AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shah Rukh Khan : बाबो! प्रसिद्ध अभिनेत्याचा शाहरुख खानबद्दल मोठा खुलासा; म्हणाला, तो दिवसाला 80 सिगारेट…

Actor On Shah Rukh Khan : प्रसिद्ध अभिनेत्यानं शाहरुख खानबद्दल मोठा खुलासा केला आहे.

Shah Rukh Khan : बाबो! प्रसिद्ध अभिनेत्याचा शाहरुख खानबद्दल मोठा खुलासा; म्हणाला, तो दिवसाला 80 सिगारेट...
| Updated on: Nov 23, 2026 | 6:02 PM
Share

प्रसिद्ध अभिनेते रझा मुराद यांनी नुकत्याच एका मुलाखतीत शाहरुख खानच्या सेटवरील ऊर्जेचं कौतुक केलं. ते म्हणाले की, दिवसाला 80 सिगारेट ओढूनही सुपरस्टार इतका उत्साही कसा राहतो हे पाहून त्यांना आश्चर्य वाटतं. रझा मुराद असंही म्हणाले की, शाहरुखनंतर आजच्या पिढीतील रणवीर सिंग हा एकमेव अभिनेता आहे, ज्याच्यामध्ये सुपरस्टार बनण्याची क्षमता आहे.

शाहरुख खानबद्दल रझा मुराद यांचं मत

लल्लनटॉपला दिलेल्या मुलाखतीत रझा मुराद म्हणाले, ‘शाहरुख खानबद्दल मला जे समजलं आहे ते हे की, तो प्रतिभेनं परिपूर्ण आहे. त्याच्यात प्रचंड ऊर्जा आहे. जेव्हा तो काम करतो, तेव्हा तो एका सामान्य माणसासारखा असतो. दिवसाला 80 सिगारेट ओढूनही, जे खूप हानिकारक आहे. असं असलं तरी इतकी ऊर्जा कशी निर्माण करतो हे मला समजतच नाही. बच्चन साहेबांव्यतिरिक्त मी त्यांच्यासारखी ऊर्जा असलेला दुसरा कोणीही पाहिलेला नाही. मला वाटतं की ही देवाची देणगी आहे.’

तरुण पिढीमध्ये पुढचा सुपरस्टार कोण होऊ शकतो, असं विचारले असता रझा मुराद म्हणाले, ‘नवीन कलाकारांना स्वतःला सिद्ध करावं लागतं; एक चित्रपट पुरेसा नसतो. राजेंद्र कुमार यांचा ‘लव्ह स्टोरी’ हा चित्रपटही हिट झाला होता. पण मला वाटतं की, रणवीर सिंग या पिढीचा सुपरस्टार होऊ शकतो.’

या वर्षाच्या सुरुवातीला, ‘स्क्रीन’ला दिलेल्या एका मुलाखतीत, अभिनेता देवेन भोजानीनं शाहरुख खानचं कौतुक केलं होतं. तो म्हणाला, ‘काही वर्षांपूर्वी, मी शाहरुख खानसोबत एक चित्रपट केला होता, ज्यात मी त्याच्या मित्राची भूमिका साकारली होती. तो चित्रपट प्रदर्शित झाला की लांबणीवर पडला, हे मला माहीत नाही. तेव्हा मी ऐकलं होतं की, शाहरुख खान खूप गर्विष्ठ आहे, नखरे करतो आणि खूप उद्धटपणे बोलतो. तो सेटवरचा माझा पहिला दिवस होता. मी नवीन असल्यामुळे, मी सर्वांना माझी ओळख करून दिली. पण मी विचार करत राहिलो की, मी शाहरुखशी जाऊन बोलावं की नाही. जर त्यानं माझा अपमान केला तर?’ या विचारानं मी संकोच करत होतो.’

देवेन पुढे म्हणाला, ‘मी एका कोपऱ्यात माझे डायलॉग पाठ करत होतो, आणि कोणीतरी मागून मला टॅप केलं. तो शाहरुख खान होता. त्यानं स्वतःची ओळख करून दिली आणि ‘जो जीता वोही सिकंदर’मधील माझ्या कामाचं कौतुक केलं. तेव्हाच त्याच्याबद्दलच्या सर्व अफवा खऱ्या ठरल्या. तो खूप साधा आणि जमिनीवर पाय असलेला माणूस आहे. त्यानं मला सांगितलं की, काही दिवसांपूर्वीच त्यानं मन्सूरसोबत ‘जो जीता वोही सिकंदर’ पाहिला होता आणि त्याला माझं काम इतकं आवडलं की त्याने मन्सूरकडून माझ्या कामाची माहिती घेतली.’

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं रामराव वडकुते यांचं अंत्यदर्शन
CM Devendra Fadnavis : रामराव वडकुते यांच्या निधनाने धनगर समाजाची मोठी हानी; मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं वडकुतेंचं अंत्यदर्शन
माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं....
Chandrashekhar Bawankule: माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं, बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत...
Pune : पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत दुसऱ्यांदा न्यायालय परिसर रिकामा
चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा...
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil : रुपाली चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
अजित पवारांवरील विधानावरून मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावल
Hasan Mushrif : अजित पवारांवरील विधानावरून हसन मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावलं...
38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ
Jalna : 38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ, नेमकं काय घडलं?
भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा...
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा दाखल
त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; शिरसाटांच्या दाव्याने खळबळ
Sanjay Shirsat : त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; संजय शिरसाटांच्या दाव्याने राजकारणात खळबळ
असा विरोधी पक्षनेता असतो का? गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
Girish Mahajan on Rahul Gandhi : असा विरोधी पक्षनेता असतो का? मतचोरीच्या आरोपांवर गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
कोल्हापुरात मध्यरात्री भीषण अपघात; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या
Kolhapur : कोल्हापुरात मध्यरात्री ड्रिंक अँड ड्राईव्हचा थरार; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या कारखाली येऊन दोघा भावांचा मृत्यू