AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

…आली होती परदेशातून, चालली होती परदेशात, मुंबई विमानतळावर पहाटे झाला बाळाचा जन्म

भारतातील सर्वाधिक वर्दळीच्या विमानतळावर एका परदेशी महिला प्रवाशाला मंगळवारी पहाटे अचानक प्रसव कळा सुरु झाल्या आणि विमानतळावर इमर्जन्सी डिक्लेअर झाली. शहर साखर झोपेत असताना एका नवजात बालिकेच्या एका नवजात बालिकेच्या रडण्याच्या आवाजाने मुंबईला जाग आली.

...आली होती परदेशातून, चालली होती परदेशात, मुंबई विमानतळावर पहाटे झाला बाळाचा जन्म
Tanzanian woman passenger delivers safely at Mumbai International Airport
| Updated on: Feb 12, 2026 | 9:00 PM
Share

मुंबई विमानतळ म्हणजे मिनिटा-मिनिटांना होणारी देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय विमान उड्डाणे आणि सतत प्रवाशांची तपासणी आदी सोपस्कार पार पाडून प्रवाशांची विमाने पकडण्याची घाई..परंतू मात्र १० फेब्रुवारीची सकाळ काही वेगळीच होती. छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ (सीएसएमआयए) येथील आंतरराष्ट्रीय-ते-आंतरराष्ट्रीय प्रवासी मार्गिकेत एक विलक्षण वैद्यकीय आपत्कालीन प्रसंग घडला. एका परदेशी महिलेला अचानक प्रसवकळा सुरु झाल्या. अखेर कर्मचारी आणि वैद्यकीय पथकाने त्वरित हालचाली केल्याने या महिलेने एका गोंडस बाळाला जन्म दिला. परंतू हा जन्म कसा झाला आणि डॉक्टरांनी काय शर्थ लढवली हे वाचा….

सकाळी ५:१७ वाजता अचानक लगबग वाढली. विमानतळाच्या वैद्यकीय पथकाला एका प्रवासी महिलेला तातडीची वैद्यकीय मदतीची गरज असल्याचा कॉल आला. ही २६ वर्षीय महिला प्रवासी ( टांझानियाची नागरिक ) महिला साधारणपणे ३६ आठवड्यांची गर्भवती होती. आणि आंतरराष्ट्रीय-ते-आंतरराष्ट्रीय असा प्रवास करत असताना तिला अचानक तीव्र प्रसूती कळा सुरू झाल्या त्यामुळे कर्मचाऱ्यांची कसोटी लागली.

 डॉक्टरांची शर्यत

परिस्थितीचे गांभीर्य ओळखून CSMIA च्या वैद्यकीय पथकाने अतिशय वेगाने हालचाली केल्या. काही मिनिटांतच डॉक्टर घटनास्थळी पोहोचले. या प्रवासी महिलेला तीव्र प्रसूती कळा सुरु झाल्या होत्या. गर्भजल पिशवी फुटल्याने आणि तीव्र प्रसूती कळा त्यामुळे कोणत्याही क्षणी प्रसुती होऊ शकते हे डॉक्टरांनी पाहिले आणि निर्णय घेतले गेले.

गर्भवती महिलेला काळजीपूर्वक विमानतळाच्या रुग्णवाहिका बग्गीतून स्ट्रेचरवर हलविले आणि टर्मिनलमधील लिफ्टद्वारे एअरसाईड रुग्णवाहिकेकडे नेण्यात आले. या प्रक्रियेत विमानकंपनीचे कर्मचारी आणि केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सीआयएसएफ) यांनी मोलाचे सहकार्य केले. टर्मिनल कार्यकारी पथकाने स्थलांतर अधिकाऱ्यांशी तातडीने समन्वय साधत तात्पुरता प्रवासी व्हिसा त्वरित जारी होईल, याची खात्री केली. ज्यामुळे या अत्यंत महत्त्वाच्या क्षणी सर्व यंत्रणांना झटपट निर्णय घेतल्याने कोणताही प्रशासकीय विलंब झाला नाही.

