AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Vastu Shastra : ही तीन झाडं कधीच घराच्या मुख्य दरवाजा समोर लावू नयेत, वास्तुशास्त्र काय सांगतं?

हिंदू धर्मामध्ये काही झाडांना अत्यंत शुभ माण्यात आलं आहे, तर काही झाडं ही घरात असू नये, असं म्हटलं आहे. कोणती झाडं शुभ आहेत? कोणती झाडं अशुभ आहेत आणि ती घरात लावल्यामुळे काय होतं? याची माहिती वास्तुशास्त्रात देण्यात आली आहे, आज आपण त्याबद्दल माहिती घेणार आहेत.

Vastu Shastra : ही तीन झाडं कधीच घराच्या मुख्य दरवाजा समोर लावू नयेत, वास्तुशास्त्र काय सांगतं?
Vastu Shastra Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Sep 24, 2026 | 8:01 PM
Share

वास्तुशास्त्र हे एक असं शास्त्र आहे, ज्यामध्ये केवळ तुमचं घर कसं असावं? तुमच्या घराची रचना कशी असावी? याबद्दलच माहिती देण्यात आलेली नाहीये. तर वास्तुशास्त्रानुसार तुमच्या घरात जेवढ्या काही वस्तू आहेत, त्याचा शुभ किंवा अशुभ प्रभाव हा तुमच्यावर पडत असतो. तसेच घरातील प्रत्येक वस्तूंची एक निश्चित दिशा देखील असते. त्याच दिशेला त्या वस्तू ठेवल्या गेल्या पाहिजेत, असं देखील वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे. वास्तुशास्त्रानुसार आणि हिंदू धर्मानुसार काही झाडं ही अतिशय शुभ असतात, अशा झाडांना घरात लावण्याचा सल्ला दिला जातो, परंतु काही झाडं अशी असतात जी झाडं घरात किंवा घराच्या मुख्य दरवाजासमोर लावू नयेत, कोणती झाडं घरात लावणं शुभ आहे? कोणती झाडं घरात लावू नयेत? जर ही झाडं घरात लावली तर त्याचा काय परिणाम होऊ शकतो? या सर्व गोष्टींची आपण आज माहिती जाणून घेणार आहोत. चला तर मग जाणून घेऊयात वास्तुशास्त्रामध्ये नेमकं काय सांगितलं आहे? त्याबद्दल.

वडाचं झाड – वास्तुशास्त्रामध्ये आणि हिंदू धर्मामध्ये वडाच्या झाडाला खूप महत्त्व आहे. हिंधू धर्मामध्ये वडाच्या झाडाची पूजा केली जाते. वट पौर्णिमेला महिला आपल्या पतीच्या दीर्घायुषासाठी या झाडाची पूजा करतात. परंतु तरी देखील हे झाड घराच्या मुख्य दरवाजासमोर नसावं, असं वास्तुशास्त्रामध्ये म्हटलं आहे. त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे कोणत्याही झाडाची सावली ही घराव पडू नये, त्यामुळे घराच्या आर्थिक प्रगतीमध्ये अडथळे निर्माण होतात, असं वास्तुशास्त्र सांगतं. वट वृक्ष हा मोठा वृक्ष असल्यामुळे त्याची सावली तुमच्या संपूर्ण घरावर पडू शकते, त्यामुळे वडाचं झाड घराच्या मुख्य दरवाजाजवळ असू नये, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

केळीचं झाड – केळीच्या झाडाला देखील हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र माण्यात आलं आहे, विविध धार्मिक कार्यक्रमासाठी केळीच्या पानांचा उपयोग होतो. काही ठिकाणी तर केळीच्या झाडाची पूजा देखील केली जाते. परंतु तरी देखील केळीचं झाड हे घराच्या मुख्य दरवाजासमोर असू नये, असं वास्तुशास्त्र सांगतं, कारण यामुळे घरात अकाल मृत्यू योग तयार होण्याची भीती असते, असं वास्तुशास्त्रात सांगितलं आहे.

शेवग्याचं झाड – वास्तुशास्त्रानुसार घराच्या मुख्य दरवाजासमोर कधीही शेवग्याचं झाडं असू नये, कारण यामुळे तुमच्या आर्थिक प्राप्तीच्या मार्गात अडथळे निर्माण होतात, असं वास्तुशास्त्रात सांगण्यात आलं आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही. तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
रत्नागिरीत धरणसाठ्यात घट; पाणीसाठा कमी; पाणीबाणीचा धोका कायम
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो...
बीडमध्ये रोहित पवारांच्या नेतृत्वाखाली शेतकरी आक्रोश मोर्चा, हजारो शेतकरी होणार सहभागी
मग आपल्याला स्वतःची...ओमराजेंचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर
मग आपल्याला स्वतःची... ओमराजे निंबाळकरांचं ठाकरे गटातील नेत्याला सडेतोड उत्तर, थेट लायकी...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा...
कोथरूडमध्ये सिम्बाच्या स्मरणार्थ बाप्पाचा भावनिक देखावा... प्रेम, आठवण आणि निसर्गाचा संगम
दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
Video : पुण्याच्या गणेशोत्सवाचा मानबिंदू, दगडूशेठ गणपती विसर्जनासाठी वक्रतुंड रथ सज्ज
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेचा...
भाजपच्या विजयाचं मोठं कारण तर... निवडणूक आयोगाबाबत अभिजीत दीपाकेंचा धक्कादायक दावा
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
नागरिकांनो लक्ष द्या! तीन दिवस बँका बंद राहणार, वाचा नेमकं कारण काय?
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; सविस्तर माहिती
गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल; जाणून घ्या सविस्तर माहिती
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि...
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी फडणवीसांची मोठी घोषणा; कर्जमुक्ती आणि विम्याबाबत दिलासा
दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा
Uddhav Thackeray : दुष्काळी दौरे काजू बदाम खाण्यासाठी आहेत का? ठाकरेंचा सरकारला चिमटा