AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

आयुष्यात कधीच झोपेत साप चावणार नाही, फक्त वापरा आदिवासी लोकांची ही सोपी ट्रीक

अनेकदा झोपेमध्ये असतानाच सर्पदंश होतो, अलीकडच्या काळात तर अशा घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. परंतु अशी एक ट्रीक आहे, तुम्ही जर हा उपाय केला तर सर्पदंशापासून तुमचा बचाव होऊ शकतो.

आयुष्यात कधीच झोपेत साप चावणार नाही, फक्त वापरा आदिवासी लोकांची ही सोपी ट्रीक
snakeImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Aug 10, 2026 | 2:31 PM
Share

भारतामध्ये सापांच्या हजारो प्रजाती आढळून येतात, परंतु त्यातील सर्वच सापांच्या प्रजाती या विषारी नसतात. भारातामध्ये अगदी हाताच्या बोटावर मोजण्या इतक्याच सापांच्या जाती या विषारी आहेत. त्यामध्ये प्रमुख्याने फुरसे, मण्यार, घोणस आणि नाग या प्रमुख चार जातींचा समावेश होतो. या सापांना भारतामध्ये बीग फोर असं देखील म्हटलं जातं. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये साप बिळात न थांबता अनेकदा जमिनीवर येतात. त्यामागे अनेक कारणं आहेत. पावसाळ्याच्या काळात बिळांमध्ये पाणी घुसल्यामुळे साप बाहेर पडतात. अशावेळी साप हे नेहमी आपल्यासाठी सुरक्षित निवारा शोधत असतात. त्यामुळे या काळात सर्पदंंशाच्या घटनांमध्ये देखील मोठी वाढ होते.

दरम्यान अनेकदा रात्री झोपेत साप चावल्याची घटना देखील घडते, झोपेत असल्यामुळे सर्पदंश झाल्याचं लक्षात येत नाही, त्यामुळे उपचारासाठी वेळ होतो. अशा स्थितीमध्ये सर्पदंश झालेल्या व्यक्तीचा मृत्यू देखील होऊ शकतो. भारतामध्ये मण्यार प्रजातीचा साप हा सर्वात घातक साप आहे, या सापाला सायलंट किलर देखील म्हटलं जातं. कारण अनेकदा हा साप सुरक्षित निवाऱ्यासाठी रात्रीच्यावेळी तुमच्या अंथरुणामध्ये देखील घुसतो, अशा स्थितीमध्ये तुमची थोडी जरी हालचाल झाली की धोका समजून हा साप तुम्हाला दंश करतो.  हा साप चावल्याचं देखील कळत नाही, त्यामुळे अनेकदा व्यक्तीचा झोपेतच मृत्यू होतो.

झोपेत सापाचा दंश होऊ नये, यासाठी जंगल परिसरात राहणारे लोक काही खास ट्रीक वापरतात. खासकरून आदिवासी लोक देखील याच युक्तिचा वापार करतात. पावसाळ्याच्या दिवसांमध्ये काधीही जमिनीवर झोपू नये, जमिनीवर झोपलेल्या व्यक्तीला सर्पदंश होण्याची शक्यता वाढते. त्याऐवजी रात्री झोपताना बाजीचा वापर करावा किंवा लोखंडी कॉटचा देखील तुम्ही वापर करू शकता, त्यामुळे साप तुमच्याजवळ येऊ शकत नाही. झोपण्यापूर्वी अनेकजण बाजीच्या पायांना किंवा लोखंडी पलंगाच्या पायांना रॉकेल लावतात. रॉकेल लावण्याचे दोन फायदे आहेत, एक तर रॉकेलच्या तीव्र वासामुळे साप तुमच्या आसपास येत नाहीत, तसेच समजा जरी आला तरी रॉकेल लावल्यामुळे सापाने जर पलंगावर चढण्याचा प्रयत्न  केला तर तो रॉकेलमुळे खाली घसरतो. त्यामुळे सर्पदंशाचा धोका टळतो.

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा