जन्मठेपेची सजा सुनावताच आरोपीने मारली पाचव्या मजल्यावरुन उडी, आरोपीची आई देखील धावली, पण
जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर एका आरोपीने न्यायालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारल्याची घटना घडली आहे. या प्रकरणात त्याच्या आईने देखील त्याच्या पाठोपाठ उडी मारण्याचा प्रयत्न केला. परंतू तिला पोलिसांनी अडवले.

बेलापूर न्यायालयात एका खून प्रकरणात जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर आरोपीने बेलापूर न्यायालयाच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे.या घटनेनंतर आरोपीच्या आईने देखील उडी मारण्याचा प्रयत्न केला, परंतू त्यांना पोलिस आणि नागरिकांनी अडवले. या प्रकरणात आरोपी गंभीर जखमी झाला आहे. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
नवीमुंबईतील बेलापूर कोर्टात न्यायाधीशांनी एका खूनाच्या प्रकरणात आरोपीला जन्मठेपेची शिक्षा सुनावणावताच या आरोपीने थेट पाचव्या मजल्यावरुन उडी मारण्याचा प्रकार घडला आहे. या घटनेत हा आरोपी गंभीर जखमी झाला आहे. त्याची ओळख नागेश बाबू लाड (वय अंदाजे ३० ते ३५ वर्षे) अशी पटली आहे. जखमी आरोपीला तातडीने नवी मुंबईतील अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत. या आरोपीची आई देखील त्याच्या पाठोपाठ उडी मारणार होती, तितक्यात तिला पोलिसांनी आरोपीच्या आईला पकडले. जखमी खुनाचा आरोपी असून या खटल्याचा निकाल बेलापूर कोर्टाने सुनावला, त्यात आरोपीला जन्मठेप सुनावण्यात आली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, २०१९ मध्ये नेरुळ पोलिसांनी नागेश बाबू लाडला खून आणि खुनाचा प्रयत्न केल्याच्या आरोपाखाली अटक केली होती. त्याच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ३०२ आणि ३०७ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. हे प्रकरण गेल्या सात वर्षांपासून बेलापूर न्यायालयात प्रलंबित होते. सोमवारी, न्यायाधीश प्रसन्न चांदगुडे यांच्या न्यायालयाने नागेशला या प्रकरणात दोषी ठरवून जन्मठेपेची शिक्षा सुनावली. मिळालेल्या माहितीनुसार, शिक्षा ऐकून नागेश खूप निराश झाला आहे. न्यायालयातून बाहेर पडल्यानंतर त्याने न्यायालयाच्या इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारली. या उडीमुळे तो गंभीर जखमी झाला. या घटनेमुळे परिसरात गोंधळ उडाला. जखमी आरोपीला रुग्णालयात नेण्यात आले असून, त्याच्यावर उपचार सुरू आहेत
