पाखंडी, ढोंगी…., रामदेव बाबांचा बागेश्वर बाबांवर हल्लाबोल, प्रचंड संतापले, नेमकं असं काय घडलं की एवढे चिडले?
योग गुरु रामदेव बाबा यांनी बागेश्वर बाबा उर्फ प्रसिद्ध कथावाचक धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. धीरेंद्र शास्त्री पाखंडी असल्याचं रामदेव बाबा यांनी म्हटलं आहे. यावरून आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.

योग गुरु रामदेव बाबा यांनी बागेश्वर बाबा उर्फ प्रसिद्ध कथावाचक धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. धीरेंद्र शास्त्री पाखंडी असल्याचं रामदेव बाबा यांनी म्हटलं आहे. भूतबाधा दरबार तसेच धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांनी केलेल्या राम आणि कृष्ण यांच्या तुलनेवरून रामदेव बाबा यांनी चांगलाच संताप व्यक्त केला आहे. बागेश्वर बाबा हिंदूंना वाचवण्याच्या गप्पा मारतात, मात्र ते पाखंडी आहेत. महिलांनी अशा कथा वाचकांपासून सावध राहावं, असंही यावेळी रामदेव बाबा यांनी म्हटलं आहे. दरम्यान यामुळे आता नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
झारखंडच्या जमशेदपूरमध्ये रविवारी महिला पतंजली योग समिती पूर्व सिंहभूम यांच्या वतीने प्रांतीय महासम्मेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं, या कार्यक्रमात बोलत असताना योग गुरू रामदेव बाबा यांनी धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘काही लोक ना वेदाचा अभ्यास करत ना दर्शन उपनिषद वाचत, ते कुरान सुद्धा वाचत नाहीत. रामायण, महाभारताचा अभ्यास करत नाहीत. त्यांना संविधान माहिती नसंत, त्यांना लोकशाही माहिती नसते. ते फक्त उभे राहतात, आणि काहीतरी बडबड करतात. सनातनी असल्याचा दावा करतात, म्हणतात आम्ही हिंदू धर्माला वाचवू, अरे पाखंडी, धूर्त आधी स्वत:ला वाचव, असा हल्लाबोल यावेळी रामदेव बाबा यांनी बागेश्वर बाबांवर केला आहे.
त्यामुळेच मी असा सल्ला देतो की, चुकीचे व्यक्ती आणि चुकीचे विचार यापासून तुम्ही कायम दूर राहिलं पाहिजे. हे ढोंगी, पाखंडी कथाकार तुम्हाला फसवत आहेत. धर्माच्या नावावर धार्मिक उन्माद निर्माण केला जात आहे. सगळ्यात जास्त अशा पाखंडीपणाचा बळी आमच्या आई, बहिणी आणि मुली ठरतात. हे लोक आधी देवी देवतांची तुलना करतात आणि नंतर माफी पण मागतात. अशा लोकांपासून महिलांनी सावध राहावं, असं यावेळी रामदेव बाबा यांनी म्हटलं आहे. दरम्यान आता रामदेव बाबा यांच्या या टिकेला आता बागेश्वर बाबा काय प्रत्युत्तर देणार हे पहाणं महत्त्वाचं ठरणार आहे.
