लालबागचा राजा मंडपातून बाहेर मार्गस्थ, शेवटच्या निरोपासाठी भक्तांची अलोट गर्दी
Lalbaugcha Raja Visarjan Miravnuk : लाडक्या बाप्पांची मनोभावे पूजा आणि सेवा केल्यावर आज त्यांना निरोप देण्याची वेळ आली आहे. सध्या लालबागमधील रस्ते गणेशभक्तांच्या गर्दीने फुलून गेल्याचे पाहायला मिळत आहे. जगभरात ख्याती असलेल्या लालबागच्या राजाच्या मिरवणुकीला आता सुरूवात होतेय.
राज्यभरात गेल्या दहा दिवस जल्लोषात सुरू असलेल्या गणेशोत्सवाची आज सांगता होणार आहे. आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी मुंबईतील लालबाग-परळमध्ये सध्या गणेश भक्तांचा महापूर आल्याचे पाहायला मिळत आहे. मुंबईतील गणपती बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकांना देखील सुरूवात झाली आहे. अशातच लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीपूर्वीची आरती झाल्यानंतर लालबागचा राजा मंडपातून बाहेर मिरवणुकीकरता मार्गस्थ होत आहे. ट्रॉलीवर लालबागचा राजा मिरवणुकीकरता बसवण्यात आला आहे. लालबागच्या राजाचं आगमन झाल्यापासून भाविकांची मोठी रिघ पाहायला मिळत होती. आता विसर्जन मिरवणुकीत भाविकांची अलोट गर्दी होत आहे. आज बाप्पाला निरोप देताना आपल्या लाडक्या लालबागच्या राजाची शेवटची झलक पाहण्यासाठी आणि चरण स्पर्शासाठी भाविकांनी राज्याच्या मिरवणुकीसाठी गर्दी केली आहे.
Latest Videos
Latest News