AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला अत्यंत मोठी ऑफर, तेलाचं राजकारण ढवळून निघणार, थेट…

अमेरिका आणि भारतामध्ये ट्रेड डील संदर्भात बोलणी सुरू आहेत, ट्रेड डील संदर्भात बोलणी सुरू असतानाच आता ट्रम्प यांनी पुन्हा एकदा भारताला मोठी ऑफर दिली आहे. आता भारत काय निर्णय घेणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.

डोनाल्ड ट्रम्प यांची भारताला अत्यंत मोठी ऑफर, तेलाचं राजकारण ढवळून निघणार, थेट...
Donald Trump Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 01, 2026 | 4:32 PM
Share

भारत आणि अमेरिकेमध्ये एक मोठी ट्रेड डील होणार आहे, त्यावर चर्चा देखील सुरू आहे. मात्र अमेरिकेनं भारतावर लावलेल्या टॅरिफमुळे दोन्ही देशातील संबंध प्रचंड ताणले गेले आहेत. तसेच अमेरिकेनं लावलेल्या टॅरिफचा निर्यातीला देखील मोठा फटका बसला आहे. भारताची अमेरिकेत होणारी निर्यात कमी झाली आहे, मात्र दुसरीकडे चीन आणि रशियासोबत होणारी निर्यात प्रचंड प्रमाणात वाढली आहे. भारत रशियाकडून तेलाची खरेदी करतो म्हणून अमेरिकेनं भारतावर तब्बल 50 टक्के टॅरिफ लावला आहे, तसेच भारताकडून मिळणारा पैसा हा रशिया युद्धासाठी वापरत असल्याचा आरोप देखील अमेरिकेनं केला आहे. दरम्यान हे सर्व सुरू असतानाच आता पुन्हा एकदा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठा दावा केला आहे, या दाव्यामुळे खळबळ उडाली आहे. एकीकडे भारत आणि अमेरिकेमध्ये ट्रेड डील संदर्भात बोलणं सुरू आहे, तर दुसरीकडे डोनाल्ड ट्रम्प यांचं भारतासोबत वादग्रस्त वक्तव्य करणं सुरूच आहे. शनिवारी बोलताना त्यांनी मोठं विधान केलं आहे. भारत आता इराण ऐवजी व्हेनेझुएलाकडून तेलाची खरेदी करेल आम्ही तसा करार केला आहे, असा दावा डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे.

एका रिपोर्टनुसार एक दिवसापूर्वी अमेरिकेकडून भारतासमोर व्हेनेझुएलाकडून तेलाची खरेदी करण्याचा प्रस्ताव देण्यात आला होता, त्यावर भारतानं काय प्रतिक्रिया दिली हे अद्याप समोर आलेलं नाहीये, भारतानं रशिया आणि इराणकडून तेलाची खरेदी बंद करावी अशी अमेरिकेची इच्छा आहे. दरम्यान यापूर्वी देखील भारत व्हेनेझुएलाकडून तेलाची खरेदी करत होता, तेव्हा मात्र ट्रम्प त्याला देखील विरोध करत होते, मात्र आता डोनाल्ड ट्रम्प यांनी व्हेनेझुएलाचे राष्ट्रपती निकोलस मादुरो यांना अटक केली आहे, त्यानंतर त्यांनी भारतासह चीनला व्हेनेझुएलाकडून तेल खरेदी करण्याची ऑफर दिली आहे.

भारत आणि अमेरिकेमध्ये एक मोठी व्यापारी डील होणार आहे, या संदर्भात माहिती देताना मंत्री पीयूष गोयल यांनी म्हटलं की, दोन्ही देशांकडून या डील संदर्भात सकारात्मक चर्चा सुरू आहे, लवकरच ही डील होऊ शकते असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला आहे.

Follow Us
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट
राधाकृष्ण विखे पाटील यांची रुग्णालयात मनोज जरांगे पाटील यांच्याशी भेट, व्हिडीओ आले समोर
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले...
दुष्काळ आढावा बैठकीतील काजू बदाम वादावर भरणेंचा खुलासा; म्हणाले, शुगर असलेल्यांनीच...
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ
दत्तात्रय भरणेंना हिंगोलीत संतप्त शेतकऱ्यांनी काजू बदाम दिले, व्हिडीओ व्हायरल
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा..
2022 मध्ये सरकार बदलल्यानंतर... दिशा सालियान प्रकरणी वरुण सरदेसाईंचा मोठा दावा
ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
Disha Salian Case : ठाकरेंच्या सेनेचे शिवसैनिक मातोश्रीवर दाखल, कडेकोट पोलिस बंदोबस्त
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरेंच्या वकिलांनी...
मातोश्री निवासस्थानाच्या प्रवेशद्वारावरच आदित्य ठाकरे यांच्या वकिलांनी... सतीश सालियान यांनी दिला 7 दिवसांचा अल्टिमेटम
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं...
दिशा सालियान प्रकरणी ठाकरे गटातील बड्या नेत्याची प्रतिक्रिया, नेमकं काय म्हणाले?
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम...
पाऊस गायब, पाण्याची चिंता वाढली; विक्रम पाचपुतेंनी सुचवला कृत्रिम पावसाचा पर्याय
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, ‘डिजिटल सापळ्यात...
UPI शुल्कावर राज ठाकरेंचा संताप; म्हणाले, 'डिजिटल सापळ्यात’ नागरिकांना अडकवले
नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी
Nanded | नांदेडमध्ये कृषिमंत्र्यांच्या ताफ्यासमोर शेतकऱ्यांची घोषणाबाजी