WhatsApp वापरताना ही एक चूक पडणार प्रचंड महागात, सरकारने जारी केला मोठा अलर्ट, या गोष्टी करूच नका
तुम्ही जर व्हॉटस्अॅपचा (WhatsApp) वापर करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी आहे. सरकाने नुकताच व्हॉटस्अॅपच्या सुरक्षेसंदर्भात एक मोठा अलर्ट जारी केला आहे. जर तुम्ही देखील ही चूक केली तर ती प्रचंड महागात पडू शकते.

जर तुम्ही ऑफिस, सायबर कॅफे, हॉटेल किंवा इतर ठिकाणी पब्लिक कॉम्प्युटरवरून व्हॉटस्अॅपचा (WhatsApp) वापर करत असाल तर तुम्हाला थोडं सावध राहण्याची गरज आहे. यासंदर्भात भारताच्या सायबर सुरक्षा एजंन्सीकडून अलर्ट जारी करण्यात आला आहे. अनेकांना सार्वजनिक ठिकाणी असलेल्या कॉम्प्युटरवरून किंवा ऑफिसमध्ये असलेल्या कॉम्प्युटरवर व्हॉटस्अॅप वेब वापरण्याची सवय असते, मात्र ही सवय तुम्हाला चांगलीच महागात पडू शकते. त्यामुळे योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. जर अशा प्रकारच्या कॉम्प्युटरवर जो कॉम्प्युटर एकापेक्षा अधिक जण युज करतात, त्यावर तुमचं व्हॉटस्अॅप लॉग इन राहिलं तर तुमच्यासोबत मोठा स्कॅम होऊ शकतो. सायबर क्रिमिनल्स या संधीचा फायदा घेण्यासाठी टपूनच बसलेले असतात. तुमची प्रायव्हेट चॅट वाचण्यापासून ते तुमच्या नावावर एखादा मोठा स्कॅम किंवा फिशिंग सारखे प्रकार देखील घडू शकतात.
भारत सरकारसोबत जोडल्या गेलेल्या I4C संस्थेच्या नॅशनल सायबर क्राइम थ्रेट एनॅलिसिस यूनिटने याबाबत माहिती दिली आहे. जर सार्वजनिक ठिकाणी एखाद्या कॉम्प्युटरवर तुम्ही व्हॉटस्अॅप वेबचा वापर करत असाल तर तुम्हाला अधिक सावध रहाण्याची गरज आहे, असं या संस्थेनं म्हटलं आहे. जर अशा कॉम्प्युटरवर तुमचं व्हॉटस्अॅप सुरू राहिलं आणि त्याचा अॅक्सेस एखाद्या चुकीच्या व्यक्तीला मिळाला तर तो तुमच्या अकाउंटचा चुकीचा वापर करू शकतो, तो तुमची प्रायव्हेट चॅट वाचू शकतो, एवढंच नाही तर तुमच्यासोबत एखादा मोठा स्कॅम देखील घडू शकतो, असं या संस्थेनं म्हटलं आहे.
पुढे या संस्थेनं असं देखील म्हटलं आहे की तुमचा वापर झाल्यानंतर संबंधित कॉम्प्युटरवरून आठवणीने तुमचं अकाउंट लॉग आऊट करावं. काही जणांना अशी देखील सवय असते ते आपलं व्हॉटस्अॅप अकाउंट लॉग आउट न करता थेट ब्राउझर बंद करतात. मात्र नुसतं ब्राउझर बंद केलं तरी तुमचं अकाउंट तसंच तिथे सुरू राहतं, पुन्हा ब्राउझर सुरू करताच व्हॉटस्अॅप सुरू होतं. त्यामुळे नुसतं ब्राउझर बंद करू नका तर व्हॉटस्अॅप देखील लॉग आऊट करा, असा सल्ला देखील या संस्थेकडून देण्यात आला आहे. जर तुम्हालाही अशा प्रकारे व्हॉटस्अॅप वापरण्याची वेळ आलीच तर तुम्ही त्यासाठी प्रायव्हेट ब्राउझरचा वापर करू शकता, असा सल्लाही सरकारच्या वतीने देण्यात आला आहे.
