AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

वॉर्मर मशीनमध्ये नवजात बाळाला ठेवलं अन् अचानक… रुग्णालयात मातम; त्या घटनेने अख्ख शहर हादरलं

एका खासगी रुग्णालयात हृदयद्रावक घटना घडली आहे. जन्मानंतर लगेचच NICU मधील वॉर्मरमध्ये ठेवलेल्या नवजात बाळाचा शॉर्ट सर्किटमुळे दुर्दैवी मृत्यू झाला. निष्पाप बाळाच्या मृत्यूने कुटुंबाला मोठा धक्का बसला असून, त्यांनी रुग्णालयाच्या निष्काळजीपणावर गंभीर आरोप केले आहेत. या घटनेने आरोग्य व्यवस्थेतील सुरक्षिततेबद्दल गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झालं.

वॉर्मर मशीनमध्ये नवजात बाळाला ठेवलं अन् अचानक... रुग्णालयात मातम; त्या घटनेने अख्ख शहर हादरलं
नवजात बाळाच्या मृत्यूने शहर हादरलं
| Updated on: Feb 09, 2026 | 10:21 AM
Share

आपल्याकडे डॉक्टरांना देवाचं दुसरं रूप मानलं जातं. जीवरक्षक म्हटलं जातं. पण हॉस्पिटल स्टाफच्या निष्काळजीपणामुळे एखाद्या निरागस, निष्पाप बाळाचा जीव गेला तर ? अशा वेळी व्यवस्थेबद्दल गंभीर प्रश्नचिन्ह उपस्थित होता. कानपूरच्या बिठूर ठाणे क्षेत्रात अशीच एक हृदय हेलावणारी भयानक घटना घडल्याचे समोर आले आहे. तिथे एका खासगी रुग्णालयात नवजात बाळाचा दुर्दैवी, वेदनादायी मृत्यू झाला. ही घटना बिथूर येथील ब्रह्मा नगर येथील राजा रुग्णालयात घडली, हे हॉस्पिटल डॉ. विवेक मिश्रा चालवतात. मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रुग्णालयात एका गर्भवती महिलेची प्रसूती झाली. कुटुंबातील पहिलं अपत्य होतं ते, त्या महिलेने एका मुलीला जन्म दिला, त्यामुळे घरात अतिशय आनंदाचं वातावरण होतं.

NICU च्या वॉर्मरमध्ये ठेवलं बाळ, अचानक शॉर्ट सर्किट

जन्मानंतर लगेचच, नवजात बाळाला देखभाल करण्यासाठी आणि शरीराचे तामपान नियंत्रित ठेवण्यासाठी त्य रुग्णालयाच्या एनआयसीयू वॉर्डमध्ये एका वॉर्मर  मशीनमध्ये ठेवण्यात आले. आई आणि बाळ दोघेही लवकरच स्वस्थ होतील आणि घरी परत येतील अशी कुटुंबाला आशा होती. मात्र त्याचवेळी वॉर्मर मशीनमध्ये अचानक शॉर्ट सर्किट झालं आणि त्या मशीनला मोठी आग लागली. ती आग एवढी वेगाने पसरली, कोणाला काही कळलंच नाही, काहीही सुधरेना. वॉर्मरमध्ये झोपलेले ते नवजात बाळही आगीच्या विळख्यात सापडलं.

जन्मानंतर अवघ्या काही तासांतच मृत्यू

मात्र रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना आणि कुटुंबियांचं लक्ष जाईपर्यंत ते बाळ गंभीर भाजलं होतं. तिला वाचवण्याचे प्रयत्न सुरू झाले, मात्र अवघ्या काही तासांपूर्वी जन्मलेल्या, त्या निष्पाप बाळाचा होरपळून जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. कुटुंबियांना, त्या बाळाच्या आई-वडिलांना जबर धक्का बसला, कारण ते त्यांचं पहिलंच अपत्य होतं. ज्या बाळाची आतुरतेने वाट पाहिली, जिच्या हसण्याने घर आनंदणार होता, त्याच घरात शोकाकुल वातावरण होत. रडूनरडून कुटुंबियांची हालत खराब झाल.

निष्काळजीपणाचा आरोप

या दुर्दैवी घटनेनंतर, मृत बाळाच्या कुटुंबीयांनी रुग्णालय प्रशासन आणि डॉक्टरांवर घोर निष्काळजीपणाचा आरोप केला आहे. जर योग्य सुरक्षा मानकांचे पालन केलं गेलं असतं आणि मशीनची नियमित तपासणी केली गेली असती तर ही दुर्घटना टाळता आली असती आणि आम्हाला आमचं बाळ गमवावं लागलं नसतं, असं त्यांचं म्हणणं आहे. बिघडलेली परिस्थिती पाहून डॉक्टर मिश्रा आणि संपूर्ण स्टाफ हॉस्पिटल सोडून फरार झाला. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला असून संपूर्ण हॉस्पिटल सील करण्यात आलं आहे. पुढील तपास सुरू आहे.

Follow Us
लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; प्रसंगावधानामुळे जीव वाचला
Kalyan : लोकलमधून तरुणी थेट रेल्वे ट्रॅकवर पडली; पोलिसांनी क्षणाचाही विलंब न करता धाव घेतली, प्रसंगावधानामुळे जीव वाचला
मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ
SIR : महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! SIRवरील दावे-आक्षेपांसाठी 12 ऑक्टोबरपर्यंत मुदतवाढ, निवडणूक आयोगाचं महत्त्वाचं स्पष्टीकरण ऐकाच...
ह्यांना परवानगीचा मिजास...; बापटांचा विसर्जन मिरवणुकीवर घणाघात
Vidyanand Bapat : ह्यांना परवानगीचा मिजास...त्यामुळे अशा खुळचट...; बापटांचा विसर्जन मिरवणुकांच्या परवानगीवरच घणाघात
मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक
Election Commission : मतभेद समोर आल्यानंतर पहिल्यांदाच मुख्य निवडणूक आयुक्तांची बैठक, काय महत्वाचे निर्णय घेतले?
दुष्काळ जाहीर केलाय पण...चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
Maharashtra Draught : सरकारने दुष्काळ जाहीर केलाय पण... शेतकऱ्यांच्या चिमुकल्यांच्या डोळ्यांतील अश्रू कधी थांबणार?
पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
Pune Ganesh Visarjan : पुण्यात डीजेला विरोध करणाऱ्या विद्यानंद बापटांना डिवचलं, VIDEO व्हायरल
मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
Mumbai Pune Expressway : मुंबई-पुणे एक्स्प्रेस हायवेवर भीषण अपघात; मिसिंग लिंकजवळ 3 जण जखमी
पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
Ganpati Visarjan : गणेश विसर्जनाला गालबोट, पुण्यात 18 वर्षीय तरुणाचा ट्रॉलीखाली येऊन... नेमकं काय घडलं?
30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची बैठक; काय होणार चर्चा?
INDIA Aghadi Meeting : 30 सप्टेंबरला दिल्लीत इंडिया आघाडीची महत्त्वपूर्ण बैठक; नेमकी काय होणार चर्चा?
ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा...
Thackeray Brother Morcha : ज्ञानेश कुमारांविरोधात 4 ऑक्टोबरला ठाकरे बंधूंचा मोठा मोर्चा; सर्वपक्षीय नेत्यांना काय केलं आवाहन?