AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

पतंजली फूड्सची बंपर कमाई, ९ महिन्यात २९,००० कोटींचा महसुल

तिसऱ्या तिमाहीत कंपनीचा महसुल १०,५०० कोटी रुपयांचा जवळपास पोहचला आहे.जागतिक अस्थिरता, सोन्या-चांदीच्या दरातील चढ-उतार आणि रुपयांची घसरण सुरु असताना पतंजली फूड्स कंपनीची कामगिरी शानदार राहिली आहे.

पतंजली फूड्सची बंपर कमाई, ९ महिन्यात २९,००० कोटींचा महसुल
Patanjali Foods' bumper earnings
| Updated on: Feb 12, 2026 | 11:37 PM
Share

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या नऊ महिन्यातच बाबा रामदेव यांच्या पतंजली फूड्सने कमाईचा मोठा रेकॉर्ड बनवला आहे. पहिल्यांदाच नऊ महिन्यात महसुल २९ हजार कोटी रुपयांच्या पार गेला असून हा एक विक्रम आहे. याच्या आधी कधीच असे पाहायला मिळाल नाही. जर तिसऱ्या कमाईचे बोलायचे झालेल तर कंपनीचा रेव्हेन्यू १०,५०० कोटी रुपये झाला आहे. जागतिक पातळीवर कमोडिटीच्या किंमतीतील चढ-उतार, रुपयातील मोठी घसरण,जगासमोरील आर्थिक आव्हानानंतरही कंपनीचा महसुल चांगला असल्याचे कंपनीने म्हटले आहे. जर एबिटडा (EBITDA) विचार केला तर तो ५०० कोटी रुपयांच्या खाली पाहायला मिळाला. चला तर पाहूयात तिमाहीचे आकडे काय आहेत.

कोणत्या प्रकारचे आकडे पाहायला मिळाले ?

ऑपरेशनमुळे महसुल १०,४८३.७१ कोटी रुपये राहिला, जो गेल्या वर्षांच्या तुलनेत १६.५३ टक्के आणि गेल्या तिमाहीच्या तुलनेत ७.२३ टक्के जास्त आहे.

९ महिन्याच्या काळाचा महसुल २९,०१३.९८ कोटी रुपयापर्यंत पोहचला होता, जो गेल्या वर्षांच्या तुलनेत १६.५५ टक्क्यांहून जास्त पाहायला मिळाला आहे.

आर्थिक वर्षे २०२६ च्या तिसऱ्या तिमाहीसाठी एकूण ईबीआयटीडीए (अपेक्षाकृत वस्तूंना सोडून )४९२.०६ कोटी रुपये होता.ज्याचे मार्जिन ४.६९ टक्के आहे.

तिमाहीसाठी कर पश्चात लाभ (पीएटी) ५९,७३५.८५ लाख रुपये ( वा ५९३.७६ कोटी ) होता.

FMCG सेगमेंटने जबरदस्त कमाई करुन दिली

FMCG सेगमेंट: आर्थिक वर्ष २०२६ च्या तिमाहीत ३,२४८.३५ कोटी रुपयांची संयुक्त विक्री नोंदवली आहे. जी गेल्या वर्षांच्या तुलनेत ३८.९३ टक्के जास्त आहे. या सेगमेंटचे एकून महसुल ३०.६८ टक्के आणि EBITDA ( अपात्र उत्पन्न वगळून ) मध्ये ६६.३३ टक्क्यांचे योगदान राहिले.

फूड ऑईल सेगमेंट: आर्थिक २०२६ च्या तिसऱ्या तिमाहीत याने ७,३३५.७१ कोटी रुपयांचा रेव्हेन्यू नोंदवला,जो गेल्या वर्षांच्या तुलनेत ८.९८ टक्के जास्त आहे. ब्रँडेड फूड ऑईलने विक्रीला प्रोत्साहन मिळाले असून जे एकून खाद्य तेल विक्रीच्या सुमारे ८५ टक्के जास्त आहे. सेगमेंटल EBITDA मार्जिन २.३९ टक्के राहिले. एअर टर्बाईन पॉवर प्रोडक्शन अंतर्गत या तिमाहीत ४.२७ कोटी रुपयांचा महसूल मिळवला आहे.

Follow Us
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे...
तुषार गांधींना ताब्यात घेतल्याने राजकीय वातावरण तापलं! आदित्य ठाकरे, संजय राऊत पोलीस ठाण्यात दाखल
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
दिल्लीतील आंदोलकांच्या धरपकडीवर राज ठाकरे आक्रमक; सरकारवर साधला निशाणा
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव...
कधीकाळी ऐतिहासिक वारसा म्हणून ओळख; चालुक्यकालीन महादेव मंदिर बारव नष्ट होण्याच्या मार्गावर
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनाला..
इथे आजीचं निधन, तिथे अभिजीत दिपके पोलिसांच्या ताब्यात; अंत्यदर्शनालाही मुकणार, कुटुंबिय म्हणाले आता...
अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात...
मोठी बातमी! अरविंद केजरीवाल, सिसोदीया यांना ताब्यात घेतलं, दिल्लीतील आंदोलनात धरपकड सुरूच
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची...
सोलापूरमध्ये दुष्काळाची भीषण स्थिती! 10 तालुक्यांत केंद्रीय पथकाची पाहणी, खरीप पिकांचे मोठे नुकसान
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं
Mamata Banerjee | दिल्ली पोलिसांनी ममता बॅनर्जीना ताब्यात घेतलं, मोठं कारण समोर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर
नाशिकच्या कांदा उत्पादकांसाठी चिंतेची बातमी! येत्या काळात कांद्याचे दर वाढणार?
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच...
कोल्हापूरच्या अंबाबाई दर्शनासाठी हायटेक नियोजन! QR कोड स्कॅन करताच मिळणार 'ही' सुविधा
काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे
Nitesh Rane | काँग्रेसच्या काळातील SIRवर आक्षेप का नाही घेतला? - नितेश राणे