडेट समोर! सरकारच्या 'त्या' निर्णयाला...
गोकुळ दुध संघाबाबत मोठी अपडेट समोर! सरकारच्या 'त्या' निर्णयाला राज्यपाल जिष्णू देव वर्मांची मंजुरी
सर, माझा जीव वाचवा' म्हणणाऱ्या वैभव चव्हाणच्या कुटुंबीयांची मनोज...
सर, माझा जीव वाचवा' म्हणणाऱ्या वैभव चव्हाणच्या कुटुंबीयांची मनोज जरांगेंनी घेतली भेट; प्रकरणाला नवे वळण!
संजय राऊतांनी आधी उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन करावा; नवनाथ बन यांचा..
संजय राऊतांनी आधी उबाठा गट काँग्रेसमध्ये विलीन करावा; नवनाथ बन यांचा खोचक टोला!