पहाटे ५:४० वाजता, विमानतळाचे वैद्यकीय पथक आणि एअरलाईनच्‍या कर्मचाऱ्यांसह रुग्णवाहिका हॉस्पिटलकडे रवाना झाली. पण, प्रवासाला सुरुवात होऊन काही काळ उलटला नसेल, तोच परिस्थिती अधिक आव्हानात्मक झाली. रुग्णवाहिका पहाटे शहरातील वाहतुकीतून मार्ग काढत असताना त्या महिलेच्या प्रत्यक्ष प्रसूतीला सुरूवात झाली. कोणतेही ऑपरेशन थिएटर नाही की कोणतीही अन्य व्यवस्था आणि डॉक्टरांनी रूग्‍णवाहिकेत प्रसुती केली.

धावत्‍या रूग्‍णवाहिकेमध्‍ये प्रसूती

धावत्या रुग्णवाहिकेमध्येच विमानतळाच्या वैद्यकीय पथकाने अत्यंत तत्परतेने आणि निर्णायकपणे पावले उचलली. प्रसूतीची प्रक्रिया सुरु करीत डॉक्टरांनी त्या महिलेला योग्य स्थितीत राहण्यास मदत केली. काही क्षणांनंतर, बाळाचे डोके दिसू लागले आणि पहाटे ५:४५ वाजता रुग्णवाहिकेत या महिलेने बाळास जन्म दिला. मुंबई शहर साखर झोपेतून जागे होत असताना बाळाच्या रडण्याच्या आवाजाने मातेच्या आणि एम्ब्युलन्समधील डॉक्टरांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला.

वैद्यकीय पथकात डॉ. कृतिका, डॉ. मधु आणि डॉ. किसले यांचा समावेश होता. त्यांना परिचारका माधुरी आणि अशोक तसेच रुग्णवाहिका चालक ओंकार यांचे सहकार्य लाभले. माता आणि बाळ दोघांनाही पहाटे ५:५५ वाजेपर्यंत हॉस्पिटलच्या आपत्कालीन कक्षात नेले, माता आणि बाळ दोघांची प्रकृती स्थिर असल्याचे रुग्णालयाने कळवले आणि सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद पसरला.

एमआयएएलसाठी असे प्रसंग क्वचितच घडतात, भारतातील सर्वाधिक वर्दळीच्या विमानतळाची जबाबदारी अदाणी विमानतळ होल्डिंग्ज लिमिटेड (एएएचएल)ची उपकंपनी असलेल्या मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेड (एमआयएएल) कडे आहे. या एमआयएएलच्या वैद्यकीय आणि कार्यकारी पथकांच्या जलद प्रतिसादामुळे घरापासून दूर आणि प्रवासादरम्यान असलेल्या एका महिलेने गोंडस मुलीला सुखरूप जन्म दिला…

Follow Us
शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
नवी मुंबईत थरार! शॉर्टसर्किटमुळे 2 विद्यार्थिनींना विजेचा धक्का अन् पुढे जे घडलं....
भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या...
Mumbai -Nashik Highway | भिवंडीत वाहतुकीचा खोळंबा! मुसळधार पावसामुळे महामार्गावर वाहनांच्या लांबच लांब रांगा
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन्...
ठाकरेंसोबत दगाफटका? एकीकडे आम्ही भाजपच्या विरोधात लढतोय अन् संभाजीनगरात... बोलता बोलता सुषमा अंधारे हे काय म्हणाल्या?
बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज... फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
मोठी बातमी! बनावट बियाण्यांना लगाम, दिवसा वीज, AI शेती... मुख्यमंत्री फडणवीसांनी सांगितला प्लॅन!
नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना
Sunetra Pawar | नाव पुकारलं मात्र... कृषी पुरस्कार वितरण कार्यक्रमात सुनेत्रा पवारांना वेटिंगवर ठेवलं? भर मंचावर...
ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी....
Goregaon Drugs Case | ड्रग्ज रॅकेटवर पोलिसांचा आणखी एक घाव; गोरेगाव प्रकरणात 13 वा आरोपी गजाआड
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापती
अजितदादा आणि सचिन भाऊंचं नातं कुटुंबासारखं, सचिन अहिर यांची उपसभापतीपदी निवड होताच सुनेत्रा पवार यांच्याकडून अभिनंदन!
मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
Heavy Rain | मुसळधार पावसाचा कहर! नालासोपारा जलमय; पालघरमध्ये तर घराची भिंतच कोसळली
श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
मोठी बातमी! श्रीकांत शिंदेंचा ताफा अडवला; काळे झेंडे दाखवत शिवसैनिकांचा संताप
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा Video
उंच उंच लाटा... समुद्र उसळला...मुंबईच्या समुद्रात मोठी भरती; पहा व्हिडीओ!