AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

विद्या बालनने कोणासाठी सर्व मर्यादा केल्या पार… घ्याला लागला मोठा निर्णय… झालेली वाईट अवस्था

अभिनेत्री विद्या बालन हिने अनेक सिनेमांमध्ये दमदार भूमिका साकारत चाहत्यांचं मनोरंजन केलं. पण एका गोष्टीसाठी अभिनेत्रीला सर्व मर्यादा ओलांडाव्या लागल्या. त्यानंतर विद्या हिने मोठा निर्णय देखील घेतलेला. त्याकाळात अभिनेत्रीची अवस्था देखील फार वाईट झाली होती.

विद्या बालनने कोणासाठी सर्व मर्यादा केल्या पार... घ्याला लागला मोठा निर्णय... झालेली वाईट अवस्था
अभिनेत्री विद्या बालन
| Updated on: Feb 12, 2026 | 3:36 PM
Share

बॉलिवूडची अशी एक अभिनेत्री, जिचा इंडस्ट्रीत कोणीही गॉडफादर नव्हता. स्वतःची मेहनक आणि अभिनयाच्या जोरावर अभिनेत्रीने मोठ्या पडद्यावर स्वतःचं स्थान पक्क केलं. आज बॉलिवूडमध्या सर्वात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये ही अभिनेत्री देखील अव्वल स्थानी आहे. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नाही तर, अभिनेत्री विद्या बालन आहे. विद्या बालन हिने अनेक सिनेमात एकापेक्षा एक भूमिका साकारल्या आणि चाहत्यांचं मनोरंजन केलं. सांगायचं झालं तर, ‘द डर्टी पिक्चर’ सिनेमामुळे विद्या हिच्या लोकप्रियतेत मोठी वाढ झाली.

‘द डर्टी पिक्चर’ मुळे साऊथ सिनेविश्वातील बोल्ड अभिनेत्री सिल्क स्मिता हिचं आयुष्य पुन्हा चर्चेत आलं… पण सिल्क स्मिता हिची भूमिका साकारण्यासाठी विद्या हिला खूप काही करावं लागलं होतं… जे प्रचंड हैराण करणारं होतं. एवढंच नाही तर, अभिनेत्रीने, सिल्क स्मिता हिच्या भूमिकेसाठी सर्व मर्यादा देखील ओलांडल्या होत्या.

‘द डर्टी पिक्चर’ सिनेमासाठी विद्या हिने तब्बल 12 किलो वजन वाढवलं होतं. एका मुलाखतीत विद्या म्हणालेली, ‘भूमिका इतकी आव्हानात्मक होती, की मला माझी पूर्ण लाईफ स्टाईल बदलावी लागली होती…’ सांगायचं झालं तर, विद्या हिला एक हार्मोनल आजार आहे… ज्यामुळे तिचं वजन सहजासहजी नियंत्रणात येत नाही… असताना देखील अभिनेत्रीने स्वतःचं रुटीन बदललं आणि भूमिकेसाठी स्वतःला तयार केलं.

सिनेमात ज्या प्रमाणे सिल्क स्मिता सतत सिगरेट पित होती, त्याच प्रमाणे विद्या हिला देखील सतत सिगरेट ओढण्याचे सीन करावे लागले होते. तेव्हा विद्या हिने रोज 8 – 10 सिगरेट ओढण्यास सुरुवात केली होती… यामुळे विद्याला चेन स्मोकिंगची देखील सवय लागली होती. याचा अभिनेत्रीच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम झाला, डोकेदुखी, चक्कर येणे आणि थकवा या समस्या निर्माण झाल्या.

एका मुलाखतीत विद्या म्हणालेली, ‘मी अशी औषधे घेत होती जी मला कधीच नको होती. माझे शरीर विचित्र पद्धतीने प्रतिक्रिया देत होतं. या ट्रांसफॉर्मेशनमुळे मला फार मोठा धक्का बसलेला.’ विद्याची प्रकृती इतकी बिघडली होती की, काही काळासाठी अभिनेत्रीला बॉलिवूडमधून ब्रेक घ्यावा लागला.

त्यानंतर अभिनेत्रीने स्मिकिंगची सवय सोडली. सिनेमाचं शुटिंग संपल्यानंतर अभिनेत्रीने स्वतःचं लाईफस्टाईल पुन्हा बदलले. या अडचणी असूनही, विद्या बालनने “द डर्टी पिक्चर” मध्ये इतका दमदार अभिनय केला की तिला राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. प्रेक्षकांनी तिच्या सिल्क स्मिताच्या भूमिकेचे कौतुकही केलं.

Follow Us
पक्षचिन्ह गैरसमजामुळे लाखो मत गमावले, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
धनुष्यबाणाच्या गैरसमजामुळे दीड लाख मतांचा फटका अन् पक्ष... ठाकरे गटातील नेत्याचा अजब आरोप
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी...
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; राहुल गांधी, प्रियंका गांधी मैदानात, ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात याचिका दाखल!
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक;
मोठी बातमी! ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी मनसे आक्रमक; राज्यभर स्वाक्षरी मोहीम, नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार...
अखिलेश यादवांचा भाजप आणि निवडणूक आयोगावर गंभीर आरोप; ज्ञानेश कुमार यांना हटवण्याची मागणी!
राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता...
Anurag Thakur on Rahul Gandhi | राष्ट्रपतींनी पुरावे मागितले, राहुल गांधी देऊ शकले नाही, अन् आता... भाजप मंत्र्याने थेटच सांगितलं
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या...
पाकिस्तानातील हिंगलाज मातेचं महाराष्ट्रात स्वयंभू मंदिर! नाशिकच्या या शक्तिस्थळाचा इतिहास थक्क करणारा
त्यांच्यावर सर्वांना विश्वास...MPSC कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती
त्यांच्यावर सर्वांनाच विश्वास आहे, मात्र... एमपीएससी कारभारात तुकाराम मुंढेंची नियुक्ती होताच काँग्रेस नेत्याचे विधान
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी
सर्वोच्च न्यायालयाच्या दिशेने इंडिया आघाडीचा मोर्चा; पोलिसांची परवानगी नाकारली, तरी राहुल गांधींसह अनेक नेते सहभागी
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी...
दिल्लीत इंडिया आघाडीचा एल्गार; ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यासाठी विरोधक पुन्हा रस्त्यावर!
आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...
Rahul Gandhi : आमचं आंदोलन म्हणजे...; राहुल गांधींचं ते वक्तव्य चर्चेत, म्हणाले...