AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?

नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?

| Updated on: Sep 24, 2026 | 2:54 PM
Share

बँक कर्मचाऱ्यांनी पाच दिवसीय बँकिंगच्या मागणीसाठी २८ ते ३० सप्टेंबर दरम्यान तीन दिवसीय संपाची घोषणा केली आहे. इंडियन बँक असोसिएशनने (IBA) केलेल्या कराराची अंमलबजावणी न झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे. ग्राहकांना त्रास देण्याचा उद्देश नसून, हा आपला संविधानिक अधिकार असल्याची कर्मचाऱ्यांची भूमिका आहे. २६ ऑक्टोबरपासून बेमुदत संपाचा इशाराही देण्यात आला आहे.

नागपूरसह राज्यभरातील बँक कर्मचारी २८ ते ३० सप्टेंबर दरम्यान तीन दिवसीय संपावर जाणार आहेत. बँक कर्मचाऱ्यांची प्रामुख्याने पाच दिवसीय बँकिंगची मागणी आहे. युनायटेड फोरम ऑफ बँक्स युनियन आणि इंडियन बँक असोसिएशन (IBA) यांच्यात ८ मार्च २०२४ रोजी द्विपक्षीय करार झाला होता, ज्यात पाच दिवसीय बँकिंगची घोषणा करण्यात आली होती. मात्र, अडीच वर्षे उलटूनही या मागणीची अंमलबजावणी झालेली नाही. यापूर्वी ११ सप्टेंबर रोजी एक दिवसीय संप यशस्वी झाल्यानंतर, आता पुढचा टप्पा म्हणून २८, २९, ३० सप्टेंबर रोजी सार्वजनिक क्षेत्रातील सर्व बँकांचे अधिकारी आणि कर्मचारी संपात सहभागी होणार आहेत.

यामुळे बँकिंग व्यवहार पूर्णपणे ठप्प होण्याची शक्यता आहे. जर यानंतरही सरकारने मागणी पूर्ण केली नाही, तर २६ ऑक्टोबरपासून बेमुदत संपावर जाण्याचा इशारा कर्मचारी संघटनांनी दिला आहे. या संपामुळे ग्राहकांना गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो, विशेषतः ३० सप्टेंबरला बँकांचे अर्धवार्षिक क्लोजिंग असल्याने क्लिअरिंग सिस्टिम्सवर मोठा परिणाम होईल. बँक कर्मचाऱ्यांनी ग्राहकांना या लढ्यात सहभागी होण्याचे आवाहन केले आहे.

Published on: Sep 24, 2026 02:54 PM

Follow Us