AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

सुनेत्रा पवार यांच्या भेटीनंतर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया समोर, अजितदादांची आठवण काढून म्हणाले…

आज सुनेत्रा पवार या दिल्ली दौऱ्यावर आहेत, त्यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीवर आता अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

सुनेत्रा पवार यांच्या भेटीनंतर अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया समोर, अजितदादांची आठवण काढून म्हणाले...
सुनेत्रा पवार यांनी घेतली अमित शाह यांची भेट Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 11, 2026 | 7:31 PM
Share

अजित पवार यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला, या अपघातामध्ये त्यांचं निधन झालं. दरम्यान अजित पवार यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. त्यानंतर  सुनेत्रा पवार यांनी मंगळवारी उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्विकारला. उपमुख्यमंत्रिपदाचा पदभार स्विकारल्यानंतर आता सुनेत्रा पवार या आज दिल्ली दौऱ्यावर आहेत. त्यांनी दिल्लीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली आहे. सुनेत्रा पवार यांच्यासोबत खासदार सुनील तटकरे, प्रफुल पटेल, पार्थ पवार आणि जय पवार देखील दिल्ली दौऱ्यावर आहेत. यावेळी सुनेत्रा पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी 40 मिनिटं तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्याशी 30 मिनिटं चर्चा केली. या भेटीवर आता अमित शाह यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे, त्यांनी या बैठकीसंदर्भात ट्विट केलं आहे.

नेमकं काय म्हणाले अमित शाह? 

महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट झाली.  आपल्या सर्वांचे प्रिय असलेले अजित पवार यांच्या अचानक जाण्याने महाराष्ट्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. अजित पवार यांच्यामुळे निर्माण झालेली पोकळी भरुन काढणं सोपं नाहीये, मात्र लोकांचं कल्याण आणि राज्याचा विकास हे आपल्या सर्वांचं कर्तव्य आहे, त्यामध्ये सुनेत्रा पवार यांचा संकल्प महत्त्वाचा असेल असं अमित शाह यांनी म्हटलं आहे.

तर दुसरीकडे सुनेत्रा पवार यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची देखील भेट घेतली आहे, सुनेत्रा पवार यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत 40 मिनिट चर्चा केली. एनडीएचा घटक पक्ष म्हणून आम्ही कायम एनसीपीसोबत आहोत अशी ग्वाही यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिली आहे, तसेच उपमुख्यमंत्री म्हणून काम करत असताना भाजप कायम सोबत असेल असंही यावेळी मोदी यांनी म्हटलं आहे, तसेच त्यांनी अजित पवार यांच्या निधनावर शोक देखील व्यक्त केला आहे.

Follow Us
ते सर्व आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
Sanjay Raut At Thane : ते आरोपी अजूनही... संजय राऊतांचं पोलिस अधिकाऱ्यांसमोर मोठं विधान
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा...
तर काय करणार? प्रदीप पूर्णेकर प्रकरणी संजय राऊतांचा आक्रमक पवित्रा; कापूरबावडी पोलीस ठाण्यात नेमकं काय घडतंय?
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी!CM फडणवीसांच्या बैठकीत..
MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी सर्वात मोठी बातमी! CM फडणवीसांच्या बैठकीतील ‘हे’ 5 महत्त्वाचे निर्णय
सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
Sachin Waze | सचिन वाझेचा तुरुंगात मुक्काम वाढला; नेमकं कारण काय?
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
गडचिरोलीतील लेकाची गगनभरारी! थेट 'लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स'मध्ये निवड
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश...
धक्कादायक! विमानात वैमानिकांचा वाद, थेट हल्ला नंतर विमान क्रॅश करण्याचा प्रयत्न: पुढे जे घडलं ते...
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे
भोंदू अशोक खरातला मोठा झटका! गंभीर फसवणूक प्रकरणात कोर्टाचे महत्त्वाचे निर्देश काय?
मातोश्री'वर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर...
मातोश्री बंगल्यावर राजकीय हालचालींना वेग! आधी विभागप्रमुखायंची बैठक नंतर राऊत आणि नार्वेकर... नेमकं काय घडतंय?
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा...
सुप्रीम कोर्टाच्या कार्यपद्धतीवर इंडिया आघाडी नाराज; थेट दिला इशारा आता...
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या,
ठाण्यात प्रदीप पुर्णेकर प्रकरणी कुटुंबीयांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, जोपर्यंत...