AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी गुजरातचा तराफा, काय आहे खासियत?; कशी आहे विसर्जनाची तयारी?

राज्यभरात उत्साहाने साजरा झालेला गणेशोत्सव आता संपणार आहे. उद्या अनंत चतुर्दशी असून, लालबागच्या राजाचे आणि इतर गणपतींचे विसर्जन होणार आहे. लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी नवीन तराफा वापरला जाणार आहे. गिरगाव चौपाटीवरही मोठ्या प्रमाणात तयारी करण्यात आली आहे. सुरक्षेसाठी फेस डिटेक्टरसारख्या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला जात आहे.

Lalbaugcha Raja : लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी गुजरातचा तराफा, काय आहे खासियत?; कशी आहे विसर्जनाची तयारी?
लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी खास तयारी
| Updated on: Sep 05, 2025 | 11:52 AM
Share

राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहाने पार पडला असून आता गणरायाला निरोप देण्याची वेळ आली आहे. उद्या, 6 सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी असून काही घरगुती गणपती आणि सार्वजनिक मंडळातील गणपतींचे विसर्जन पार पडेल. अनंत चतुदर्शीच्या अनुषंगाने गिरगाव चौपाटीवर मोठी तयारी करण्यात आली आहे. दरम्यान मुंबईतील सुप्रसिद्ध लालबागच्या राजाच्या गणपतीचे उद्याही थाटात विसर्जन होणार असून त्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली आहे.

लालबागच्या राजाच्या विसर्जनासाठी खास तयारी

मुंबईतील प्रसिद्ध गणेश मंडळांच्या गणपतीचे विसर्जनाला लालबाग- परळ गिरगावात भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे. सुरक्षेच्या दृष्टीने लालबागचा राजाआणि अन्य मंडळांनी पुढाकार घेत फेस डिटेक्टर ही यंत्रणा कार्यान्वित केली आहे. मुंबईतील प्रसिद्ध गणेश मंडळांच्या गणेशमूर्ती पाहण्यासाठी देशभरातून लाखो भाविक मुंबईत दाखल होतात.लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी, मुंबईचा सम्राट, मुंबईचा राजा, राजा तेजुकायाच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी होत असते.या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि सुरक्षेच्या दृष्टीने अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करण्याची मागणी काही वर्षांपासून केली जात आहे. ध्या लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळानी व जीएसबी सार्वजनिक गणेशोत्सव ‘फेस डिटेक्टर’ ही यंत्रणा कार्यान्वित केली आहे. अन्य मंडळांमध्ये मेटल डिटेक्टर व अन्य यंत्रणा लावण्यात आली आहेत.

खास तराफा तयार

दरम्यान लालबागाच्या राजाच्या विसर्जनसाठी यंदा विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. दरवर्षी विसर्जनसाठी वापरला जाणारा तराफा यंदा मात्र वापरला जाणार नाहीये. तर यावर्षी मोटराइज्ड तराफा वापरला जाणार आहे. विशेष म्हणजे गुजरातमधून हा तराफा यंदा बनवून घेण्यात आला असून तो 360 अंशात फिरतो. तसेच विसर्जनाच्या वेळी या तराफ्याच्या चहुबाजूला असणाऱ्या स्पिंकलर्सच्या माध्यमातून पाण्याचे फवारे उडतानाही वापरायला मिळणार आहेत.या तराफ्याला समुद्रात नेम्यासाठी आता अन्य दुसऱ्या बोटीची मदत लागणार नसून यंदा ये वेगळेपण पाहायला मिळणार आहे. त्यामुळे सर्वांचे लक्ष लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीकडे लागले आहे.

गिरगाव चौपाटी विसर्जनसाठी सज्ज

मुंबईतील प्रसिद्ध गणेश मंडळांच्या गणेशमूर्ती पाहण्यासाठी देशभरातून लाखो भाविक मुंबईत दाखल होतात. सुरक्षेच्या दृष्टीने लालबागचा राजाआणि अन्य मंडळांनी पुढाकार घेत फेस डिटेक्टर ही यंत्रणा कार्यान्वित केली आहे. तर गिरगाव चौपाटीवर मुंबई महानगरपालिकेकडून विसर्जनाच्या शेवटच्या दिवसाची तयारी करण्यात आली आहे. विसर्जनासाठी होणारी गणेशभक्तांची गर्दी पाहता गर्दीच्या नियोजनासाठी मुंबई पोलिसांचाही चोख बंदोबस्त असणार आहे. सुचनासाठी मुंबई पोलीस आणि पालिकेच्या वतीने मोठे व्यासपीठ, गणेशभक्तांसाठी स्वच्छतागृह आणि इतर सुविधासुद्धा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मुंबईतील प्रसिद्ध गणेश मंडळांच्या गणपतीचे विसर्जनाला लालबाग- परळ गिरगावात भाविकांची प्रचंड गर्दी होत आहे.

कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा
कांद्याची आवक घटली; दरात मोठी वाढ झाल्याने शेतकऱ्यांना दिलासा.
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
मुंबईची हवा झाली खराब! श्वास घेणेही कठीण, आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर.
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान
प्रश्नचिन्ह निर्माण होईल असं...; वडेट्टीवारांचं मोठं विधान.
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा
शिवसेना-संघाची विचारसरणी मिळतीजुळती! शिंदेंच्या विधानाची चर्चा.
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक
आज 'या' मार्गावर असणार मेगाब्लॉक.
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:
साताऱ्यातील ड्रग्स फॅक्टरी प्रकरणावरून राजकीय वर्तुळात खळबळ:.
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज
लिओनल मेस्सीच्या दौऱ्यात गोंधळ अन् लाठीचार्ज.
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा
19 डिसेंबरला राजकारणात मोठी घडामोड! पृथ्वीराज चव्हाणांचा खळबळजनक दावा.
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई
मेस्सीच्या स्वागतासाठी मुंबईत वांद्रे सी लिंकवर आकर्षक रोषणाई.
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल
मुंबईत बेपत्ता मुलांची संख्या वाढली, राज ठाकरेंचा सावल.