AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Mushtaq Khan : ‘वेलकम’, ‘गदर’ फेम अभिनेते मुश्ताक खान यांचं निधन; चित्रपटसृष्टीवर शोककळा

प्रसिद्ध अभिनेते मुश्ताक खान यांचं निधन झालं. ‘'वेलकम', 'गदर: एक प्रेम कथा' , ‘हम हैं राही प्यार के’, 'जोड़ी नंबर 1' यासारख्या अनेक चित्रपटांमधून प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारे खान गेल्या काही काळापासून आजारी होते. त्यांच्या निधनाने कलाविश्वावर शोककळा पसरली आहे.

Mushtaq Khan  : ‘वेलकम’, ‘गदर’ फेम अभिनेते मुश्ताक खान यांचं निधन; चित्रपटसृष्टीवर शोककळा
| Updated on: Sep 24, 2026 | 8:41 PM
Share

हिंदी चित्रपटसृष्टीतून एक अतिशय दु:खद बातमी समोर आली आहे, प्रसिद्ध अभिनेते मुश्ताक खान यांचं निधन झालं. ‘वेलकम’, ‘गदर’ ‘आशिकी’, ‘मुझसे शादी करोगी’ आणि ‘हम हैं राही प्यार के’ यांसारख्या अनेक चित्रपटातील अभिनयातून प्रेक्षकांच्या हृद्यात स्थान मिळवणाऱ्या मुश्ताक खान यांनी अखेरचा श्वास घेतला.  गेल्या बऱ्याच काळापासून ते आजारी होते, मुंबईतील नानावटी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

मिळालेल्या माहितीनुसार ते कॅन्सरच्या आजाराशी झुंज देत होते. रिपोर्ट्सनुसार, त्यांना सुमारे पाच वर्षांपूर्वी कॅन्सरचं निदान झालं होतं. उपचारानंतर ते बरेही झाले होते; मात्र अलीकडेच त्यांचा हा आजार पुन्हा बळावला. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती सातत्याने खालावत होती, त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथेच उपचारांदरम्यान त्यांचं निधन झालं. उद्या (25 सप्टेंबर) त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहे. मुश्ताक खान यांनी अनेक चित्रपटांत काम करत अभिनयाने प्रेक्षकांचं मन जिंकून घेतलं होतं. बऱ्याच चित्रपटात ते सह-कलाकाराच्या भूमिकेत झळकायचे. मुश्ताक खान यांनी छोट्या पडद्यावरही बराच काळ काम केलं होतं.

शॉर्ट फिल्म्सपासून केली सुरूवात

मुश्ताक खान यांनी अनेक चित्रपटात काम केलं, पण ‘वेलकम’ चित्रपटातील बल्लूच्या भूमिकेमुळे त्यांना प्रामुख्याने ओळखलं जातं. आपल्या कारकिर्दीतील बहुतांश चित्रपटांमध्ये त्यांनी विनोदी भूमिका साकारल्या. मुश्ताक खान यांनी ८०च्या दशकात शॉर्ट फिल्म्समधून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. त्यानंतर हळूहळू ते टीव्ही मालिकांमध्ये दिसू लागले. मुश्ताक खान यांनी ‘भारत एक खोज’, ‘नुक्कड’, ‘अदालत’ आणि ‘कुछ रंग प्यार के ऐसे भी’ यांसारख्या टीव्ही मालिकांमध्ये काम केलं.

मुश्ताक खान यांचं काम

टीव्ही मालिकांनंतर मुश्ताक खान यांनी अभिनयाचं क्षेत्र विस्तारत मोठ्या पडद्यावरही प्रवेश केला. हळूहळू ते चित्रपटांमध्ये दिसू लागले. ‘हम हैं राही प्यार के’, ‘हेरा फेरी’, ‘मुझसे शादी करोगी’, ‘जोडी नंबर 1’ आणि ‘वेलकम’ यांसारख्या गाजलेल्या त्यांनी चित्रपटांमध्ये काम केलं. ते शेवटचे ‘भाबीजी घर पर हैं!’ या चित्रपटात दिसले होते. या विनोदी चित्रपटातील त्यांची भूमिका प्रेक्षकांना खूपच आवडली होती.

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं रामराव वडकुते यांचं अंत्यदर्शन
CM Devendra Fadnavis : रामराव वडकुते यांच्या निधनाने धनगर समाजाची मोठी हानी; मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं वडकुतेंचं अंत्यदर्शन
माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं....
Chandrashekhar Bawankule: माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं, बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत...
Pune : पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत दुसऱ्यांदा न्यायालय परिसर रिकामा
चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा...
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil : रुपाली चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
अजित पवारांवरील विधानावरून मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावल
Hasan Mushrif : अजित पवारांवरील विधानावरून हसन मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावलं...
38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ
Jalna : 38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ, नेमकं काय घडलं?
भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा...
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा दाखल
त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; शिरसाटांच्या दाव्याने खळबळ
Sanjay Shirsat : त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; संजय शिरसाटांच्या दाव्याने राजकारणात खळबळ
असा विरोधी पक्षनेता असतो का? गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
Girish Mahajan on Rahul Gandhi : असा विरोधी पक्षनेता असतो का? मतचोरीच्या आरोपांवर गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
कोल्हापुरात मध्यरात्री भीषण अपघात; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या
Kolhapur : कोल्हापुरात मध्यरात्री ड्रिंक अँड ड्राईव्हचा थरार; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या कारखाली येऊन दोघा भावांचा मृत्यू