Sara Tendulkar : बॉलिवूड सुपरस्टारच्या लेकासोबत सारा तेंडुलकर अडकणार लग्नबंधनात? जवळच्या मित्राकडून खुलासा
Sara Tendulkar Marriage : सारा तेंडुलकरच्या लग्नाच्या चर्चांना पुन्हा एकदा उधाण आलं आहे. यावर आता साराच्या मित्रानं प्रतिक्रिया दिली आहे.

माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांची 29 वर्षीय एकुलती एक मुलगी सारा तेंडुलकर आणि ज्येष्ठ अभिनेते सनी देओलचा 32 वर्षीय मुलगा राजवीर देओल विवाहबंधनात अडकणार आहेत का? सोशल मीडियावर या अफवांची जोरदार चर्चा सुरू आहे, पण यात अजिबात तथ्य नाही. सारा तेंडुलकरच्या एका जवळच्या मित्रानं या चर्चांना केवळ अफवा असल्याचं सांगून फेटाळून लावले आहे. त्यांनी म्हटले आहे की, यात काहीही तथ्य नाही.
‘टाइम्स ऑफ इंडिया’ने सारा तेंडुलकरच्या जवळच्या सूत्राच्या हवाल्यानं म्हटलं आहे की, ‘सारा आणि राजवीर एकमेकांना कधी भेटलेही नाहीत. सारा सिंगल आहे आणि तिच्या कामावर लक्ष केंद्रित करत आहे. या चर्चा निराधार आहेत. सारा या अफवांवर कधीही प्रतिक्रिया देणार नाही, कारण तिला तिची प्रतिष्ठा जपायची आहे.’
लग्नाबद्दल काय म्हणालेली सारा तेंडुलकर?
काही दिवसांपूर्वी, सारा तेंडुलकरनं एका मुलाखतीत तिच्या लग्नाबद्दल भाष्य केलं होतं. तिनं म्हटलं होतं की, तिचा भाऊ अर्जुन तेंडुलकरचं लग्न तिच्यासाठी एका टेस्टसारखं होतं. सारा म्हणाली, ‘लग्न म्हणजे काय हे जाणून घेण्यासाठी हा माझ्यासारखी चांगला काळ होता. त्यामुळे, आता मला माहित आहे की मला काय हवं आहे आणि काय नको आहे.’
लग्नाची अफवा कुठून सुरू झाली?
सारा आणि राजवीरच्या लग्नाची अफवा सर्वप्रथम रेडिटवर पसरली. त्यानंतर, विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर त्यावर चर्चा सुरू झाली. क्रिकेट आणि सिनेमाचं जग पुन्हा एकदा जोडले जात असल्याचे दावे केले जाऊ लागले. राजवीर देओल 2027 मध्ये सारा तेंडुलकरशी लग्न करणार असल्याची चर्चा सुरू झाली. राजवीर आधीच साराला महागड्या भेटवस्तू पाठवत असल्याचाही दावा करण्यात आला होता.
दरम्यान, सारा तेंडुलकरचं नाव शुभमन गिलसोबतही जोडलं गेलेलं. शुभमन गिलला सारा तेंडुलकरला डेट करण्याबाबत विचारण्यात आलं होतं. त्यावेळी त्यानं ‘कदाचित’ असं उत्तर दिलं होतं. त्यामुळे या चर्चांना आणखी हवा मिळाली. मात्र, 2025 मध्ये एका मुलाखतीत शुभमननं आपण तीन वर्षांहून अधिक काळ सिंगल असल्याचं सांगितलं होतं.
