Javed Akhtar: 9 पेग रिचवले अन् 9 मिनिटात लिहिली अजरामर गझल; 44 वर्षानंतरही लावलंय वेड
गाण्याचे बोल, व्हिडिओ आणि संगीत हे सर्व खरोखरच उत्कृष्ट आहेत, पण तिच्या निर्मितीमागील कहाणी अधिक रंजक आहे जी खुद्द जावेद अख्तर यांनी सांगितली होती.

Javed Akhtar Ghajhal Story: भारतीय सिनेमांमध्ये संगीताला विशेष महत्त्व आहे. एखादा चित्रपट त्याच्या कथेपेक्षा त्यामधील गाण्यांमुळे जास्त चर्चेत येतो. हिंदी चित्रपटांना गाण्यांचा मोठा इतिहास आहे. बॉलिवू़डमधील अशी अनेक अजरामर गाणी आहेत जी कित्येक दशके लोटली तरी प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतात. असेच एक गाणे, गझल 44 वर्षांपूर्वी प्रदर्शित झाली होेती. पण ती आजही लोकप्रिय आहे. ही गझल जावेद अख्तर यांनी लिहिली असून ती 1982 सालच्या ‘साथ साथ’ या चित्रपटात होती. ही गझल फारुख शेख आणि दीप्ती नवल यांच्यावर चित्रित करण्यात आली होती. गाण्याचे बोल, व्हिडिओ आणि संगीत हे सर्व खरोखरच उत्कृष्ट आहेत, पण तिच्या निर्मितीमागील कहाणी अधिक रंजक आहे जी खुद्द जावेद अख्तर यांनी सांगितली होती.
दारुच्या नशेत लिहिली अजरामर गझल!
जावेद अख्तर यांची ही गाजलेली गझल म्हणजे “तुमको देखा तो ये खयाल आया” जावेद अख्तर यांनी खुलासा केला की त्यांनी ही गझल पूर्णपणे नशेत असताना लिहिली होती. फिक्की कोलकाता येथील एका कार्यक्रमात बोलताना त्यांनी ही कहाणी सांगितली. यावेळी ते म्हणाले की “‘सिलसिला’नंतर, यश चोप्रांचा एक सहाय्यक दिग्दर्शक आला आणि त्याने मला त्याच्या चित्रपटासाठी एक गाणे लिहिण्याची विनंती केली. बजेट जास्त नव्हते, पण मी होकार दिला. त्या दिवसांत मी खूप प्यायचो. तो बिचारा सहाय्यक दिग्दर्शक रडत येऊन मला गाण्याबद्दल विचारायचा
जावेद अख्तर यांनी सांगितला किस्सा!
पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, आम्ही पहाटे 2 वाजेपर्यंत बसून, पीत-पीत गप्पा मारायचो आणि गाणे लिहायचं राहून जायचं. एके दिवशी जेव्हा त्याने मला गाण्याबद्दल विचारले, तेव्हा पहाटेचे साधारण 2 वाजले होते. मी आधीच 8-9 पेग प्यायलो होतो. मी कागद आणि पेन मागितला आणि 9 मिनिटांत गाणे संगीतबद्ध करून त्याला दिले. त्यानंतर जगजीत सिंग यांनी ते गाऊन अजरामर केले. जावेद अख्तरने स्पष्ट केले की, त्याने ते गाणे 9 मिनिटांत लिहिले कारण त्या सहाय्यक दिग्दर्शकाला त्याची शेवटची ट्रेन पकडायची होती. तो सतत घड्याळाकडे पाहत होता. मी पटकन गाणे लिहिले आणि त्याला दिले.
