AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Shafqat Amanat Ali : एक वर्ष अंथरुणाला खिळून होतो, मृत्यूशी झुंज दिली; बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकाला झालेला ब्लड कॅन्सर, आजाराबद्दल मोठा खुलासा

Bollywood Singer Blood Cancer : बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकानं आजारपणाबद्दल मोठा खुलासा केला आहे.

Shafqat Amanat Ali : एक वर्ष अंथरुणाला खिळून होतो, मृत्यूशी झुंज दिली; बॉलिवूडच्या प्रसिद्ध गायकाला झालेला ब्लड कॅन्सर, आजाराबद्दल मोठा खुलासा
| Updated on: Nov 23, 2026 | 3:38 PM
Share

बॉलिवूडमध्ये अनेक अविस्मरणीय गाणी गाणारा गायक शफकत अमानत अलीनं नुकत्याच एका मुलाखतीत त्याच्या आयुष्यातील सर्वात कठीण काळाबद्दल खुलासा केला आहे. त्यानं सांगितलं की, त्याला ब्लड कॅन्सर झाला होता आणि जवळपास वर्षभर आजारी होता. या काळात गायक मृत्यूशी झुंज देत पूर्णपणे अंथरुणावर होता. शफकतनं 17 नोव्हेंबर रोजी कराची येथे एका पत्रकार परिषदेत आपल्या आजाराबद्दल उघडपणे सांगितलं. यावेळी त्यानं आपल्या आगामी मैफिलींची घोषणा केली, तसंच कर्करोगाशी सुरू असलेल्या आपल्या लढाईबद्दलही सांगितलं.

शफकतनं सांगितलं की, आपल्या आजाराबद्दल कळल्यानंतर त्यानं ही गोष्ट काही मित्रांपासूनही लपवून ठेवली होती. त्यावेळी त्याचं संपूर्ण लक्ष उपचार आणि आरोग्य जपण्यावर होतं. हा आजार इतका गंभीर होता की, त्याला खूप संघर्ष करावा लागला. गायक म्हणाला, ‘मी खूप कठीण काळातून गेलो. यामुळे मी, माझं कुटुंब, मित्र आणि चाहते हादरून गेलो होतो. मी ही गोष्ट काही मित्रांपासून लपवत होतो आणि या परिस्थितीशी जुळवून घेण्याचा प्रयत्न करत होतो. मला मल्टिपल मायलोमा झाला होता. परिस्थिती खूप गंभीर होती आणि मी खूप संघर्ष करत होतो.’

शफकतनं सांगितलं की, त्याचा आजार लवकर ओळखला गेल्यामुळे वेळेवर उपचार करणं शक्य झालं. त्यानं अनेक डॉक्टरांचा सल्ला घेतला आणि अखेरीस कराचीमध्ये योग्य उपचार घेतले. आजार आणि उपचारांमुळे त्याला जवळपास एक वर्ष अंथरुणाला खिळून राहावं लागलं. हा काळ त्याच्यासाठी मानसिक आणि शारीरिकदृष्ट्या खूप कठीण होता, कारण संगीत आणि रंगमंचावरील सादरीकरण हे त्याच्या आयुष्याचा एक महत्त्वाचा भाग आहे.

शफकतने आजाराशी लढा कसा दिला?

आपल्या प्रकृती सुधारणेबद्दल आणि उपचारांबद्दल बोलताना गायक म्हणाला, ‘मी पूर्ण एक वर्ष अंथरुणाला खिळून होतो. मला अजून स्टेम सेल थेरपी घ्यायची आहे. ते उपचार पूर्ण होईपर्यंत, मी मेंटेनन्स थेरपीवर आहे. हा केमोचा एक खूप सौम्य प्रकार आहे, जो मला दर आठवड्याला घ्यावा लागतो. पण आता माझा आजार नियंत्रणात आहे.’

