Love And War : ‘ इश्क भी, जंग भी’! OTT वर कुठे पाहता येणार रणबीरचा ‘लव्ह अँड वॉर’ ?
'लव्ह अँड वॉर'मधील रणबीर कपूरचा पहिला लूक समोर आला आहे. मेकर्सनी त्याची दोन पोस्टर्स जारी केली आहे. थिएटरमध्ये रिलीज झाल्यावर हा चित्रपट कोणत्या प्लॅटफॉर्मवर रिलीज होणार तेही यातून स्पष्ट झालं आहे.

Love And War OTT : बॉलिवूडमधील हँडसम अभिनेता रणबीर कपूर, त्याची पत्नी आलिया भट्ट आणि विकी कौशल हे तिघेही लौकरच एकाच चित्रपटात दिसणार आहे. संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटात ते झळकणार असून गेल्या बऱ्याच काळापासून चित्रपटाचं काम सुरू होतं. चाहत्यांसाठी आनंदाची गोष्ट म्हणजे मेकर्सनी या चित्रपटातील रणबीरचा पहिला लूक जारी केला आहे. एवढंच नव्हे तर हा चित्रपट कधी रिलीज होणार त्याची तारीख आणि तो कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर दिसणार हेही आता स्पष्ट झालं आहे.
‘लव्ह अँड वॉर’ चित्रपटातील रणबीर कपूरची दोन पोस्टर्स आता मेकर्सनी जारी केली आहेत. दोन्ही पोस्टर्स जवळपास सेम आहेत. व्हाईट शर्ट घातलेला रणबीर एका व्हिंटेज कारमध्ये बसलेला दिसलाय, त्याचा एक हात जखमी असून त्यात बरंच रक्त वाहातना दिसतंय. याच पोस्टवर चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख तसेच या चित्रपटाचा स्ट्रीमिंग पार्टनर कोण त्यांचही नाव लिहीलं आहे. ते नाव म्हणजे नेटफ्लिक्स. अर्थातच नेटफ्लिक्सने या चित्रपटाचे ओटीटी राईट्स मिळवल्याचं त्यातून स्पष्ट झालं आहे. म्हणजेच नवीन वर्षात थिएटरमध्ये चित्रपट प्रदर्शित झाल्यावर काही काळाने तो नेटफ्लिक्सवर येणार हे नक्की.
IMAX स्क्रीनवरही होणार रिलीज
एवढंच नव्हे तर ‘लव्ह अँड वॉर’ हा चित्रपट IMAX स्क्रीनवरही प्रदर्शित होणार आहे. पोस्टरवरच हा चित्रपट IMAX स्क्रीनवर पाहता येणार असल्याचं देखील नमूद करण्यात आलं आहे. “इश्क भी, जंग भी” असं निर्मात्यांनी रणबीरचं पोस्टर शेअर करताना लिहीलंय. तर दुसऱख्या पोस्टरसोबत “वो रुतबा, वो रौब, वो जुनून,” असं लिहीण्यात आलं आहे.
View this post on Instagram
कधी रिलीज होणार पिक्चर ?
संजय लीला भन्साळी यांनी दिग्दर्शित केलेला ‘लव्ह अँड वॉर’ हा रोमँटिक वॉर ड्रामा चित्रपट आहे. पुढल्या वर्षी म्हणजेच 21 जानेवारी 2027 रोजी हा पिक्चर थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. रणबीर कपूरच्या दोन्ही पोस्टर्सनी सोशल मीडियावर चांगलीच चर्चा निर्माण केली आहे. आता रिलीज झाल्यानंतर हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर कशी कामगिरी करतो, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. हा मोठ्या बजेटचा चित्रपट असून, रिपोर्ट्सनुसार या चित्रपटाच्या निर्मितीसाठी जवळपास 350 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत.
साधारणपणे एखादी फिल्म चित्रपटगृहात प्रदर्शित झाल्यानंतर सुमारे 8 आठवड्यांनी तो चित्रपट OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित केला जातो. त्यामुळे ‘लव्ह अँड वॉर’ मार्च 2027 च्या अखेरीस किंवा एप्रिल 2027पर्यंत Netflix वर येण्याची शक्यता आहे. हा चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्यासाठी चाहते खूपच उत्सुक आहेत.
