AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Sharad Kelkar Kaali Kheti : शरद केळकरचा ‘काली खेती’ मध्ये दमदार अभिनय, 3 दिवसातच सिनेमाने केली लाखाेंची लयलूट

भारदस्त डबिंगने शरद केळकर प्रेक्षकांच्या मनावर छाप तर पाडतोच. पण आता त्याच्या अभिनयाने देखील प्रेक्षक भारावून गेले आहेत. यावेळी तो ' काली खेती' या हिंदी हॉरर सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. काही दिवसातच सिनेमाने कोट्यावंधीची लूट केली आहे.

Sharad Kelkar Kaali Kheti :  शरद केळकरचा 'काली खेती' मध्ये दमदार अभिनय, 3 दिवसातच सिनेमाने केली लाखाेंची लयलूट
kali kheti shard kelkarImage Credit source: tv9 marathi
| Updated on: Nov 23, 2026 | 6:17 PM
Share

अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्वत:ची वेगळी ओळख निर्माण करणारा अभिनेता शरद केळकर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. त्याच्या भारदस्त डबिंगने तो प्रेक्षकांच्या मनावर छाप तर पाडतोच. पण आता त्याच्या अभिनयाने देखील प्रेक्षक भारावून गेले आहेत. यावेळी तो ‘ काली खेती’ या हिंदी हॉरर सिनेमाच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात शरदसोबत ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ देखील आहेत. बाप – लेकाचं नातं आणि गावात घडणाऱ्या विचित्र घटना यावर हा सिनेमा आधारित आहे.

शरद केळकर साकारतोय महत्वाची भूमिका

‘काली खेती’ मध्ये शरद केळकर रोहित नावाच्या व्यक्तीची भूमिका साकारतो आहे. रोहित आपली पत्नी राधा आणि मुलगा राजूसोबत एका गावात राहतो. काही कारणांमुळे त्याला तो आपल्या वडिलांना गावातं बोलावतो. किशन गावात आल्यानंतर तिथे काहीतरी विचित्र घडायला सुरूवात होते. शेतीत बदल होतो, त्यानंतर गावातील शेती. तिथल्या विचित्र घटना आणि कुटुंबाशी संबंधित रहस्य हळूहळू समोर येतात.

शरदच्या अभिनयांचं होतंय कौतुक

चित्रपटातील शरद केळकरचा अभिनय हा लक्ष वेधून घेणारा भाग आहे. त्याने रोहितची भूमिका संयमपणे साकारली असून, त्याच्या अभिनयात एक वेगळी तीव्रता जाणवते. वडील आणि मुलामधील एक वेगळे नाते या सिनेमातं मांडले आहे.नेहा सरगमने या सिनेमात शरदच्या बायकोची म्हणजेच राधाची भूमिका साकारली आहे. बालकलाकार स्पंदनेही उत्कृष्ट अभिनयं केला आहे. हारिस इम्तियाज खान यांनी या चित्रपटाचं लेखन, दिग्दर्शन आणि पटकथा लेखन केलं आहे. हा सिनेमा पारंपरिक भूताच्या गोष्टिपेक्षा वेगळा आहे. गाव,शेती, त्याभोवती दडलेली रहस्यं याभोवती ही कथा फिरते आहे.

हा चित्रपट 20 नोव्हेंबर 2026 रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला, परंतु ‘रामायण’ आणि ‘ओम’ सारख्या मोठ्या चित्रपटांशी स्पर्धा झाल्यामुळे, भारतात तो केवळ 180 च्या आसपास पडद्यांवर मर्यादित स्वरूपात प्रदर्शित करण्यात आला. या चित्रपटाने भारतात आपल्या पहिल्या सप्ताहात सुमारे ७८ लाख रुपये (०.७८ कोटी रुपये) निव्वळ कमाई (नेट कलेक्शन) आणि ८८ लाख रुपये (०.८८ कोटी रुपये) एकूण कमाई (ग्रॉस कलेक्शन) केली आहे. एकूणच, शरद केळकर आणि जॅकी श्रॉफ यांची जोडी, गावाच्या पार्श्वभूमीवर उलगडणारं रहस्य आणि वेगळ्या घाटणीचा भयपट पाहण्याची इच्छा असलेल्या प्रेक्षकांसाठी ही चित्रपट चर्चेचा विषय ठरत आहे.

Follow Us
मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं रामराव वडकुते यांचं अंत्यदर्शन
CM Devendra Fadnavis : रामराव वडकुते यांच्या निधनाने धनगर समाजाची मोठी हानी; मुख्यमंत्री फडणवीस यांनी घेतलं वडकुतेंचं अंत्यदर्शन
माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं....
Chandrashekhar Bawankule: माझ्या विधानाचा विपर्यास केला; जमीन पडीक ठेवू नका एवढंच सांगितलं, बावनकुळे नेमकं काय म्हणाले?
पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत...
Pune : पुण्यातील शिवाजीनगर कोर्टात पुन्हा बॉम्ब ठेवल्याची अफवा; 15 दिवसांत दुसऱ्यांदा न्यायालय परिसर रिकामा
चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा...
Ravindra Dhangekar on Chandrakant Patil : रुपाली चाकणकरांना एक न्याय, चंद्रकांत पाटलांना दुसरा का? धंगेकरांचा मुख्यमंत्री फडणवीसांना सवाल
अजित पवारांवरील विधानावरून मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावल
Hasan Mushrif : अजित पवारांवरील विधानावरून हसन मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावलं...
38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ
Jalna : 38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ, नेमकं काय घडलं?
भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा...
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा दाखल
त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; शिरसाटांच्या दाव्याने खळबळ
Sanjay Shirsat : त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; संजय शिरसाटांच्या दाव्याने राजकारणात खळबळ
असा विरोधी पक्षनेता असतो का? गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
Girish Mahajan on Rahul Gandhi : असा विरोधी पक्षनेता असतो का? मतचोरीच्या आरोपांवर गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
कोल्हापुरात मध्यरात्री भीषण अपघात; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या
Kolhapur : कोल्हापुरात मध्यरात्री ड्रिंक अँड ड्राईव्हचा थरार; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या कारखाली येऊन दोघा भावांचा मृत्यू