शफकतनं सांगितलं की, उपचारांच्या एका फेरीनंतर तो रंगमंचावर परतला. लाहोरमध्ये सादरीकरण करणं त्याच्यासाठी सोपं नव्हतं, कारण दीर्घकाळ अंथरुणावर पडून राहिल्यामुळे त्याचं शरीर पूर्वीसारखं मजबूत राहिलं नव्हतं. असं असूनही, त्यानं रंगमंचावर परतण्याचा निर्णय घेतला. गायक आता 28 नोव्हेंबर रोजी कराचीमधील एका आलिशान हॉटेलमध्ये लाईव्ह परफॉर्म करणार आहे. त्याचे इस्लामाबाद आणि लाहोरमध्येही शो आहेत.

शफकत अमानत अलीबद्दल बोलायचं झाल्यास, त्यानं ‘मितवा’ आणि ‘दिलदारा’ यांसारख्या अनेक शाहरुख खानच्या चित्रपटांसाठी गाणी गायली आहेत. त्यानं संगीतकार प्रीतमसोबत मिळून अनेक अविस्मरणीय गाणी तयार केली आहेत. शफकतनं ‘तेरी झुकी नजर’, ‘क्यों मैं जगून’ आणि ‘जन्नत’ या चित्रपटांसाठी गाणी गायली. त्याला भारतात प्रचंड प्रेम मिळालं, पण नंतर पाकिस्तानी कलाकारांवर बंदी आल्यामुळे शफकतला बॉलिवूड सोडावं लागलं.

Follow Us
अजित पवारांवरील विधानावरून मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावल
Hasan Mushrif : अजित पवारांवरील विधानावरून हसन मुश्रीफ आक्रमक; आनंदराज आंबेडकरांना सुनावलं...
38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ
Jalna : 38 हजारांच्या कर्जासाठी शेतकऱ्याला वसुली एजंटकडून अश्लील भाषेत शिवीगाळ, नेमकं काय घडलं?
भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा...
Chhagan Bhujbal : छगन भुजबळ यांच्याविरोधात सोशल मीडियावर आक्षेपार्ह मजकूर; पोलिसात गुन्हा दाखल
त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; शिरसाटांच्या दाव्याने खळबळ
Sanjay Shirsat : त्या आमदाराचं राम नाम सत्य झालं असतं..; संजय शिरसाटांच्या दाव्याने राजकारणात खळबळ
असा विरोधी पक्षनेता असतो का? गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
Girish Mahajan on Rahul Gandhi : असा विरोधी पक्षनेता असतो का? मतचोरीच्या आरोपांवर गिरीश महाजनांचा राहुल गांधींना सवाल
कोल्हापुरात मध्यरात्री भीषण अपघात; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या
Kolhapur : कोल्हापुरात मध्यरात्री ड्रिंक अँड ड्राईव्हचा थरार; गोकुळच्या माजी संचालकाच्या मुलाच्या कारखाली येऊन दोघा भावांचा मृत्यू
आरोप सिद्ध झाले नाहीत तर..; नार्वेकरांचा संजय राऊतांना इशारा
Rahul Narvekar on Sanjay Raut : आरोप सिद्ध झाले नाहीत तर..; नार्वेकरांचा संजय राऊतांना इशारा
शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढणार, रोहित पवारांची घोषणा; बावनकुळे म्हणाले...
Rohit Pawar : शेतकऱ्यांसाठी मोर्चा काढणार, रोहित पवारांची घोषणा; बावनकुळे म्हणाले सरकार...
अमेरिका-चीननंतर भारताचा जगात तिसरा क्रमांक; लोवी इन्स्टिट्यूटच्या....
Super Power India : अमेरिका-चीननंतर भारताचा जगात तिसरा क्रमांक; लोवी इन्स्टिट्यूटच्या अहवालात भारताचा दबदबा कायम
योजना बंदही करता येत नाही, चालवणंही आव्हानात्मक; लाडकी बहीण योजनेवरून
Ladki Bahin Yojana : योजना बंदही करता येत नाही, चालवणंही आव्हानात्मक; लाडकी बहीण योजनेवरून नरहरी झिरवाळांनी मांडली सरकारची अडचण