AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उत्तर कोरियामध्ये मोठी उलथापालथ, किम जोंग उनची निवृत्ती? आता ही व्यक्ती पहाणार देशाचा कारभार

मोठी बातमी समोर येत आहे, उत्तर कोरियाच्या हुकूमशाहाने आपल्या उत्तराधिकाऱ्याची घोषणा केली आहे. त्यामुळे आता उत्तर कोरियामध्ये घडामोडींना वेग आला आहे.

उत्तर कोरियामध्ये मोठी उलथापालथ, किम जोंग उनची निवृत्ती? आता ही व्यक्ती पहाणार देशाचा कारभार
Kim Jong Un
| Updated on: Feb 12, 2026 | 9:19 PM
Share

उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग उन यांनी अखेर आपला उत्तराधिकारी निवडला आहे. किम जोंग उन यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून आपली मुलगी जू एची निवड केली आहे. दक्षिण कोरियाचा गुप्तचर विभाग नॅशनल इंटिलेजन्स सर्व्हिस (NIS) च्या अधिकाऱ्यांनी आज दक्षिण कोरियांच्या खासदारांसोबत झालेल्या बैठकीमध्ये याबाबतची माहिती दिली आहे. एनआयएसने दिलेल्या माहितीनुसार उत्तर कोरियाचा हुकूमशाहा किम जोंग उन यांनी आपल्या मुलीच्या नावाची घोषणा उत्तराधिकारी म्हणून केली आहे. किम जोंग उन यांनी उत्तराधिकारी म्हणून मुलीच्या नावाची घोषणा करताच तिच्या प्रशिक्षणाला देखील सुरुवात झाली आहे, ती आता किम जोंग उन यांची जागा घेण्याच्या शेवटच्या टप्प्यात आहे, याचाच अर्थ आता किम कुटुंबातील चौथी पिढी उत्तर कोरियामध्ये सत्तेत येणार आहे.

कोण आहे किम जोंग यांची मुलगी जू?

किम जोंग यांची मुलगी किम जू ए बाबत खूपच कमी माहिती उपलब्ध आहे. समोर आलेल्या माहितीनुसार किम जू ए चं वय अवघं 13 वर्ष इतकं आहे, तिचा जन्म 2013 साली झाला होता. नोव्हेंबर 2022 मध्ये ती पहिल्यांदाच जगासमोर आली. ज्यावेळी उत्तर कोरियानं एका लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राची टेस्ट केली होती. त्यानंतर ती अनेकदा आपले वडील किम जोंग उन यांच्यासोबत दिसली. तिने अनेक कार्यक्रमांमध्ये आपले वडील किंम जोंग उन यांच्यासोबत हजेरी लावली आहे. तसेच तीच्या हस्ते उत्तर कोरियामध्ये अनेक विकास कामांचं उद्घाटन देखील झालं आहे. विविध क्षेपणास्त्रांची टेस्ट, उत्तर कोरियाच्या सैन्याची परेड अशा महत्त्वपूर्ण कार्यक्रमाला देखील ती नियमीतपणे उपस्थित राहते.

यावर्षी जानेवारी महिन्यात किम जू ए ने कुमसुसन सन पॅलेसचा देखील दौरा केला होता. हा किम कुटुंबाचा प्रतिकात्मक मकबरा आहे. जो उत्तराधिकारी होणार असतो, त्यापूर्वी ती व्यक्ती या मकबऱ्याला भेट देते, आणि त्यानंतरच तिच्या नावाची घोषणा केली जाते. त्यामुळे हा देखील एक संकेत आहे, की किम जोंग उन यांनी आपल्या उत्तराधिकाऱ्याची घोषणा केली आहे, त्यांनी आपला उत्तराधिकारी म्हणून आपल्या मुलीच्या नावाची घोषणा केली आहे.

Follow Us
मतदार यादीतील फेरफारवरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर साधला निशाणा
उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप: महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळले, भविष्यात बनावट मतदारांचा धोका
डीजे परवानगीशिवाय वाजवला, पुण्यातील मंडळाला कोर्टाकडून दोषी ठरवून दंड
पुण्यात जुलूसदरम्यान अनधिकृत डीजे; अल मदिना यंग बॉईज सर्कलला कोर्टाचा दणका
जोरदार पावसामुळे दिल्लीतील प्रमुख मार्गांवर पाणी साचले, वाहतूक मंदावली
दिल्लीत मुसळधार पाऊस: सुब्रतो पार्क परिसरात भीषण वाहतूक कोंडी, जनजीवन विस्कळीत
सोनिया गांधी आत्मचरित्र बिलॉन्गिंग हार्परकॉलिन्स इंडिया प्रकाशित करणार
सोनिया गांधींच्या बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव आत्मचरित्राचा मार्ग मोकळा, हार्परकॉलिन्स करणार प्रकाशन
नागपूरनंतर आता सोलापूर आणि संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
नागपूरनंतर आता सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
गद्दार कोण आणि... हे जनतेनं दाखवलं, सरनाईकांचा विरोधकांना टोला
Pratap Sarnaik | गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे जनतेनं दाखवलं, प्रताप सरनाईकांचा विरोधकांना टोला
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना थेट इशारा
परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? बापटांचा सवाल
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? विद्यानंद बापटांचा धंगेकरांना थेट सवाल
जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा..
Satej Patil on Manoj Jarange Protest | जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा थेट इशारा; मराठा आरक्षणावरून सरकारवर घणाघात
पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर-बापट यांच्यात खडाजंगी
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर- विद्यानंद बापट यांच्यात खडाजंगी,  व्हिडीओ बघाच