ATM मधून पैसे काढण्याआधी सावधान! नियमात बदल,आता बँक सांगणार किती फ्री ट्रान्झॅक्शन उरले
आरबीआयने एटीएममधून पैसे काढण्याच्या नियमात बदल केले आहेत. आता बँकांनाच ग्राहकांना त्यांचे किती फ्री ट्रान्झॅक्शनचे चान्स उरले आहेत हे सांगावे लागणार आहे.

जर तुम्ही दर महिन्याला एटीएममधून पैस काढत असाल तर आरबीआयचा (RBI )नवा नियम तुम्हाला माहिती असायला हवा. आजपासून बँका तुम्हाला स्वस्त: सांगतील की महिन्यात किती फ्री एटीएम ट्रान्झक्शन झाले आहेत आणि पुढच्या वेळी पैसे काढायला जाल तर किती चार्ज तुम्हाला लावला जाईल. म्हणजे एटीएममधून पैसे काढताना अचानक लागणाऱ्या चार्जची आता आगाऊच माहिती तुम्हाला तुमची बँकच देणार आहे.
RBI ने ATM आणि PoS मशिनद्वारे काढण्यात येणाऱ्या कॅश संदर्भात जुन्या नियमांना एकत्र करुन नवीन मास्टर डायरेक्शन जारी केले आहे. यासाठी केंद्रीय बँकेने साल २००८ ते २०२२ दरम्यान जारी केले गेलेल्या १७ जुन्या सर्क्युलरला मागे घेतले आहे. नव्या निर्देश आज म्हणजे २७ नोव्हेंबर २०२६ पासूनच लागू केले गेले आहेत.
काय आहे नवा नियम
आरबीआयच्या नवीन निर्देशानुसार बँकांना अशी व्यवस्था तयार करावी लागणार आहे. ज्या अंतर्गत ग्राहकांना दर महिन्याला वापरलेले गेल्या फ्री एटीएम ट्राक्झंशनची माहिती दिली जाऊ शकले. तसेच हे सांगावे लागेल की फ्री लिमिट संपल्यानंतर पुढील ट्राक्झंशनवर किती चार्ज भरावा लागू शकेल.
याचा फायदा हा होईल की ग्राहकांना आपल्या एटीएमवापरावर नजर ठेवावी लागेल. जर त्याचे फ्री ट्राक्झंशन संपलेले असेल तर तो गरजेच्या नुसार पैसे काढण्याचा निर्णय घेऊ शकेल.
किती वेळा काढता येतात फ्री पैसे?
| ATM ची जागा | फ्री ट्राक्झॅशनची लिमिट |
|---|---|
| आपल्या बँकेच्या एटीएममधून | 5 |
| दुसऱ्या बँकेचे एटीएम ( मेट्रो शहर ) | 3 |
| दुसऱ्या बँकेचे एटीएम ( नॉन मेट्रो शहर ) | 5 |
किती चार्ज लागणार ?
जर तुम्ही महिन्यातील सर्व फ्री एटीएम ट्राक्झंशनचा वापर केला असेल तर बँक तुमच्याकडून पुढील पैसे काढताना चार्ज लावू शकते. आरबीआयच्या मते हा चार्ज प्रति टाक्झंशन कमार २३ रुपयांपर्यंत असू शकतो. याच्यावर लागू टॅक्स देखील द्यावा लागू शकतो.
मात्र, बँका आपल्या बोर्डाने मंजूर पोलिसी अंतर्गत चार्ज करु शकणार आहे. म्हणजे प्रत्येक बँकेमध्ये लागणारा वास्तविक चार्ज वेगवेगळा असू शकतो. मात्र, आरबीआयच्या कमाल मर्यादेपेक्षा जास्त चार्ज लावता येणार नाही.
पैसे नाही निघाले तर चार्ज लागणार नाही ?
अनेकदा एटीएममध्ये कार्ड टाकल्यानंतर आणि पिन नोंदवल्यानंतरही पैसे निघत नाही. कधी मशीनमध्ये कॅश नसते तर कधी तांत्रिक खराबीमुळे ट्राक्झंशन फेल होते. अशा प्रकरणात चार्ज लागणार नाही.
RBI च्या निर्देशानुसार तांत्रिक खराबी, नेटवर्कचा प्रॉब्लेम आणि ATM मध्ये कॅश नसल्याने फेल झालेल्या ट्राक्झंशनला फ्री ट्राक्झंशनच्या लिमिटमध्ये गणले जाणार नाही.
